हिजाबमुक्त कझाकस्तानच्या दिशेने सरकारचे मोठे पाऊल सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी

    03-Jul-2025   
Total Views |

मुंबई : इस्लामिक देश कझाकस्तानने सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घालत हिजाबमुक्त कझाकस्तान करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे येथील स्त्रीयांसाठी हा मोठा निर्णय असून त्यांना आता समाजात वावरताना मोकळा श्वास घेता येणार असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. कझाकस्तानचे पंतप्रधान कासिम जोमार्ट टोकायेव यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केलीय. खरंतर चेहरा झाकण्यावर बंदी घालणाऱ्या कायद्यात कोणत्याही एका धर्म किंवा त्याच्या पोशाखाचा उल्लेख नाही, पण इतकं मात्र स्पष्ट आहे की सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी राहील.

मिळालेल्या माहितीनुार, कझाकस्तानात आता अशा कोणत्याही प्रकारचे कपडे येथे परिधान करता येणार नाहीत, ज्यामुळे चेहऱ्याची ओळख पटू शकणार नाही. तरीही, काही बाबतीत सूट देण्यात आली आहे. वैद्यकीय कारणांमुळे किंवा खराब हवामानात चेहरा झाकण्यावर कोणतीही बंदी नसेल. तसेच खेळ किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, गरजेनुसार चेहरा झाकणारे कपडे परिधान करता येतील. पंतप्रधान टोकायेव म्हणतात, चेहरा झाकणारे काळे कपडे परिधान करण्यापेक्षा, कझाख संस्कृतीचे कपडे परिधान करणे अधिक चांगले. आपली संस्कृती आणि पारंपरिक पोशाख यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

कझाकस्तान जगाला आपल्या पारंपरिक सांस्कृतिक ओळखीची जाणीव करून देण्यावर भर देत आहे. धर्म हा वैयक्तिक बाब आहे, पण पोशाख असा असावा की ज्यातून आपली राष्ट्रीय ओळख स्पष्टपणे दिसून यावी. असे राष्ट्राध्यक्ष टोकायेव यांचे मत आहे. या देशातील लोकांनी धार्मिकदृष्ट्या इस्लाम स्वीकारला असला, तरी या देशाच्या सांस्कृतिक मुळांची जोड सोव्हिएत युगाशी आहे. येथे सोव्हिएत मूल्यांचा प्रभाव आहे, म्हणूनच हिजाबपासून मुक्तता हवी असे जनतेला वाटत होते.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक