नवी दिल्ली : ३१ मे रोजी हिमाचल प्रदेशमधल्या शिमला येथे केंद्र सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी हजेरी लावली. शिमलाहून परतताना पंतप्रधानांनी अचानक त्यांची गाडी थांबवली आणि एका मुलीशी संवाद साधला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहे. मुलीद्वारे पंतप्रधानांच्या आईची बनवलेली रेखाचित्र त्यांच्या हातात असून, मोदी त्या मुलीशी संवाद साधत असल्याचं विडिओमध्ये दिसत आहे.
रिज मैदानावर कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान जेव्हा मॉल रोडवरून त्यांच्या कारमधून परतत असताना एका तरुणीने त्यांना त्यांच्या आईचे रेखाचित्र घेऊन उभी असलेली दिसली. यावर पीएम मोदींनी त्यांची कार थांबवली आणि त्यांच्यापर्यंत पोहोचले. पीएमने मुलीला तिचे नाव विचारले आणि किती दिसतात रेखाचित्र रेखाटली असे विचारले. पीएमच्या प्रश्नाला उत्तर देताना तिचं नाव अनु असून, तिने ते रेखाचित्र एका दिवसात रेखाटलं असल्याचे सांगितले. त्याचवेळी पंतप्रधानांनीही मुलीला आशीर्वाद दिले आणि तेथून निघून गेले.
अनेक इंटरनेट वापरकर्त्यांनी पंतप्रधानांच्या या साधेपणाची प्रशंसा केली आहे. एका युजरने ट्विटरवर लिहिले की, “आश्चर्यकारक, अविस्मरणीय, सोनेरी क्षण. पंतप्रधानांनी एका मुळकाढून त्यांच्या आईची रेखाचित्र स्वीकारून आज त्यांच्या साधेपणाची एक झलक दाखवली आहे."