"४ जूननंतर तुम्हाला विधवा बनवू"; ममतांच्या पक्षातील गुंडांची संदेशखालीतील महिलांना धमकी

    03-Jun-2024
Total Views | 126
 Sandeshkhali
 
कोलकाता : देशभरात २०२४ च्या लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये शनिवार, दि. १ जून २०२४ मतदानाची शेवटची फेरीही पार पडली, तथापि, निवडणुकीनंतरही ममता बॅनर्जी यांचे सरकार असलेल्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार सुरूच होता. संदेशखाली आणि कोलकाता मध्ये तृमलूच्या गुंडांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात भाजप कार्यकर्ते जखमी झाल्याचे वृत्त आहे.
 
जानेवारी २०२४ पासून हिंसाचाराचा सामना करत असलेल्या संदेशखाली येथे पुन्हा एकदा पोलीस आणि महिलांमध्ये हाणामारी झाली आहे. येथे आंदोलन करणाऱ्या महिलांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. अटकेला विरोध करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. एका व्यक्तीला अटक केल्याच्या निषेधार्थ या महिला आंदोलन करत होत्या.
 
 
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, निवडणुकीच्या एका दिवसानंतर टीएमसीचे कार्यकर्ते संदेशखाली येथे जात आहेत आणि दि. ४ जूननंतर सर्वांना विधवा बनवू, असे सांगत आहेत. त्यांनी पश्चिम बंगाल पोलिसांवर टीएमसीच्या गुंडांशी संगनमत करून महिलांना धमकावल्याचा आरोप केला. निवडणुकीच्या दिवशीही संदेशखालीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता.
 
या दिवशी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. निवडणुकीदरम्यान भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या डोक्यालाही हल्ल्यात दुखापत झाली होती. इतर लोकसभा मतदारसंघातूनही हिंसाचाराच्या बातम्या आल्या. संदेशखळी येथे सध्या कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
 
पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी राज्य सरकारला या हिंसाचारावर कारवाई करण्यास सांगितले आहे. मतदानानंतर महिलांवर झालेल्या हल्ल्यांच्या बातम्या ऐकून आपण काळजीत असल्याचे त्यांनी सांगितले. हल्ले सुरूच राहिल्यास राजभवनाचे दरवाजे उघडणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे.
 
 
कोलकाता येथे भाजपच्या एका पोलिंग एजंटला टीएमसी कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. कोलकाता उत्तर मध्य भाजपचे उमेदवार तपस रॉय यांचे बुथ एजंट भाजप कार्यकर्ते रमेश साओ यांनी आरोप केला की निवडणुका संपल्यानंतर टीएमसीच्या गुंडांनी त्यांना एका ठिकाणी नेले आणि त्यांना बेदम मारहाण केली.
 
नादियामध्ये सुद्धा अघोषित कर्फ्यूची परिस्थिती आहे. येथे भाजप कार्यकर्ता हाफिझुल शेख याला गोळी लागली. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या भीतीमुळे निवडणूक आयोगाने निकालानंतर १५ दिवसांपर्यंत केंद्रीय सुरक्षा दलांना येथून हटवणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121