१६० किमी प्रतितास वेगाने धावणार पुढील वर्षी जूनपर्यंत तयार होणार पहिली ट्रेन महाराष्ट्रातील लातूर येथील मराठवाडा रेल कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसचे पूर्ण उत्पादन अद्याप सुरू झालेले नसल्यामुळे, सेमी-हाय स्पीड ट्रेनचा पहिली पूर्ण स्लीपर ट्रेन जून २०२६पर्यंत धावेल असा अंदाज आहे.
Read More
(India-China Relationship) चीनच्या क्विंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीदरम्यान भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी चीनचे संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. द्विपक्षीय संबंधांशी संबंधित मुद्द्द्यांवर या भेटीत चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रकार श्रीकांत गडकरी यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कला दालन येथे आयोजित करण्यात आले आहे. दि. 19 मे ते दि. 25 मे रोजीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात दर्शकांना आपल्या भोवतालाचे चित्रमय दर्शन अनुभवता येईल.
आज ज्या कलाकाराची ओळख आपण करून घेत आहोत, त्यांची समाजमाध्यमांवर चित्रे बघितली की, एकच प्रश्न ओठी येतो, ‘ये कौन चित्रकार हैं...’
बदलत्या काळासह, कलेच्या प्रांतात वेगवेगळे प्रयोग आपल्याला अनुभवयाला मिळतात. या प्रयोगांच्या माध्यमातून विविध विषयातील नवनवीन दालनं सामान्यांसाठी उपलब्ध होतात. कलेच्या प्रांतात प्रयोगशिलता जपत नवनवीन आविष्कार करणारा असाच एक तरुण म्हणजे प्रणव सातभाई. दि. ३ एप्रिल रोजी प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्यमंदीर येथील पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या कला दालनात प्रणवच्या डिजिटल पोर्टेटच्या प्रदर्शनाचे उद्धटन करण्यात आले. सुप्रिसिद्ध अभिनेता स्वप्निल जोशी, प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्धाटन करण
प्रतिमा आणि प्रतिसृष्टी या दोन गोष्टींचे वेड माणसाला अनंत काळापासून असावे. काळाच्या ओघात जन्माला आलेली मिथके, दंतकथा हे याच प्रतिसृष्टीचे द्योतक असल्याचे दिसते. प्रख्यात लेखक युवल नोआह हरारी म्हणतो की, माणूस गोष्टींमध्ये विचार करतो आणि याच गोष्टींच्या साहाय्याने आपल्या सभोवताली असलेल्या जगाचा अन्वयार्थ लावतो. विविध कलाविष्कार, अभिव्यक्तीचे भिन्न भिन्न प्रकार हे याच अन्वयार्थाचे रूप असते. वर्तमानातही प्रतिसृष्टी उभारणे तंत्रज्ञानामुळे सोपे झाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून, आपल्या मनातले अवकाश आपल्यास
निसर्ग हा अनादि अनंत... माणूस त्याला आपल्या अधिपत्याखाली आणू शकत नाही. माणूस फक्त त्या निसर्गाची अनुभूती घेऊ शकतो. ही अनुभूती चित्रांच्या माध्यमातून साकारणारे ज्येष्ठ चित्रकार शरद तावडे. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कला दालन येथे दि. १८ ते दि. २४ मार्च दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कलारसिकांसाठी खुले आहे. त्यानिमित्ताने या चित्रसंपदेचा रसास्वाद घेणारा हा लेख...
ध्यान, प्राणायाम, वेगवेगळ्या मुद्रा, घरातील संस्कारांच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत, युवा पिढी घडवणार्या रुपेश बाविस्कर यांच्याविषयी...
धारावीत साजरा झाला अनोखा प्रजासत्ताक दिन
अहिल्यानगरच्या ग्रामीण भागातून चित्रकलेला सुरुवात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजल्या गेलेल्या चित्रकार अनुराधा ठाकूर ( Anuradha Thakur ) यांच्याविषयी.
कला हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या मध्यवर्ती भागात कलाकारांना कलासंस्कार देणारे एक महाविद्यालय म्हणून मुंबईतील जेजे महाविद्यालयाची ख्याती आहे. दरवर्षी या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे वार्षिक संमेलन आयोजित केले जाते. यावर्षीच्या कला अभिव्यक्तीचा घेतलेला वेध..
चित्रकार व सुलेखनकार सुभाष जमदाडे यांचे 'मंत्राक्षरे' व दि. २६ डिसेंबर २०२३ ते १ जानेवारी २०२४ या कालावधीत सुरेश गोसावी यांच्या 'भक्ती' आणि 'शक्ती' या चित्रांचे एकत्रित प्रदर्शन 'जहांगीर आर्ट गॅलरी' फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. उभय चित्रकार हे पुण्यातील असून पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून कलेचे शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत या दोघांची अनेक एकल प्रदर्शने पुणे आणि मुंबई येथे भरली आहेत.
चरणदास जाधव याचा पारोळा जळगाव ते मुंबई प्रवास आणि त्याच्या कारकिर्दीची ऑफिस बॉय ते स्वतःचा स्वतंत्र स्टुडिओ अशी पुढे गेलेली वाट शोधण्याचा या लेखातून केलेला हा प्रयत्न...
चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नसताना, जगातील पहिल्या फ्युजन वारली कलाकार होण्याचा नावलौकिक कमावलेल्या नाशिक जिल्ह्यातील हेमा विजयकुमार ठाकूर यांच्याविषयी...
वैद्यकीय व्यवसाय सांभाळून चित्रकला, फोटोग्राफी अशा विविध कला छंद अगदी डॉक्टर मंडळीही जोपासत असतात. अशाच चित्रकलेचा छंद जोपासणार्या डॉक्टरांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ‘डॉक्टर्स आर्ट शो’ वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे.
जमलेल्या माझ्या तमाम बांधवांने आणि भगिनींनो …हे एकच वाक्य आणि हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकच नाव. बस्स, हे उच्चारलं की, काहीही सांगायची गरज नाही. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांच्या डोळ्यांसमोरून त्यांचा जीवनपट एखाद्या सुपरहिट चित्रपटाप्रमाणे सरकून जातो. बाळासाहेबांचा मराठी बाणा, हिंदू धर्म आणि महाराष्ट्राविषयीचं अलोट प्रेम ही त्यांच्या जीवनाची संजीवनी. ही संजीवनी घेऊनच त्यांनी राजकारण, समाजकारण, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली. त्यामुळेच उद्या बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त हा
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी साजरी करायला आम्ही विक्रमगड आणि वाड्याच्या शाळांना भेट द्यायचे ठरवले. यानिमित्ताने चित्रकार श्री. बा.च्या कला कार्यशाळेचे आयोजन केले होते. मुलांनी शाळेच्या परिसरातील खर्या फुलापानांना, गवतांना, वेलींना... चिकटवून त्याची सुबक नक्षी तयार करून एन्व्हलप पेंटिंग केलेली होती. गेली तीन-चार वर्षे आमची ‘लेट्स इमॅजिन संस्था’ अशा प्रकारे कलेचा आस्वाद घेत या मुलांबरोबर दिवाळी साजरी करतेय. त्याविषयी...
वयाच्या ८० वर्षांच्या उंबरठ्यावर असतानाही चित्रकलेसोबतच विविध कलाकृतींचा संग्रह करण्याचा छंद जोपासणारे चित्रतरूण विलास बळेल यांच्याविषयी...
