अमेरिकेत इस्कॉन मंदिरावर गोळीबार; २० ते ३० गोळ्या झाडत अज्ञातांकडून मोठे नुकसान

    03-Jul-2025   
Total Views |

मुंबई
: अमेरिकेत श्री श्री राधा कृष्ण इस्कॉन मंदिराला लक्ष्य करत मंदिरावर गोळ्या झाडल्याचे वृत्त समोर आले आहे. मंदिर परिसरात रात्रीच्या वेळी २० ते ३० गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले. ही घटना मंदिरात भाविक असताना घडली.

सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने स्पॅनिश फोर्क, युटा येथील इस्कॉन श्री श्री राधा कृष्ण मंदिरात झालेल्या अलीकडील गोळीबाराच्या घटनेचा तीव्र निषेध केलाय. तसेच गुन्हेगारांविरोधात जलद कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी ९ मार्च रोजी कॅलिफोर्नियातील चिनो हिल्स येथील बॅप्स हिंदू मंदिरातही अशीच घटना घडली. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या तथाकथित 'खलिस्तानी जनमत'च्या काही दिवस आधी या मंदिराची विटंबना करण्यात आली होती.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक