विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर संजय राउतांचा तिळपापड!

    10-Jan-2024
Total Views | 84
 sanjay raut
 
मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी दिला. १२०० पानांचा निकाल घेऊन अध्यक्ष विधानभवनात पोहोचले होते. शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रकरणी ठाकरे गटाची घटना दुरूस्ती नियमबाह्य असल्याचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले आहे. तसेच, ठाकरे गट उलटतपासणीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे.
 
भरत गोगावले यांची प्रतोद म्हणुन नियुक्ती योग्यच आहे. आणि त्यांनी काढलेली व्हीपच योग्य आहे असा निकाल विधानसाभा अध्यक्षांनी दिला आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही असही अध्यक्ष पुढे म्हणाले. त्यामुळे आता शिंदेचा पक्षच मुळ शिवसेना राजकीय पक्ष असणार आहे.
 
उबाठा गटाचे नेते संजय राउत यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. संजय राउतांचा या निकालानंतर तिळपापड झालेला पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे प्रतोद भरत गोगोवले यांच्यावर त्यांनी पातळी सोडुन टिका केली आहे.
 
आमच्या रक्ता रक्तात शिवसेना आहे, महाराष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे अस मत त्यांनी व्यक्त केले आहे. निवडणुक आयोग म्हणजे चोरांचे सरदार आहेत असही ते यावेळी म्हणाले. विधानसभा अध्यक्षबेकायदेशीर आहेत. आणि शिंदेंच्या १६ आमदारांना अपात्र ठरवणे हाच योग्य मार्ग होता असही ते म्हणाले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121