‘हर घर कुछ कहता है’ ही जाहिरात आपण सर्वांनी लहानपणी टीव्हीवर नक्कीच पाहिली असेल. ही जाहिरात होती... एशियन पेंटची. एशियन पेंट केवळ भारताचीच नाही तर आशियातील मोठी रंग कंपनी आहे. देशासह जगातील अनेक घरांना रंगरंगोटीसाठी या पेंट्चा वापर करण्यात येतो. पण या कंपनीसाठी दि. २८ सप्टेंबर रोजी एक दुखद बातमी होती, ती म्हणजे एशियन पेंटचे सहसंस्थापक अश्विन दाणी यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झालं.त्यामुळे एशियन पेंटची सक्सेस स्टोरी? अश्विन दाणी यांच एशियन पेंटच्या यशातील महत्त्व, आणि एशियन पेंटचा इतिहास अशा अनेक गोष्टी
G-20 शिखर परिषदेचे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले आहे. त्यावेळी 'भारत मंडपम'चे रूपांतर पाहुण्यांसाठी मिनी मार्केटमध्ये करण्यात आले आहे. या मिनी मार्केटमध्ये अनेक गोष्टीमधून भारतीय संस्कृती आणि कलेचा साक्षात्कार होत आहे. याअंतर्गत पाहुण्यांना बिहारी संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी बिहार सरकार आणि उद्योग बिहार यांच्यातर्फे बिहारमधील हस्तकला बाजारात प्रदर्शित करण्यात येत आहे.
दिल्ली येथे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी जी-20 परिषद पार पडणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी दिल्लीत दाखल झाले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने भारत संपूर्ण जगाला आपली संस्कृती. इतिहास आणि कलेची ओळख करुन देत आहे.
समकालीन संकल्पचित्रांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे आणि समाजातील विसंगती, वैचित्र्य यांवर रंगरेषेतून भाष्य करणारे अभिनव चित्रकर्मी प्रा. महेश मानकर यांच्या चित्रकारितेचा ‘रंग’प्रवास...
धमाल जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आपल्याला हवीशीवाटणं साहजिक आहे. पण त्याची खंत न करता नसलेल्या गोष्टीला आपली ताकद बनवून तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्र एका प्रकरणाचा छडा कशा मजेशीर प्रकारे लावतात याची धमाल दाखवणारा ‘अफलातून’ हामराठी चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. साहा अँड सन्सस्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमारसाहा, चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशनएंटरटेन्मेन्ट,अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पटकथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात
ज्यांना जग स्वतःच्या डोळ्यांनी पाहता येत नाही, अशांसाठी पेंटिंग्ज चितारता यायला हवी. त्या क्षणापासून चिंतामणी हसबनिसांनी अंधांना पाहता येतील, अशा पेंटिंग्ज निर्माण करण्याचा ध्यास घेतला. प्रयत्नांती परमेश्वर... अनेक प्रयोग करून चिंतामणींनी मनाला लागलेली चिंता दूर केली. त्यांनी खास अंध लोकांसाठी पेंटिंग्ज साकारायला प्रारंभ केला. चित्राविषयाशी निगडित अंधांना स्पर्शाने समजेल, अशा ब्रेल लिपीचा त्यांनी पेंटिंग्जमध्ये वापर सुरू केला. त्यांच्याविषयी...
अतुल भालेराव यांनी निसर्गचित्रणाला वेगळा आयाम देत आपली स्वत:ची शैली विकसित केली. चित्रकर्मी आणि कलाध्यापक म्हणून त्यांच्या प्रवासाचा हा सप्तरंगी ‘इंद्रधनू’
चित्रं तर लहान मुलेही काढतात, त्यात काय विशेष? अशा गोष्टी बोलल्या गेल्या. परंतु, तरीही त्याने माघार घेतली नाही. जाणून घेऊया चित्रकार सागर विष्णू हांडोरे याच्याविषयी...
सिद्धार्थ धारणे संगणक अभियंता. मात्र, आज प्रतिथयश चित्रकर्मी म्हणून तो ओळखला जातो. चित्रकलेचे कुठलेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतलेल्या या मनस्वी चित्रकर्मीच्या सप्तरंगी कलाप्रवासाचा ‘कॅनव्हॉस’...
मूक व कर्णबधिर असला तरी कुंचल्याच्या फटकार्यांतून इतरांच्या चेतना जागवणारा चैतन्यशील चित्रकार चेतन चंद्रकांत पाशिलकर याच्याविषयी...
तरुण चित्रकार ‘कुडलय्या’ (की कुडल्या?) हिरेमठ यांच्या जलरंग माध्यमातील कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर कलादालनात सुरू आहे. त्यांच्या प्रदर्शनाला भेट दिली तेव्हा त्यांची जरी भेट झाली नसली, तरी त्यांच्या कलाकृती खूप काही सांगून गेल्या. कलाकारांची ओळख ही त्यांच्या कलाकृतींद्वारे होत असते. हिरेमठ यांची ही ओळख अशाच पद्धतीची आहे. त्यांच्याविषयी लिहिण्यापेक्षा त्यांच्या कलाकृतीविषयी आणि त्यांच्या चित्रांविषयी लिहिणं अधिक संयुक्तिक होईल. कारण, त्यांची कलासाधना ज्या दिशेने चालली आहे, ती अद्भुत आहे. त्यांच्या कलाकृतींचं
भारतीय अलंकारिक चित्रशैलीतील चित्रकार, शिल्पकला, पेन्सिल स्केच, पॉटरी, टेलरिंग, फोटोग्राफी, सुगम गायन अशा विविध कला आत्मसात केलेला मनस्वी कलाध्यापक रमाकांत गायकवाडच्या विविधरंगी पैलूंविषयी..
कोणतंही शिक्षण कधीही वाया जात नाही. दृश्य कलाध्यापक आणि उपयोजित कलाकार (दृश्य) प्रणिता आणि अनंत देशपांडे आत्मविश्वासाने सांगतात. हे दोघंही उपयोजित कलाचे संभाजीनगरच्या ‘शाकम’चे म्हणजे आत्ताच्या ‘शासकीय अभिकल्प महाविद्यालया’चे विद्यार्थी. याच कला महाविद्यालयात जीवनात स्वावलंबी होणारे कलाशिक्षण घेताना जीवनाला रेशीमगाठीची जोड लाभली. कलाशिक्षण, कलाविचार आणि जीवन जगण्यासाठीची कला दोघांनाही एकाच विचाराने स्फूर्ती मिळाली. वर्गमैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाचं पर्यावसान विवाहात झालं. प्रेमविवाह सर्वार्थाने
सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार, संगीतकार, पटकथालेखक आणि अभिनेते अशा अनेक कलांमध्ये माहीर असलेले ज्येष्ठ कलावंत पुरुषोत्तम बेर्डे यांचे नवे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. तब्बल नऊ वर्षांनी येणार्या ‘सुमी आणि आम्ही’ या नाटकानिमित्त पुरुषोत्तम बेर्डे यांच्याशी साधलेला हा खास संवाद...
वाचन, मनन, लेखन आणि रेखांकनासह रंगलेपन या बाबतीतील चित्रकार सुभाष गोंधळे यांची प्रगती, रहस्यमय, अद्भुत आणि मंत्रमुग्ध करणार्या सखोल आशयगर्भ कलाकृती करणार्या एका दृश्यकलाकाराची ओळख देणारी ठरली. त्यांनी त्यांच्या नावामध्ये संक्षिप्त टोपणनाव शोधले आहे. ‘सुगो’ या नावानेही त्यांची आपलेपणा निर्माण करणारी ओळख आहे. याच नामाभिधानाने त्यांच्या चित्रमालिका प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रशृंखलेत अनोख्या संकल्पनांसह कला आणि वैज्ञानिक स्वभाव व्यक्त होताना दिसतो.
