भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक नेतृत्वाचा एक महत्त्वाचा टप्पा मंगळवारी गाठला जाणार आहे. रविंद्र चव्हाण हे कार्यकर्त्यांमधून घडलेले, संघटनेतून पुढे आलेले आणि पक्षासाठी अखंड काम करत राहिलेले नेतृत्व आता भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ही निवड केवळ एक सोपस्कार नाही, तर भाजपच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.
Read More
(Harshwardhan Sapkal) "आघाडीच्या तडजोडींमुळे काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत जिल्हा आणि तालुका कमिट्यांना आघाड्यांबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार दिले जातील", असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अलिबाग येथील युवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरानंतर माध्यमांशी संवाद साधतेवेळी केले आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पोटनिवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीमध्ये बिघाडी दृश्य स्वरुपात दिसत आहे. नागरोटा येथील पोटनिवडणूक लढवण्याबाबत दोन्ही मित्रपक्ष ठाम आहेत. त्याचवेळी भाजपही समीकरणांवर लक्ष ठेवून आहे.
MPs will be representing the government abroad, the message that there is political consensus in India regarding this action will be sent abroad as well विरोधी पक्षांमधील फाटाफुटीचा आणि काही पक्षांतील आंतरिक दुफळीचा अचूक वापर करून मोदी यांनी काही विरोधकांच्या पाकिस्तानवादी भूमिकेला छेद दिला. परदेशात हे खासदार सरकारचीच भूमिका मांडणार असल्याने परदेशांतही भारतात या कारवाईबद्दल राजकीय एकमत असल्याचा संदेश जाईल. शिवाय, शिष्टमंडळातील विरोधी खासदारांच्या अंतर्भावामुळे भारतात खर्या अर्थाने लोकशाही नांदत असल्याचेही
ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या भिवंडी लोकसभेत नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे आणि जिजाऊ सामाजिक संस्थेचे प्रमुख निलेश सांबरे यांच्या वाढत्या भेटीगाठी मोठ्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साईनाथ तारे आणि निलेश सांबरे यांच्यातील ही जवळीक नव्या राजकीय बंधनाचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे.
(Akashwani Amdar Nivas) मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्याने ग्रामीण भागातील एका कार्यकर्त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत धोत्रे असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून ते ६१ वर्षांचे होते. त्यांचा मुलगा विशाल धोत्रे हा आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.
राज्यात गेल्या दहा वर्षांतील विक्रमी विदेशी गुंतवणूक केवळ नऊ महिन्यांतच झाली असून, कोणत्याही एका वर्षात आलेल्या गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महायुती सरकारच्या राजकीय स्थिरतेचे, विकासाभिमुख धोरणांचेच हे फळ आहे. राज्य वेगाने विकास करत असल्याचेच यातून अधोरेखित झाले आहे.
‘रामप्रसाद शर्मा’ची ‘गोलमाल’ भूमिका!कायदा सर्वांना समान असायला हवा असे म्हणणारेच, आपल्याला मात्र त्यातून सूट मिळायला हवी, अशी अपेक्षा बाळगतात, तेव्हा त्यांचा दांभिकपणा उघड होतो. नर्म विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले आणि ‘गोलमाल’ चित्रपटात रामप्रसाद शर्माची भूमिका साकारलेले अभिनेते अमोल पालेकर यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे त्यांचा सभ्यतेचा मुखवटा गळून पडला आहे. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या political censorship संकल्पना या निवडक आहेत, हेच त्यातून दिसून येते.
अतुल सावे म्हणजे मराठवाड्यातील भाजपचा आश्वासक आणि कट्टर हिंदुत्ववादी चेहरा. ‘राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ या ब्रीदवाक्याप्रमाणे त्यांचे कर्तृत्व दिसून येते. यशस्वी उद्योजक असूनही वडिलांना दिलेल्या शब्दासाठी आणि लोकहिताच्या तळमळीतून त्यांचे सामाजिक, राजकीय कार्य अखंड-अविरत सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ते इतर मागास, बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आज दि. २६ फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने
मोदी, ट्रम्प आणि माझ्यासारख्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या उदयामुळे जगभरातील सर्व डावे नेते चिंतेत आहेत. अशी टीका इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी केली आहे. मेलोनी म्हणाल्या की, ९०च्या दशकात जेव्हा बिल क्लिटंन आणि टोनी ब्लेअर यांनी जागतिक डाव्या विचारसरणीचे उदारमतवादी नेटवर्क निर्माण केले तेव्हा त्यांना राजकारणी म्हटले गेले. आज जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मेलोनी, अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात, तेव्हा त्यांना लोकशाहीसाठी धोका म्हटले जाते. हा डाव
मुंबई : बांगलादेशी घुसखोर वांद्रे पश्चिमपर्यंत आले आहेत. ते वांद्रे पूर्वेकडे पोहोचायला वेळ लागणार नाही. त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी सुरू असलेली भोंदूगिरी थांबवा, असा सल्ला देत माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी ‘उबाठा’ गटावर हल्लाबोल केला.
