एनसीपीए सादर करत आहे बंदिश: सुप्रसिद्ध भारतीय संगीतकारांना श्रद्धांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019
Total Views |


 


एचएसबीसी यांच्या सहयोगाने 'नॅशनल सेंटर फॉर द परफॉरमिंग आर्ट्स' (एनसीपीए) सादर करीत आहे एनसीपीए बंदिश. तीन दिवसांच्या या उत्सवाची १० 
वी आवृत्ती टाटा थिएटर, एनसीपीए येथे दि. २३ ते २५ ऑगस्ट २०१९ पर्यंत साजरी होणार असून त्यामध्ये महान संगीतकारांची मौल्यवान कामगिरी विख्यात कलाकारांच्या माध्यमातून सादर केली जाईल.

या आवृत्तीमध्ये भुवनेश कोमकली, कौशिकी चक्रवर्ती, अरुणा साईराम, सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांच्यासारखे कलाकार हिंदुस्थानी तसेच कर्नाटक संगीतामधील कुमार गंधर्व, ज्ञान प्रकाश घोष, बडे गुलाम अली खाँ, ओथूक्कडू वेंकटा सुब्बा अय्यर तसेच मुथुस्वामी दीक्षितार या महनीय संगीतकारांच्या मौल्यवान रचना सादर करतील. या उत्सवाचा समारोप एस. डी. बर्मन, रोशन आणि मदन मोहन या चित्रपट संगीत दिग्दर्शकांच्या अजरामर गीतांनी केला जाणार आहे.

उत्सवाविषयी बोलताना एनसीपीएच्या भारतीय संगीत कार्यक्रम प्रमुख डॉ. सुवर्णलता राव म्हणाल्या, “आज आम्ही एनसीपीए निर्मितीच्या ५० व्या वर्षात आहोत. तसेच आम्ही बंदिशचे एक दशकही साजरे करीत आहोत. भारतीय संगीतकारांची कामगिरी एकत्र आणून ती नव्याने आणि नव्या दर्शकांसाठी सादर करणे या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती केली गेली. एनसीपीए बंदिश हे आज ज्या भारतीय संगीतकारांनी आपल्या संगीत परंपरांमध्ये प्रचंड योगदान दिले आहे, अशा महनीय भारतीय संगीतकारांच्या कलाकृती सादर करणारे आणि देशाच्या महनीय संगीतकारांचा वारसा जिवंत ठेवणारे एक व्यासपीठ बनले आहे.

आपले आजोबा सुप्रसिद्ध कुमार गंधर्व यांचा संगीत वारसा असलेले भुवनेश कोमकली हे त्यांच्या ज्या रचनांनी विविध घराण्यांना प्रभावित केले आहे, अशा काही प्रतिष्ठित रचना दि. २३ ऑगस्ट रोजी सादर करतील. भुवनेश कोमकली यांना संगीताचे शिक्षण त्यांचे पिता मुकुल शिवपुत्र आणि आजी वसुंधरा कोमकली यांच्याकडून मिळाले. त्यांचे गायन हे मजबूत पकड आणि अभिव्यक्तीमुळे भावनांना आवाहन करणारे आहे.

त्यानंतर कौशिकी चक्रवर्ती शास्त्रीय आणि ललित तसेच आधुनिक, ऑर्केस्ट्रा, समूह संगीत प्रकारांमधील ज्येष्ठ कलाकार ज्ञान प्रकाश घोष यांच्या काही अजरामर रचना सादर करतील. त्यांच्या गायनात महनीय कलाकार बडे गुलाम अली खाँ (सबरंग) यांच्या ठुमरी आणि दादरा याही रचनांचा समावेश असेल.

ओथूक्कडू वेंकटा सुब्बा अय्यर (वेन्कटा कवि) यांच्या रचनांनी कर्नाटक संगीतातील त्रिमूर्ती आणि त्यांच्या नंतरच्या पिढ्यांना प्रभावित केले होते, असे मानले जाते. दि. २४ ऑगस्ट रोजी अरुणा साईराम त्यांच्या रचनांसोबतच या त्रिमूर्तीमधील एक असलेले श्रद्धेय मुथुस्वामी दीक्षितार यांच्याही रचना सादर करतील.

गेल्या शतकामध्ये सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एस. डी. बर्मन, रोशन आणि मदन मोहन यांनी हिंदी चित्रपटांसाठी काही अप्रतिम रचना तयार केल्या. उत्सवाच्या अखेरच्या दिवशी दि. २५ ऑगस्ट रोजी सुरेश वाडकर आणि साधना सरगम या संगीतकारांच्या शास्त्रीय रागांवर आधरित अविस्मरणीय रचनांचा एक नजराणा सादर करतील.

@@AUTHORINFO_V1@@