
मोखाडा: दिनांक २ जुलै २०२५ रोजी कै नवसु दादा वळवी तोरणशेत मोखाडा येथे निधन झाले. ठाणे जिल्हा आदिवासी वनौषधी पारंपरिक उपचार संघ ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. ते आयुर्वेदिक वनस्पतींचे उत्तम जाणकार होते. तसेच ते देवबांध मंदिर, अनेक सामाजिक यात्रा आणि सांस्कृतीक इतिहासाचे अभ्यासक होते. पु डॉ हेडगेवार पुरस्कार, दधिची पुरस्कार,वनबंधू परिषद पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले होते.