सर्जनशील शिल्पांची बोलकी अभिव्यक्ती, विविध शैली आणि माध्यमांतील सुरेख चित्राकृती आणि साथीला दिग्गज चित्र, शिल्पकारांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन असा त्रिवेणी संगम असलेल्या ‘के. के. वाघ संस्थे’च्या लालित कला महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनाचा समारोप गुरुवारी झाला.
तब्बल अर्धा डझनांहून अधिक छंद जोपासून त्यांचे तितकेच चिकाटीने जतन आणि संवर्धन करणार्या आणि ‘लिम्का बुक’नेही नोंद घेतलेल्या छंदिष्ट श्रुती गावडेची ही छंदकथा...
ज्या गोष्टीसाठी सवड नव्हती, तीच नंतर आवड झाली. सध्या तो ‘रंगछंद ग्रुप’च्या माध्यमातून १५ हून अधिक मुलांना रांगोळी रेखाटण्याचे धडे देत आहेत. जाणून घेऊया रोशन जयवंत पाटील याच्याविषयी...
एखादी नवी कल्पना वा विचार घेऊन चित्र काढणार्या व पर्यावरण रक्षणासाठी सजगतेने काम करणार्या चित्रकार रोहित खेडकरविषयी जाणून घेऊया...
मुंबईच्या ‘लेट अस इमॅजिन टूगेदर’ या गेल्या चार वर्षांपासून समाजभावनेतून कार्यरत तरुणांच्या समूहाने दि. २५ जून रोजी वाडा तालुक्यातील तीन जिल्हा परिषदांच्या शाळांना भेट दिली व तेथील विद्यार्थ्यांसह छत्री रंगवण्याची कार्यशाळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्याचेच केलेले हे अनुभवचित्रण...
दहावी नापास झाल्यानंतर हार न मानता व कलेची कोणतीही पदवी न घेता त्यांनी चित्रकलेसह रांगोळीविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. जाणून घेऊया महादेव शंकर गोपाळे यांच्याविषयी...
आजचा आपला लेख हा अशाच एका नादिष्ट, छंदिष्ट आणि एकलव्य बाण्याच्या एका स्वयंभू कलाकाराची ओळख करून देणारा आहे. अनेक वर्षे अनेक कलाकृती अनेक ठिकाणी देऊनसुद्धा कुठेही ज्येष्ठतेचा अभिनिवेश नाही, अतिगंड नाही, स्वतःला किशोरवयीन किंवा लहान समजत अनेकांना, ज्येष्ठांना थक्क करून सोडणारं कलाकाम करणार्या प्रयोगशील चित्रकार किशोर श्रीधर नादावडेकर यांचा कलाप्रवास अदभुत तर आहेच. परंतु, थक्क करणारादेखील आहे.
भारताच्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये क्रांतिकारकांचे योगदान अविस्मरणीयच आहे.
या सप्ताहात दृश्य कलाकारांच्या बाबतीतील एक दु:खद घटना ऐकायला मिळाली. हा लेख लिहीत असतानाच नागपूरहून दु:खद वृत्त आले. राज्याचे माजी कलासंचालक प्रा. हेमंत नागदीव यांचे कर्करोगाने निधन झाले. याच सप्ताहाच्या सुरुवातीला पुण्यात स्थानिक असलेले जगप्रसिद्ध चित्रकार रेखांकनकार, लेखक, साहित्यिक, समीक्षक रवी परांजपे यांचे त्याच्या ८७व्या वर्षी निधन झाले. या दोन्ही दिग्गजांना प्रारंभीच श्रद्धांजली अर्पण करून चित्रकार रवी परांजपे यांच्या कलाप्रवासाचा आलेख उलगडून पाहूया!!
