"महिला आयोग असो किंवा पोलिस, हलगर्जीपणा करणाऱ्या...;" कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर काय म्हणाल्या चित्रा वाघ?

    28-May-2025
Total Views | 22
 
Chitra Wagh
 
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात ज्यांच्या कुणाकडून हलगर्जीपणा झाला मग तो महिला आयोग असो पोलिस असोत किंवा भरोसा सेलच्या महिला पोलिस असो, सगळ्यांची चौकशी होईल. तसेच ज्यांच्याकडून चुका झाल्या असतील त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा होईल, अशी ग्वाही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली.
 
मंगळवार, २७ मे रोजी त्यांनी कस्पटे कुटुंबियांची भेट घेतली. चित्रा वाघ म्हणाल्या की, "कस्पटे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर वैष्णवीला गमावल्याचे दुःख प्रकर्षाने जाणवले. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी राजेश केवाडिया यांना सरकारी वकील म्हणून नेमा अशी मागणी केली आहे. मला विश्वास आहे की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ही केस त्यांच्याकडेच देतील. त्याचबरोबर या प्रकरणात वैष्णवीच्या सासूचा भाऊ IG सुपेकर असून ते आरोपींना मदत करत असल्याचे कस्पटे कुटुंबियांचे म्हणणे आहे. लक्षात ठेवा हे महायुती सरकार आहे. इथे कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्यामुळे संबंधित IG सुपेकर जर आरोपींना मदत करत असल्याचे आढळले, तर देवेंद्रजी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करतील, याची मला खात्री आहे." असे त्या म्हणाल्या.
 
वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या!
 
त्या पुढे म्हणाल्या की, "खरंतर वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली नाही तर ती हत्याच आहे हे पुन्हा एकदा परीवाराशी बोलतांना प्रकर्षाने जाणवले. राक्षसी हगवणे परिवाराने तिच्या शरीराचा असा कुठला भाग सोडला नव्हता ज्यावर माराचे वळ नव्हते. ही माणसं नाहीत लांडगे हैवान असून यांना ठेचूनच काढायला हवे. या प्रकरणात ज्यांच्या कुणाकडून हलगर्जीपणा झाला मग तो महिला आयोग असो पोलिस असोत की, भरोसा सेल च्या महिला पोलिस असो सगळ्यांची चौकशी होईल ज्यांच्या कडून चुका झाल्या असतील त्यावर कार्यवाही ही होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
"या प्रकरणामुळे हुंडाबळीसारख्या अनेक प्रकरणांना वाचा फुटली आहे. पिडीत मुलींना विश्वास वाटतो सरकार त्यांच्यासोबत असून त्यांना नक्की न्याय मिळेल. मुली पुढं येताहेत, तक्रारी दाखल करताहेत, गुन्हे नोंद होताहेत, कार्यवाही होतीये आणि आता या हुंडाविरोधात लढण्याची आपल्या सर्वांचीच सामाजिक जबाबदारी वाढली आहे हे आपणही विसरता कामा नये," असेही त्या म्हणाल्या.
 
लेकीचे सुख हुंडा देऊन विकत घेता येत नाही!
 
"जिथे वैष्णवी राहात होती त्याच भागात तिच्या हत्येनंतर दोन-तीन लग्न झाली. पुन्हा त्यात तेच किलोभर सोनं गाड्या देत मुलींना सासरी पाठवलं. हे ऐकून मनस्वी दुःख झालं आणि संतापही आला. मी समस्त मुलींना आणि पालकांना हात जोडून विनंती करते की, तुमच्या लेकीचे सुख हुंडा देऊन विकत घेता येत नाही आणि येणारदेखील नाही ही खूणगाठ मनाशी बांधा. तिला हुंडा मागणाऱ्यांच्या घरात देऊच नका. किंबहुना कोणी तुमच्याकडे हुंडा मागितला तर त्याला पोलिसांच्या हाती सुपूर्द करा," असे आवाहनही चित्रा वाघ यांनी यावेळी केले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिजाबमुक्त कझाकस्तानच्या दिशेने सरकारचे मोठे पाऊल सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी

हिजाबमुक्त कझाकस्तानच्या दिशेने सरकारचे मोठे पाऊल सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी

इस्लामिक देश कझाकस्तानने सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घालत हिजामुक्त कझाकस्तान करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे येथील स्त्रीयांसाठी हा मोठा निर्णय असून त्यांना आता समाजात वावरताना मोकळा श्वास घेता येणार असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. कझाकस्तानचे पंतप्रधान कासिम जोमार्ट टोकायेव यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केलीय. खरंतर चेहरा झाकण्यावर बंदी घालणाऱ्या कायद्यात कोणत्याही एका धर्म किंवा त्याच्या पोशाखाचा उल्लेख नाही, पण इतकं मात्र स्पष्ट आहे की सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121