शास्त्रीय संगीताच्या रियाझासाठी गोव्यात खास शिबिराचे केले आयोजन

    19-Dec-2023
Total Views |

goa 
 
मुंबई : शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी एक खास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वस्तिक’गोवा तर्फे डॉ. पं. प्रविण गावकर यांचे शास्त्रीय संगीतावरील रियाजाच्या ‘स्वरयज्ञ’ तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर २२ ते २४ डिसेंबर २०२३ या कालावधीत रोजी गोव्यातील साळ मधील राऊत फार्म या निसर्ग रम्य ठिकाणी होणार आहे. या शिबिरात ८ ते ६० वर्ष वयोगटातील संगीत प्रेमींना यात सहभाग घेता येणार आहे. दरम्यान, या शिबिराचे आयोजन गेले १६ वर्ष केले जात आहे.
 
तीन दिवसीय या शिबिरात डॉ. संजय उपाघ्ये यांची शास्त्रीय संगीत व भारतीय संस्कृती विषयावर प्रवचने होणार आहेत. तसेच, आरोग्य, योग आणि आनंदी जीवन या विषयावर सुद्धा त्यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. यात ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. लक्ष्मण कृष्णराव पंडित यांच्या मार्गर्गदर्शनाखाली रियाज होणार असून वैद्य दिवाकरपंत बालावलकर व डॉ. अनुपमा पुरचटकर यांचे ही मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे.