
नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) आपल्या ५० वर्षांच्या प्रवासाचा सोहळा म्हणून सादर करीत आहेत भातखंडे परंपरा : रामदास भटकळ यांचे सादरीकरण. शुक्रवार, दिनांक १४ जून, २०१९ रोजी एनसीपीएच्या वेस्ट रूम १ मध्ये हा कार्यक्रम सादर होणार आहे.
ख्यातनाम, विद्वान विष्णू नारायण भातखंडे (१८६०-१९३६) यांनी सुरू केलेल्या संगीत परंपरेत अध्यापकीय आणि तात्त्विकदृष्ट्या फार सखोल दृष्टिकोन जपण्यात आला आहे. ग्वालियर, बडोदा आणि लखनऊमध्ये संगीत विद्यालय स्थापन करून त्यांनी एस. एन. रतनजानकर आणि जी. एन. नातू या शिष्यांना घडवले. या दोघांनी पुढे अनुक्रमे आग्रा आणि ग्वालियर घराण्यातील ख्यातनाम गायकांसोबत प्रशिक्षण घेतले. या दोघांनी पुढील काळात चिंदानंद नगरकर, एस. सी. आर. भट, के. जी. गिंदे आणि दिनकर कैकिनी अशा कलाकारांना प्रशिक्षण दिले आणि दोन्ही घराण्यांची नियमित स्वरुपावर ओळख करून दिली.
भातखंडे परंपरेला आकार देण्यात रतनजानकर यांचा मोठा वाटा आहे. भातखंडे यांच्या बुद्धिमान, दमदार कलेसोबत आग्रा घराण्यातील दिग्गजांच्या शैलीचा यात उत्तम मिलाफ दिसून येतो. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये भातखंडे यांनी रतनजानकर आणि सुकथनर यांच्या साथीने प्रसिद्ध केलेल्या विविध घराण्यांच्या बंदिशी आहेत. यात त्यांच्या स्वत:च्या रचनांचाही समावेश केला गेला. हीच परंपरा नगरकर आणि कैकिनी यांनी पुढे नेली. त्यांनी नव्याने बंदिशी रचल्याच. पण, काही नवे रागही निर्माण केले. इतर अनेक विद्यार्थ्यांनी भारतभरात विविध ठिकाणी आपले स्थान निर्माण केले.
या सादरीकरणात रामदास भटकळ यांच्यासोबत प्रणती म्हात्रे आणि सारंगी आंबेरकर विविध बंदिशींमधून भातखंडे परंपरेचा आजवरचा इतिहास उलगडतील. यात भातखंडे (चतुर किंवा हरारंग), फैय्याज खान (प्रेमपिया), रतनजानकर (सूजन), नगरकर (चित-आनंद) आणि कैकिनी (दिनरंग) या बंदिशींचा समावेश आहे.
कार्यक्रम : नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) सादर करत आहेत भातखंडे परंपरा: अ लेस-डेम बाय रामदास भटकळ
तारीख आणि दिवस : शुक्रवार, १४ जून २०१९
वेळ : संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून
स्थळ : वेस्ट रूम १, एनसीपीए
नोंदणी शुल्क : १०० रु.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat