मुंबई : "ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील असून त्यात नक्कीच यशस्वी ठरू.", असा दावा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात आला. पुढील २ आठवडण्यात निवडणुकीची तारीख निश्चित करावी या न्यायालयाने दिलेल्या आदेशासंदर्भात ते शनिवारी (दि. ७ मे) मध्यमांशी बोलत होते.
"निवडणूक आयोगाने आपली प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे त्यासंदर्भातला निकालही लवकरच येईल. ओबीसीला आरक्षण देण्यासाठी, इम्पेरिकल देटा गोळा करण्यासाठी भाटिया कमिशन रात्रंदिवस काम करतंय. त्यामुळे मला असं वाटतं, ओबीसींना आरक्षण देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील असून त्यात नक्कीच यशस्वी ठरू.", असे छगन भुजबळ यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाअंतर्गत होणार की आरक्षणाविना? असा प्रश्न उद्भवला आहे.