" माणिक वर्मा यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असंख्य पैलू दडले होते, वास्तविक माणिक वर्मा म्हणजे परिपूर्णतेचा साक्षात्कार होता" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. दिवंगत गायिका माणिक वर्मा यांच्या सांगीतिक जीवनाचा आढावा घेणाऱ्या " माणिक मोती" या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, लेखक अच्युत गोडबोले, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, जेष्ठ शास्त्रीय संगीतकार विकास कशाळकर, चैतन्य कुंटे, माणिक वर्मा यांच्या शिष्य
Read More
भारतीय संगीत, वाद्य, तालशास्त्र आणि भारतीय पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व जनसामान्यांना पटवून देणार्या स्वोजस बिलुरकर यांच्याविषयी...
गानसूर्य भास्करबुवा बखले यांच्या स्मरणार्थ दि. १० जुलै, १९२६ कल्याणमध्ये ‘कल्याण गायन समाज’ या संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत सूरप्रेमींचे हक्काचे स्थान म्हणून ‘कल्याण गायन समाज’ची ओळख आहे. आज ९७ वर्षे पूर्ण होत असताना आपले स्थान गायन समाजाने जपले आहे. ‘कल्याण गायन समाजा’च्या सुरेल कारकिर्दीचा या लेखात मागोवा घेतला आहे.
शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी एक खास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वस्तिक’गोवा तर्फे डॉ. पं. प्रविण गावकर यांचे शास्त्रीय संगीतावरील रियाजाच्या ‘स्वरयज्ञ’ तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर २२ ते २४ डिसेंबर २०२३ या कालावधीत रोजी गोव्यातील साळ मधील राऊत फार्म या निसर्ग रम्य ठिकाणी होणार आहे. या शिबिरात ८ ते ६० वर्ष वयोगटातील संगीत प्रेमींना यात सहभाग घेता येणार आहे. दरम्यान, या शिबिराचे आयोजन गेले १६ वर्ष केले जात आहे.
संगीत, गायन, लेखन आणि पक्षी निरीक्षण अशा चहू अंगांनी कालवेध घेणारे अरविंद परांजपे यांचा संक्षिप्त परिचय करुन देणारा हा लेख...
तबलावादनात विशेष कौशल्य प्राप्त करणारा आणि संगीत क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा नाशिकचा युवा तबलावादक गौरव तेजाळे याच्याविषयी...
स्वच्छ, सुंदर आणि मोकळे स्वर आणि शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाची सुरीली बैठक असलेल्या अबोली ठोसर यांनी रसिकमनांवर अधिराज्य गाजविले, त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया...
’दीप’ रागाच्या गायनाने राजा विक्रमादित्याच्या अंगाचा विलक्षण तर नव्हेच; पण साधा दाहसुद्धा झाला नव्हता. तो दाह शांत करण्याकरिता त्याला कोणत्या राजकुमारीच्या मेघ रागाची आवश्यकता नव्हती. मियाँ तानसेनने ‘दीपक’ राग गायिला; पण त्यात त्याच्या देहाचा अतिशय दाह झाला. तो दाह त्याच्या कोण्या प्रेयसीने मेघ राग गाऊन पर्जन्याने शांत केला, असे म्हणतात. राजा विक्रमादित्याचा ‘दीपक’ राग गायनाने अंगाचा मुळीच दाह झाला नाही. लेखकाचाही असाच स्वतःचा थोडा अनुभव आहे. मग राजा विक्रमादित्याचा ‘दीपक’ राग कोणता? तो खरा की खोटा?
"भारतस्य संगीत विश्वानुबंध यात्रा हा ग्रंथ भारतीय संगीताच्या उत्क्रांतीचा मानववंशशास्त्रीय आढावा आहे. आणि म्हणूनच हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे." असे उद्गार पं. अरुण द्रविड यांनी भारतस्य संगीत विश्वानुबंध यात्रा या ग्रंथाच्या प्रकाशन समारोहावेळी काढले. तर विदेशी भारतीय संगीत उपासकांचा देखील विचार मुंबई तरुण भारत ने केला, ही मोठी बाब आहे, असे पंडित रोणू मजुमदार म्हणाले. दै. मुंबई तरुण भारत आणि सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, यांनी संयुक्त रित्या साकारलेल्या 'भारतस्य संगीत विश्वानुबंध यात्रा या ग्रंथाचे प्रका
एक कथा प्रचलित आहे. त्यातील शास्त्रीयता पडताळून पाहण्यासारखी आहे. एक संगीतज्ज्ञ गायक गुरू होते. त्यांचा मुलगा आठ वर्षांचा झाल्यावर त्यांनी त्याला तंबोरा लावायला शिकवले. तंबोरा लावण्याचा अभ्यास झाल्यावर गायकगुरूंनी मुलाला खर्जसाधन करायला सांगितले. वर्ष उलटून गेले तरी गायक गुरू मुलाला खर्जाव्यतिरिक्त स्वर लावायला सांगेनात.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक विश्वसनीय आणि अभ्यासपूर्ण नाव म्हणजे दीपक राजा. दीपक राजांचा संगीताच्या नोट्स लिहिण्यापासून सुरू झालेला प्रवास थोडक्यात जाणून घेऊया...
शिक्षण मिळाले नाही तर आपल्या आवडीच्या क्षेत्रातही उत्तम कारकीर्द घडवता येते आणि ते क्षेत्र कलेचे असेल तर आनंदाची अनुभूती येते, हे सांगणार्या विकास पावसकर यांच्याविषयी...
शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताचे धडे गिरविलेल्या नुपूर काशीद-गाडगीळ हिने आकाशवाणीवर झालेल्या संगीत स्पर्धेत भारतातून पहिले येण्याचा मान २००८साली मिळविला होता. अशा या नुपूरचा सांगीतिक प्रवास उलगडणारा हा लेख.
वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर शास्त्रीय संगीत, नाट्य संगीतात काम करत असूनही लतादीदींनी सिनेसंगीताची निवड केली व त्यातच त्या पुढे गेल्या. भाषा कोणतीही असो, संगीतप्रेमींना त्या आपल्या दैवी आवाजाची अनुभूती देत राहिल्या. मराठी भाषिक असूनही लतादीदींनी हिंदी चित्रपटांत सर्वाधिक गाणी गायली आणि अमराठी जनमानसावरही आपल्या सुरेल आवाजाने अधिराज्य गाजवले.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना नुकताच ‘पद्मविभूषण’ हा बहुमान जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या सृजनशील कार्याचा परिचय करून देत आहेत त्यांचे वरिष्ठ शिष्य व युवा पिढीतील सुप्रसिद्ध गायक डॉ. अतींद्र सरवडीकर...
संगीतक्षेत्रात विविध स्तरावर मुशाफिरी करून शास्त्रीय संगीताचे ज्ञान समृद्ध करणार्या शास्त्रीय गायिका आणि गुरू डॉ. प्रभा अत्रे यांच्याविषयी...
हिंदी-मराठी रसिकजनांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्या सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या सुरेल कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच विविध संगीत प्रकारात मुशाफिरी करून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणार्या गायिका शुभा मुद्गल यांच्याविषयी...
‘मोहन वीणे’ची निर्मिती करून तिला भारतीय शास्त्रीय संगीताच्या मुख्य प्रवाहात आणणार्या पं. विश्व मोहन भट्ट यांच्याविषयी...
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची ध्वजा गेली सात दशके डौलानं फडकती ठेवणार्या पंडित जसराज यांचं १७ ऑगस्ट रोजी निधन झालं. पंडितजींच्या गाण्यात चैतन्याचा सुवास होता. गुरूंच्या अनन्य भक्तीची आर्जव होती. स्वर परमात्म्याचं राजस-लोभस अस्तित्व होतं आणि सर्व रसिक श्रोत्यांना शरीराच्या अस्तित्वासह त्या स्वर परमात्मात तादात्म्य पावण्यासाठी लागणारी दैवी ऊर्जा होती. पंडित जसराजांना मानवंदना म्हणून त्यांच्यावर हा विशेष लेख...
भारतीय शास्त्रीय संगीताचे आधारवड पं. जसराज यांचे नुकतेच देहावसान झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचा आढावा घेणारा हा लेख...
वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कलियुगात ज्यांच्या बासरीची सुरावट कृष्णाची आठवण करुन देते, असे महान कलाकार पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याविषयी...
आपल्या वडिलांनंतर भारतीय शास्त्रीय संगीताला सितारवादनाच्या माध्यमातून नवीन आयाम देणार्या अनुष्का शंकर यांच्याविषयी....
भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक तरुण, उमदा आवाज म्हणजे कौशिकी चक्रवर्ती. त्यांच्या सुरेल कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख...
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने नुकत्याच शोधलेल्या व्हीपी नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका ग्रहाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील उस्ताद पंडित जसराज यांचे नाव दिले. त्यामुळे आता ग्रह ताऱ्यांना सुद्धा पंडित जसराज यांच्या सुरांची सर लाभली ही खूपच आनंदाची आणि भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.
एचएसबीसी यांच्या सहयोगाने 'नॅशनल सेंटर फॉर द परफॉरमिंग आर्ट्स' (एनसीपीए) सादर करीत आहे एनसीपीए बंदिश. तीन दिवसांच्या या उत्सवाची १०;वी आवृत्ती टाटा थिएटर, एनसीपीए येथे दिनांक २३ ते २५ ऑगस्ट २०१९ पर्यंत साजरी होणार आहे.
‘मत्स्यगंधा’मधील सगळी गाणी व्यवस्थित ध्वनिमुद्रित झाली. त्याच दिवशी संध्याकाळी घरी जाताना त्यांनी मला विचारलं, “अशोक, तू माझ्याबरोबर सहायक म्हणून राहू शकशील का? तुझी इच्छा काय आहे?” मग काय, मी क्षणाचाही विलंब न करता लगेच होकार कळवला. एवढी सुवर्णसंधी कोण सोडणार? आणि त्या दिवसापासून मी त्यांच्याबरोबर राहू लागलो. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाण्याचे भाग्य मला लाभले. अभिषेकी बुवांमुळे मला संगीतक्षेत्रात खूप काही नवीन शिकायला, अनुभवायला मिळाले.
धृपद ही भारतीय संगीतातील सर्वात जुनी शैली आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध तसेच कलाप्रकारातील प्रख्यात, उमाकांत आणि रमाकांत गुंडेचा आणि त्यांच्या वरिष्ठ शिष्यांकडून शिकण्याची ही अविस्मरणीय संधी उपलब्ध आहे
नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) आपल्या ५० वर्षांच्या प्रवासाचा सोहळा म्हणून सादर करीत आहेत भातखंडे परंपरा : रामदास भटकळ यांचे सादरीकरण. शुक्रवार, दिनांक १४ जून, २०१९ रोजी एनसीपीएच्या वेस्ट रूम १ मध्ये हा कार्यक्रम सादर होणार आहे.
ज्येष्ठ बासरी वादक पं. केशव गिंडे यांना राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०१८ जाहीर झाला आहे.
पं. उल्हास कशाळकर यांना गायन क्षेत्रातील दीर्घ साधन, कल्पकता व घराणेदार गायन परंपरा जोपासण्याबद्दल २०१७ – १८ या वर्षासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.