उद्धव ठाकरे वगळता सर्वच महत्वाच्या नेत्यांचे महाराष्ट्र दौरे जाहीर!
12-Sep-2022
Total Views | 38
मुंबई : राज्यात सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे महाराष्ट्र दौरे जाहीर झाले आहेत. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आपापल्या संघटना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. तरीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजून घरातच बसणार आहेत असे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे सर्वच प्रमुख नेते, मनसेप्रमुख राज ठाकरे या सर्वच प्रमुख नेत्यांचे राजकीय दौरे जाहीर झाले आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरेंचे १७ सप्टेंबरपासून 'मिशन विदर्भ' सुरु होत आहे. राज ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका, पक्षसंघटेनेची बांधणी या सर्व गोष्टी त्यांच्या या दौऱ्यात होणार आहेत. तरीही उद्धव ठाकरे सुधारण्याचे नाव घेत नाहीत. आधी कोरोना मग प्रकृतीचे कारण देत उद्धव ठाकरेंनी घरातच राहणे पसंत केले आहे. अजूनही त्यांचा दौरा जाहीर झालेला नाही.
उद्धव ठाकरेंच्या या अशा घरात राहण्यामुळेच शिवसेनेत बंड झाले. उद्धव ठाकरेंनी प्रकृतीचे कारण देत, आपल्या पदाधिकाऱ्यांनाही भेटायला वेळ दिला नाही. पदाधिकाऱ्यांचे प्रश्न समजून घेतले नाहीत, त्यांच्या मागण्या समजून घेतल्या नाहीत. या मुळे चिडीस पेटून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अभुपुर्व बंड झाले. या बंडामुळे शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तरीही त्यांची मूळ सवाल जात नाही. अजूनही त्यांच्याकडून जुन्याच चुकांची पुनरावृत्ती होत आहे. अशाप्रकारे पक्ष विनाशाच्या वाटेवरच निघाला आहे हे स्पष्ट होत आहे.