समाजात अगदी पूर्वापार सद्प्रवृत्ती विरुद्ध दुष्प्रवृत्तींचा संघर्ष अविरत सुरुच आहे. कालपरत्वे जरी या संघर्षाचे स्वरुप बदलले असले तरी सज्जन, दुर्जनांची विविध रुपे आजही अगदी सहज दृष्टिक्षेपास पडतात. पराकोटीची स्वकेंद्रीत ( Self Centered ) वृत्ती आणि नकारात्मकतेने भारलेल्या काही व्यक्ती, आपलेच खरे करण्याच्या नादात सज्ञान व्यक्तींनाही मूर्खात काढतात. आपले अज्ञान उघडे पडू नये, म्हणून शब्दच्छल, लपवालपवीचाही ते सोयीस्कर आधार घेतात. अशा या ‘संज्ञानात्मक विसंगती’विषयी..
‘क्युकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका म्हटलं की तुलसी अर्थात अभिनेत्री स्मृती इराणी यांचाच चेहरा समोर येतो. गेल्या काही काळापासून स्मृती इराणी राजकारणात सक्रीय आहेत. पण आता पुन्हा त्या छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. अभिनेत्री रुपाली गांगुली यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'अनुपमा' मालिकेत त्या महत्वपुर्ण भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच अनुपमा या मालिकेने १५ वर्षांचा लीप घेतला आहे. बऱ्याच कलाकारांनी ही मालिका सोडली. टाईम्स नाऊने दिलेल्या बातमीनुसार, स्मृती इरानी या लीपनंतर मालिकेचा एक भाग असणार आहेत.
बांगलादेशात हिंदूंवर जो रक्तरंजित अत्याचार झाला, त्याची अखेरीस दखल संयुक्त राष्ट्रसंघाला घ्यावीच लागली. आपल्या ताज्या अहवालात तेथे 650 जणांचा हिंसाचारात मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्राने मान्य केले आहे. त्याचवेळी प्रत्यक्षात हा आकडा त्यापेक्षाही जास्त असू शकतो, अशीही शक्यता वर्तविली आहे. बांगलादेशातील परिस्थिती जेव्हा चिघळली, तेव्हाच त्वरेने संयुक्त राष्ट्राने हस्तक्षेप करत, त्यावर नियंत्रण मिळवले असते. त्यामुळे नेहमीप्रमाणे ही संयुक्त राष्ट्राला उशिरा आलेली जागच!
देशभरात २०२४ च्या लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये शनिवार, दि. १ जून २०२४ मतदानाची शेवटची फेरीही पार पडली, तथापि, निवडणुकीनंतरही ममता बॅनर्जी यांचे सरकार असलेल्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार सुरूच होता. संदेशखाली आणि कोलकाता मध्ये तृमलूच्या गुंडांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात भाजप कार्यकर्ते जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये बुधवार, दि. २२ मे २०२४ तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी जोरदार निदर्शने केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हत्येच्या निषेधार्थ जागोजागी रस्तारोको करून आपला विरोध केला.
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यापूर्वी पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) गुंडांवर महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
पुण्यामध्ये अनेक ठीकाणी आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाच्या शक्यतेचा अंदाज हवामान खात्याने यापुर्वी वर्तवला होता. त्यानुसार राज्यातील अनेक भागत अवकाळी पावसाची हजेरी लागण्याती शक्यता आहे. गेले अनेक दिवस पुण्यातील तापमानाने उच्चांक गाठला होता.
काँग्रेसमध्ये आपल्याला राजकीय भवितव्य नाही, याची जाणीव झालेले अनेक तरूण नेते पर्यायांच्या शोधात आहेत. सर्वांना भाजप हे एकच आशादायक स्थान वाटते, तर काही नेते भाजपच्या मित्रपक्षांच्या आश्रयाला जात आहेत. लोकसभा निवडणूक जशी जवळ येईल, तशी काँग्रेस आणि अन्य घराणेशाहीवादी पक्षांमधून पलायन करणार्यांची संख्याही वाढेल, यात शंका नाही.
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी देण्यास सुरुवात केली आहे. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले आहेत. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे,
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिला. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले होते. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे, शिवसेना पक्षाची १९९९ च्या घटनेला ग्राह्य धरुन अध्यक्षांनी हा निकाल दिला आहे.
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिला. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले होते. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे.
दाक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेते आणि तामिळनाडूमधील राजकीय व्यक्तीमत्व कॅप्टन विजयकांत यांचे आज दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी चेन्नईत निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, विजयकांत यांना करोना झाला होता. त्यावरील उपचारांसाठी ते गेले काही दिवस चेन्नईमधील MIOT रुग्णालयात दाखल झाले होते.
'पुराणातील वांगी पुराणात’ याप्रमाणे ‘पूर्वजांची पुण्याई ही पूर्वजांचीच’ असे म्हणण्याची वेळ उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिका, वक्तव्ये ऐकली की यावी. या दोघांची आडनावं आणि त्यांच्या धमन्यांतील रक्त त्यांच्या थोर पूर्वजांचं जरी असलं, तरी विचारांची मात्र कमालीची तफावत!
राजकीय पक्षांना देणग्या देणाऱ्या नागरिकांच्या गोपनीयतेचे आणि राजकीय संलग्नतेचे रक्षण करण्यासाठी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून दिलेल्या देणग्यांचा तपशील निनावी ठेवला जातो, असा युक्तिवाद सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला आहे.
मुंबईतील राजकीय वादाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या वरळी मतदारसंघात पुन्हा एकदा संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावावरून भाजप आणि उबाठा गटात वाद पेटला असून दोन्ही पक्षांत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे वरळीच्या मैदानात पुन्हा एकदा राजकीय नुराकुस्तीचा डाव रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
महिला आरक्षण विधेयकावर मतपत्रिकेद्वारे मतदान सुरू झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित आहेत. मतदानप्रक्रियेद्वारे महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाले. महिला आरक्षण विधेयकास नव्या संसदेत मंजूर करण्यात आले असून महिला आरक्षण विधेयक हे पहिलेच विधेयक नव्या संसदेत मंजूर करण्यात आले आहे. ४५४ विरुध्द २ मतांनी विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सध्या दोन ठाकरे अर्थात राज आणि उद्धव ठाकरे असा कलगीतुरा रंगला आहे. त्यात आता भर पडली आहे, दोन पवारांची. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीतच शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मनसेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी अनेक चढ-उतार पाहत स्थित्यंतरे अनुभवली. मात्र, त्यांना नाशिक महापालिका वगळता, अन्यत्र सत्तेची चव चाखता आली नाही.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने आपले वर्चस्व सिद्ध करत सत्ता ताब्यात घेतली. या घटनेला आता दोन वर्षे उलटून गेली. विशेष म्हणजे, दि. १५ ऑगस्टला तालिबानी सत्तेच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त संपूर्ण तालिबानमध्ये शासकीय सुट्टी घोषित करण्यात आली होती. सत्तेत आल्यानंतर तालिबानने अनेक गोष्टींवर निर्बंध आणले, तर अनेक गोष्टींवर थेट बंदी आणली. आता तालिबानने त्याहीपुढे जाऊन राजकीय पक्षांवर कायमची बंदी घातली आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानमध्ये निवडणुकाही होणार आणि ना विरोधी पक्षांचा गोंधळ. तालिबान आता अधिकृतरित्या आपला मनमर्जी
राज्यात सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे महाराष्ट्र दौरे जाहीर झाले आहेत. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आपापल्या संघटना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत
देशातील राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या बोगस देणग्यांच्या संदर्भात आयकर विभागाने बुधवारी गुजरात मध्ये छापेमारी सुरु केली आहे
गुलाम नबी आझादांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत पक्षाची कार्यपद्धती, नेतृत्वाची पुरती पोलखोल केली. परंतु, त्यानंतरही काँग्रेसचे डोळे खाडकन उघडतील आणि या पक्षात काही चमत्कार होईल, हा अंध:विश्वासच ठरावा. त्यानिमित्ताने काँग्रेसमधील नेत्यांची गळती आणि आगामी अध्यक्षीय निवडणुका यांचा आढावा घेणारा हा लेख...
नुकतचं किसिंजर यांचं ‘लीडरशीप’ हे पुस्तक बाजारात आलं आहे. किसिंजर यांनी उत्तम नेतृत्त्वगुणांचं वर्णन करून सांगण्यासाठी वाचकांसमोर सहा नेत्यांची चरित्र मांडली आहेत. किसिंजरनी आपल्या समोर चार्ल्स डि गॉल, कॉनराड अॅडनॉर, ली क्वान यी, रिचर्ड निक्सन अन्वर सादात आणि मार्गारेट थॅचर अशा सहा नेत्यांची चरित्र मांडली आहेत.
राजकीय नेते, कार्यकर्ते, आमदार, खासदार ते नगरसेवक या सर्वांचे संविधान साक्षरतेचे वर्ग घ्यायला पाहिजेत. प्रत्येक पक्षाने हा कार्यक्रम करायला पाहिजे. राजकीय पक्षांना सत्तेद्वारे देश चालवायचा असतो आणि देश संविधानाप्रमाणे चालवावा लागतो.
आमचे सरकार पडणार असा दावा करणारे लोक अतिशय भाबडे आहेत त्यांच्याबद्दल बोलणे म्हणजे तोंडाची वाफ गमावणे असा टोला हाणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांचा समाचार घेतला
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला असून सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिल्याने ठाण्यात भाजपने जल्लोष करीत मिठाईचे वाटप केले. भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. निरंजन डावखरे आणि आ. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सचिव संदीप लेले, कृष्णा भुजबळ तसेच ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी जल्लोष केला.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणसंदर्भातील दिलेला शब्द आमच्या महायुती सरकारने पाळला, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला मान्यता दिली
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूकीतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने आज बाठिंया आयोगाचा अहवाल मान्य केला आहे.
'आता मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे, त्यामुळे...'; नेमकं काय म्हणाले अजित पवार?
आघाडी सरकारच्या काळातील निधी वाटपाच्या निर्णयांचा आढावा घेणार
हिंदूंना मारले तरी हिंदूंनी ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ मात्र म्हणायचे नाही, अशी ‘टाईम’ मॅगझिनची भूमिका. यातूनच ‘टाईम’मॅगझिनचा हिंदूद्वेष किती खालच्या पातळीला गेलेला आहे, त्याचा दाखला मिळतो. पण, धर्मांध मुस्लीम असो वा ‘टाईम’ मॅगझिन असो वा लीना मणिमेकलाई असो, यांचा हिंदूद्वेष किती दिवस चालेल? जोपर्यंत हिंदू शांत, सहिष्णू आहे तोपर्यंत, नंतर?
पवारांनी जे पेरलं तेच आज उगवलं!
महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील वाढता तणाव लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी शनिवारी दि. २५ जून रोजी मुंबई शहरात फौजदारी प्रक्रिया संहितेचे (सीआरपीसी) कलम १४४ लागू केले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी १० जुलै पर्यंत कलम १४४ लागू राहणार असल्याचे सांगितले आहे. पक्ष कार्यालये, आणि नेत्यांची निवासस्थाने या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
शिवसेनेत दोन गट पडल्याने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. आता ही लढाई राजकीय राहिली नसून, ती कायदेशीर लढाई झाली आहे, असे शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले आहेत. आम्ही १६ आमदारांविरुद्ध कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वकिलांचा ही दाखला दिला.
सावरकरांचे हिंदुत्व अपप्रचार आणि वास्तव‘हिंदुत्व’ ही एक सामाजिक-राजकीय संकल्पना आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे, तर हिंदूंच्या न्याय्य, नागरी आणि राजकीय अधिकारांचे संरक्षण म्हणजे ‘हिंदुत्व.’ फक्त हिंदूंच्याच न्याय्य, नागरी आणि राजकीय अधिकारांचे संरक्षण करा, असे सावरकर कधीही म्हणालेले नाहीत.
जम्मू-काश्मीरमध्ये परिसीमनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आयोगाने तो अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. या परिसीमनानंतर प्रदेशातील राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलणार असून जम्मू- काश्मीरमध्येही प्रथमच हिंदू मुख्यमंत्री होण्याची शक्यता बळावली आहे.
"ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील असून त्यात नक्कीच यशस्वी ठरू.", असा दावा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात आला.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी नवीन राजकीय पक्ष स्थापना करण्याचे संकेत दिले होते. पण सध्या असा कुठलाही विचार नसून आपण २ ऑक्टोबर पासून ३ हजार किलोमीटरच्या पदयात्रेला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे
राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर हे राजकारणात त्यांचा नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचे संकेत त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिले आहेत
तामिळनाडू सरकारचा राज्यातील वन्नियार समुदायास शिक्षण आणि सरकारी नोकर्यांमध्ये साडेदहा टक्के आरक्षण देणारा कायदा रद्द करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे