मुंबई : वैद्यकीय व्यवसाय सांभाळून चित्रकला, फोटोग्राफी अशा विविध कला छंद अगदी डॉक्टर मंडळीही जोपासत असतात. अशाच चित्रकलेचा छंद जोपासणार्या डॉक्टरांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ‘डॉक्टर्स आर्ट शो’ वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. ५ ते ११ डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये संपन्न झाले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. जगन्नाथराव हेगडे (माजी नगरपाल), अॅड. धनराज वंजारी (ज्येष्ठ व्याख्याते व साहित्यिक, माजी साहाय्यक पोलीस आयुक्त, आप (ओबीसी) नेते, महाराष्ट्र), सुप्रसिद्ध स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री वर्षा उसगांवकर, ख्यातनाम चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन, डॉ. पूजा मेंधे (मिस इंडिया इंटरनॅशनल - २०१८), ख्यातनाम चित्रकार रामजी शर्मा, अजयकांत रुईया (डायरेक्टर, ऑल स्टेट ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज) यांच्यासहित कला व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. ‘दीपकला फाऊंडेशन’च्या वतीने या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात आणि इंग्लंड येथील प्रसिद्ध ५० डॉक्टरांचा समावेश असून, कला आणि विज्ञान यांचा अनोखा संगम रसिकांना पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनातील चित्रांच्या विक्रीतील दहा टक्के रक्कम अनाथ मुलांच्या मदतीसाठी ‘दीपकला फाऊंडेशन’ला देण्यात येणार आहे.
डॉक्टर्स कला प्रदर्शनात डॉ. शेखर भोजराज, डॉ. विनोद इंगळहलीकर, डॉ. सोनल शाह, डॉ. सोनाली सराफ, डॉ. मिनू आचरेकर, डॉ. प्रीतम साळवी, डॉ. गायत्री देशपांडे, डॉ. डायना गाला, डॉ. विजय पिसाट, डॉ. किशोर बाटवे, डॉ. व्योमिका जशनानी, डॉ. निराली मकनी, डॉ. दत्ताराम कोळी, डॉ. तन्वी महेंद्रकर, डॉ. फिरदौस शेख, डॉ. मृणालिनी वाकचौरे, डॉ. ध्रुवी जैन, डॉ. तन्वी दावडा, डॉ. शीतल मिस्त्री, डॉ. कंनुप्रिया हलन, डॉ. प्रकाश बोरा, डॉ. पूजा मेंधे, डॉ. ऐश्वर्या कुमार, डॉ. मिलन सिंग ठोमर यांच्यासहित अनेक डॉक्टर्स सहभागी झाले असून त्यांची चित्रकला व फोटोग्राफी पाहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन दि. ५ ते ११ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळील ७ या वेळेत रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे.