आता राजकीय नव्हे, कायदेशीर लढाई: अरविंद सावंत

    26-Jun-2022
Total Views |
Eknath
 
 
 
मुंबई: शिवसेनेत दोन गट पडल्याने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. आता ही लढाई राजकीय राहिली नसून, ती कायदेशीर लढाई झाली आहे, असे शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले आहेत. आम्ही १६ आमदारांविरुद्ध कायदेशीर कारवाईला सुरुवात केली आहे. रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वकिलांचा ही दाखला दिला.
 
 
एखाद्या आमदाराने स्वेच्छेने पक्ष सोडल्यास तो आमदारकी रद्द होण्यास पात्र ठरतो, किवा त्यांनी कुठेही पक्षविरोधी मतदान केले तर त्यांची आमदारकी रद्द करता येते. संविधानाच्या दहाव्या शेड्युलच्या दोन अ आणि ब सेक्शनचा दाखला देत सर्वोच्च न्यायालयाच्या देवदत्त कामत यांनी ही माहिती दिली. परंतु, हे आमदार अजूनही शिवसेनेतच आहेत. आणि त्यांच्या विविध प्रश्नांवर वेळोवेळी साद घालून पण प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज ही वेळ आली आहे. वेळेत आमदार निधी न मिळणे, मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी वेळ न मिळणे, विधानसभेत बोलायला, प्रश्न मांडायला वेळ न मिळणे, शिवसेनेचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्रीपदी विराजमान असूनसुद्धा शिवसेना आमदारांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळणे. या आणि अशा अनेक कारणांमुळे नाराज असलेले आमदार गुवाहाटीला जाऊन बसले आहेत. परंतु पक्षांतर्गत या आमदारांवर कारवाईची मागणी 'काही' नेते करताना दिसत आहेत. दुसरीकडे शिंदे गटाने देखील कायदेशीर बाबींची पडताळणी करून, या बाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्प मतात असतानाही शरद पवार शिवसेनेला पूर्ण पाठींबा असल्याचे सांगतात, आता हा पाठींबा पाठबळ देणारा ठरतो का पाठकणा मोडणारा हे पाहावे लागेल.