‘आर्टिकल ३७०’ने बॉक्स ऑफिसवर ६ दिवसांत जमवला ४४ कोटींचा गल्ला!

    29-Feb-2024
Total Views | 38
जम्मू-काश्मिरमधून आर्टिकल ३७० हटवण्याचा यशस्वी निर्णय कसा घेण्यात आला याचा इतिहास सांगणाऱ्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ४० कोटींच्या पुढे यशस्वी कमाई
 

article 370 
 
मुंबई : आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल ३७० ( Article 370) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे वास्तव या चित्रपटात तंतोतंत दाखवण्यात आले आहे. जम्मू-काश्मिरमधील कलम ३७० चा स्वातंत्र्यापासूनचा ७५ वर्षांचा इतिहास अतिशय उत्कृष्टपणे मोठ्या पडद्यावर मांडण्यात संपुर्ण टीमला यश आले आहे. नुकतीच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याचे आकडे समोर आले आहेत. आनंदाची बाब म्हणजे ६ दिवसांत या चित्रपटाने यशस्वीपणे ४४.६० कोटींची कमाई केली आहे.
 
 
आर्टिकल ३७० या चित्रपटाने पहिल्या दिवशी या चित्रपटाने ६.१२ कोटी, दुसऱ्या दिवशी ९.८ कोटी, तिसऱ्या दिवशी १०.२५ कोटी कमावले होते. त्यानंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या दिवसाची एकूण कमाई पकडून या चित्रपटाने ४४.६० कोटींची कमाई करत यश मिळवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपच २० कोटींमध्ये तयार करण्यात आला होता. आणि बॉक्स ऑफिसवर दुप्पट कमाई करत चित्रपटाने आणखी एक पल्ला गाठला आहे.
 
आदित्य जांभळे दिग्दर्शित, लिखित आणि आदित्य धर निर्मित या चित्रपटात यामी गौतम प्रियामणी, वैभव तत्ववादी, अरुण गोविल, किरण करमरकर, असित गोपीनाथ रेडिज, किरण करमरकर, अश्वनी कुमार आणि इरावती हर्षेसारखे मातब्बक कलाकार आहेत.
 
आर्टिकल ३७० चित्रपटाला आखाती देशांमध्ये बंदी!
 
जम्मू- काश्मिरमधून स्वातंत्र्यानंतर जवळपास ७५ वर्षांनी ‘कलम ३७०’ हटवण्यात मोदी सरकार यशस्वी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचा संपुर्ण इतिहास आदित्य जांभळे दिग्दर्शित आणि आदित्य धर निर्मित ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. मात्र, एक धक्कादायक बाब अशी ही ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट आखाती देशांमध्ये दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे. एका महत्वाच्या आणि राजकीय दृष्ट्या महत्वपुर्ण असणाऱ्या या विषयावरील चित्रपटाला हा मोठा धक्का आहे.
 
 
दरम्यान, आखाती देशांमध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याची ही पहिली घटना नाही. यापुर्वी प्रदर्शित झालेल्या फायटर चित्रपटाला देखील आखाती देशांमध्ये बंद करण्यात आली होती. बरेच हिंदी कलाकार आखाती देशामंध्ये चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी जात असतातच, मात्र, त्यांच्याच चित्रपटांना प्रदर्शित न करु देणे हा हिंदी चित्रपटसृष्टीवर मोठा अन्याय आहे असेच म्हणावे लागेल.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121