शिवसेना शिंदेंचीच! पण ठाकरे गटाचे आमदारही ठरले पात्र, वाचा सविस्तर...

    10-Jan-2024
Total Views |
thakrey mla
 
मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिला. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले होते. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे, शिवसेना पक्षाची १९९९ च्या घटनेला ग्राह्य धरुन अध्यक्षांनी हा निकाल दिला आहे.
 
भरत गोगावले यांची प्रतोद म्हणुन नियुक्ती योग्यच आहे. आणि त्यांनी काढलेली व्हीपच योग्य आहे असा निकाल विधानसाभा अध्यक्षांनी दिला आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. विधीमंडळ पक्ष ज्याचा असतो त्याचाच मुळ पक्ष असतो. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही असही अध्यक्ष पुढे म्हणाले. त्यामुळे आता शिंदेचा पक्षच मुळ शिवसेना राजकीय पक्ष असणार आहे.
 
शिंदेंचा पक्षच मुळ शिवसेना असा निकाल जरी दिला गेली असला तरीही ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र ठरवण्यात आले नाही. विधानसाभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही आमदारावर अपात्रतेची कारवाई केली जाणार नाही. कोणत्याही आमदारास अपात्र ठरवले नसले तरी ठाकरे गटाने आम्हाला हा निकाल मान्य नाही व आम्ही न्यायालयात जाणार अशी भूमिका घेतली आहे.