पंडित जसराजांच्या सुरांची दखल चक्क ग्रह ताऱ्यांनी सुद्धा घेतली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019
Total Views |


आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने नुकत्याच शोधलेल्या व्हीपी नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका ग्रहाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील उस्ताद पंडित जसराज यांचे नाव दिले. त्यामुळे आता ग्रह ताऱ्यांना सुद्धा पंडित जसराज यांच्या सुरांची सर लाभली ही खूपच आनंदाची आणि भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत पंडित जसराज हे असे पहिलेच कलाकार आहेत ज्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला आहे.

त्यामुळे आता मंगल आणि गुरु यांच्या दरम्यान सापडलेल्या या लघुग्रहाचे नाव आता 'पंडित जसराज' यांच्या नावाने ओळखले जाईल. पंडित जसराज हे मेवाती घराण्याचे एक प्रसिद्ध गायक आहेत ज्यांनी आपल्या भारतीय संगीत सृष्टीला एक अद्वितीय स्थान मिळवून दिलेच पण त्याचबरोबर जगभरात भारतीयांचे नाव उज्ज्वल केले.

आयुष्याचा ८० वर्षांहून अधिक काळ त्यांनी संगीत साधना केली आहे. त्यांचे सूर कानावर पडले की एक स्वर्ग सुखाचं लाभते असेच म्हणावे लागेल. त्यांच्या संगीत क्षेत्रातील बहुमूल्य कामगिरीबद्दल त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. मात्र नुकताच मिळालेला हा पुरस्कार खूपच आगळा वेगळा आणि सातासमुद्रापारचा आहे.

@@AUTHORINFO_V1@@