मुंबई : भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत (बोरिवली भाग) आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र आयोजित वनविहार उद्यान, एक्सर, बोरिवली येथे सुरु झालेल्या ’इतिहास कट्ट्या’वर ’साष्टीच्या गोष्टी’ या पहिल्या पर्वाला इतिहासप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुंबई महानगरीत हरवलेल्या साष्टीच्या इतिहासाचे विवेचन जाणकार अभ्यासकांकडून जनमानसापर्यंत यानिमित्ताने पोहोचते आहे. पर्वाच्या चौथ्या गोष्टीत वेध घेतला जाणार आहे. या भूमीवर ३०० हून अधिक वर्ष राज्य करणार्या राजघराण्याचं - शिलाहारांचं! एकेकाळी संपूर्ण कोकणाला राजकीय स्थैर्य देऊन येथील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नती ज्यांनी साधली, अशा शिलाहार राजवंशाचं साष्टीच्या इतिहासातलं योगदान मोठं आहे.
त्याच योगदानाचा आलेख साष्टीच्या चौथ्या गोष्टीत इतिहास कट्ट्यावर समजावून सांगणार आहेत, इतिहास अभ्यासक रविराज पराडकर. इसवी सन ८०० ते १२६५ पर्यंत उत्तर कोकणात आपली अबाधित सत्ता ठेवून अंबरनाथच्या शिवमंदिरासारख्या सुंदर मंदिराची माळ कोकणभूमीत सजविणार्या, शिलाहार राजवंशाचा साष्टीतीलइतिहास समजून घेऊया गप्पांच्या माध्यमातून. कार्यक्रम निःशुल्क असून सर्वांसाठी खुला आहे. नोंदणी आणि चहापान सायंकाळी ५.०० पासून सुरु असणार आहे.
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र आयोजित इतिहास कट्टा
पहिले पर्व : ’साष्टीच्या गोष्टी’
गोष्ट चौथी : शिलाहारकालीन साष्टी
सादरकर्ते : रविराज पराडकर, इतिहास अभ्यासक
रविवार, दि. १२ फेब्रुवारी, सायं ५:३० वाजता
स्थळ : वनविहार उद्यान, ऑफ देवीदास लेन, एक्सर, बोरिवली (प.), मुंबई
प्रायोजक : जनसेवा केंद्र, बोरिवली
सुमारे साडेचार शतकाचा प्रदीर्घ कालखंड