आजचा लेख हा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन देणारा आहे. ज्यांनी ब्रश हातात घेतला की रंग बोलायला लागतात आणि लेखणी हातात घेतली की कागद बोलायला लागतात, हे दोन्ही माध्यमांचं बोलणं सामाजिक बांधिलकीशी असतं. ज्यांच्या डोक्यात सतत सृजन असते, तर मनात अनेक विचार असतात, भारतीय कलाजगत, भारतीय पत्रकारिता विश्व आणि फिल्म जगतातील अनेक दिग्गज ज्या व्यक्तिमत्त्वाला अगदी जवळून ओळखतात, अशा चित्रकार, पत्रकार जैन कमल यांच्या वादळी कलाप्रवासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखात करणार आहोत.
गावखेड्यातून मुंबईत येऊन चित्रकलेचे आणि शिल्पकलेचे धडे घेत त्याने आपल्या स्वप्नांना पंख दिले. जाणून घेऊया आपल्या कलाकारीने वेगळा ठसा उमटविणार्या ओंकार जंगम यांच्याविषयी...
आता प्रा. साबळे यांच्याकडे राज्याच्या कलासंचालकपदाचा अतिरिक्त कारभार सोपविला आहे. त्यांना आता विश्वविख्यात ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या अधिष्ठाता पदाच्या मूळ जबाबदारीबरोबरच कलाविश्वाचे स्वतंत्र व्यासपीठ असणार्या कलासंचालनालयाची जबाबदारी आली आहे. तसे त्यांच्या नावातच ‘विश्व’ असल्यामुळे आणि ‘नाथ’ तर ते आहेतच. ते हा कलासंचालक पदाचा कारभार जबाबदारीने सांभाळतील, अशी आशा करायला हरकत नाही.
३१ मे रोजी हिमाचल प्रदेशमधल्या शिमला येथे केंद्र सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली. शिमलाहून परतताना पंतप्रधानांनी अचानक त्यांची गाडी थांबवली आणि एका मुलीशी संवाद साधला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे.
मुंबईला आपलेसे करत त्याने आपल्या व्यक्तिचित्रणाच्या आवडीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. जाणून घेऊया राज्य शासन पुरस्कारप्राप्त चित्रकार प्रकाश बाबासाहेब कुर्हे याच्याविषयी...
चित्रकर्ती अश्विनी पराग बोरसे यांच्या कलाकृती पाहताना त्यांची विशुद्ध रंगांची निवड, योजना, रचना आणि लेपनपद्धती पूर्णपणे स्वनिर्मित आहे. ‘ताळा’ करण्यासाठी, त्यांचा ‘प्रोफाईल’ तपासला, तर ध्यानी आले त्या ‘कॉमर्स’ पदवीधर आहेत. त्यांनी अधिकृत वा प्रचलित कलाशिक्षण घेतलेले नाही. ही त्यांची जरी दृश्य बाजू असली, तरी त्यांच्या कलाकृतींमधील रंगांद्वारे व्यक्त होणं पाहिलं की, ध्यानात येतं प्रथितयश कलाकाराच्या कलाकृतींच्या तुलनेने त्यांच्या कलाकृती कुठेही कमी नाहीत.
रात्रीच्या अंधारातील प्रकाश किरणांचा प्रवास पाहण्यासाठी जो आनंद मिळतो, त्याहूनही अधिक आत्मानंद हा त्या दृश्यांना कॅन्व्हासवर उतरविण्यात मिळतो, असे चित्रकार ललित पाटील यांनी सांगितले. त्यांच्या रंगलेपनात ‘ऑईल रंग’ हा जाड आणि पातळ स्वरुपातही ते, सफाईने मांडू शकतात, ही त्यांची खासियत आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबई उपनगरांतील विकासकामांना जोर धरू लागला आहे. रस्ते, पूल, उद्याने, पर्जन्य जलवाहिन्या यांच्या कामांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करण्यात येत आहे. त्यामुळे आता रस्त्यांच्या रंगरंगोटीलाही वेग येणार असल्याचे दिसून येत आहे. मुंबई उपनगरातील ४३८ रस्त्यांची रंगरंगोटी होणार असून महापालिकेकडून तब्बल २० कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचे उघड झाले आहे.