
धाराशिव: पानगाव इथे गावकर्यांनी ठराव संमत करून पारधी समाजाच्या दहा कुटूंबावर बहिष्कार टाकला. राज्यभरात या घटनेचा तिव्र निषेध होत आहे .
भटके विमुक्त विकास परिषदेच्या कार्यकर्त्यानी या कुटूंबाना भेट दिली. यावेळी भटके विमुक्त परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ संजय पुरी, उमेश जोग, गिरीश काळे, विष्णू गिरी यांनी गावच्या तहसिलदारांशी संपर्क साधून या घटनेवर कार्यवाही करण्याची मागणी केली. या कुटूबांच्या घरांना आगही लागवण्यात आली. त्यामध्ये त्यांचे घर, दुचाकी वाहन आणि अस्तित्वाचा दाखला देणारे कागदपत्रही जळून खाक झाले. महाराष्ट्र शासनाने या घटनेची दखल घेत त्वरीत पारधी कुटूंबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली आहे