शिक्षक परिषदेचे कार्य महाराष्ट्रात अविरतपणे सुरू राहणार; शिक्षक परिषदेच्या प्रांत बैठकीत भिखाभाई पटेल यांचे प्रतिपादन

    03-Jul-2025   
Total Views |

मुंबई  : शिक्षक परिषदेचे कार्य महाराष्ट्रात आता न थांबता अविरतपणे सुरू राहणार, असे प्रतिपादन शिक्षक परिषदेचे अ.भा राष्ट्रीय उपाध्यक्ष भिखाभाई पटेल यांनी केले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची प्रांत कार्यकारिणी बैठक ठाणे येथील भारतीय स्री जीवन विकास परिषदेच्या कार्यालयात प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सरस्वती वंदना व दीप प्रज्वलन करून सांघिक पद्याने बैठकीची सुरुवात झाली.

ठाणे येथे झालेली बैठक ही संघटनेला ऐतिहासिक दिशा देणारी असेल त्यामुळे प्रत्येकाने कार्य करावे शिक्षक परिषदेचे कार्य हे ईश्वरी कार्य असल्याचे भिखाभाई पटेल यांनी सांगितले.

संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांनी शिक्षकांचे कार्य विद्यार्थी घडवणे म्हणजेच संस्कारित माणूस घडवणे असल्याचे सांगितले. सक्षमपणे देश चालवण्यासाठी व्यवस्था लागते या व्यवस्थेत मानव संशाधन पुरवण्याचे पवित्र काम शिक्षकांच्या हातून घडत असते. असे प्रतिपादन करून शैक्षिक महासंघ संलग्नित शिक्षक परिषदेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

अ.भा राष्ट्रीय कोषाध्यक्ष संजयकुमार राऊत यांनी कार्यक्रमाबाबत, प्रशिक्षण प्रकोष्ट प्रमुख डॉ शेखर चंद्रात्रे यांनी प्रशिक्षणाची आवश्यकता व आयोजनाबाबत, राष्ट्रीय सचिव प्रा. प्रदीप खेडकर यांनी अखिल भारतीय बैठकीच्या वृत्ताबाबत, संघटनमंत्री सुरेश दंडवते यांनी पंच परिवर्तन याविषयी मार्गदर्शन केले.

बैठकीत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली व त्या सोडवण्यासाठी शिक्षक परिषदेच्या वतीने सर्व आघाड्यांवर पाठपुरावा करण्यात येईल असा ठराव सम्मत करण्यात आला.

या बैठकीत शिक्षक परिषद माध्यमिकचे प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू, संघटनमंत्री किरण भावठाणकर, प्राथमिकचे प्रांत कार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे, प्रांतकार्याध्यक्ष रमेशभाऊ क्षीरसागर, प्रांत प्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे, उपाध्यक्ष डॉ.अवधूत वानखेडे, प्रांत सहकार्यवाह किशोर पिसे, यांच्यासह 19 जिल्ह्यातील 78 कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

किरण कुंभार यांची प्रांत कार्याध्यक्षपदी, गोपाळ गायकवाड यांची परभणी जिल्हाध्यक्षपदी, अमृत देशमुख यांची परभणी जिल्हा कार्यवाहपदी, नरेश वाघ यांची वर्धा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीचा संघटनात्मक आढावा व संघटनात्मक सूचना प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे यांनी दिल्या तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वैशाली काकडे यांनी केले. आभार प्रांत सहकार्यवाह नितीन पवार यांनी मानले कल्याण मंत्राने बैठकीचा समारोप करण्यात आला.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक