नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयकावर मतपत्रिकेद्वारे मतदान सुरू झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित आहेत. मतदानप्रक्रियेद्वारे महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाले. महिला आरक्षण विधेयकास नव्या संसदेत मंजूर करण्यात आले असून महिला आरक्षण विधेयक हे पहिलेच विधेयक नव्या संसदेत मंजूर करण्यात आले आहे. ४५४ विरुध्द २ मतांनी विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
दरम्यान, महिला आरक्षण विधेयकाच्या माध्यमातून महिलांच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून या विधेयकावर चर्चा करण्यात येत होती. या चर्चेस सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षीयांनीदेखील उपस्थिती लावली होती. दोन तृतीयांश बहुमतानं महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले.
नारी शक्ती वंदन अधिनियम असे या विधेयकाचे नाव असून या विधेयकानुसार, महिलांना लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. केंद्रीय कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले होते. त्यानुसार, संसदेत ७ तास चर्चा झाली. आता हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाणार आहे.