‘स्लाव्ह मित्र मंडळ’ची २०१० साली स्थापना झाली. अजय मुरूडकर,अदिश देसाई, आनंद पंडित, मंदार मिराशी, संचनि नेमाने, योगी चव्हाण हे या संस्थेचे सदस्य. सात सदस्यांनी ‘स्लाव्ह मित्र मंडळा’च्या माध्यमातून हिंदू संस्कृती परदेशात जागृत राखली आहे. त्याविषयी...
Read More
र्निबधमुक्त गुढीपाडव्याचे स्वागत करताना पूर्वीचा जोष, उत्साह, जल्लोष, चैतन्य, आनंद आणि एकूणच सकारत्मक वातावरण कल्याण डोंबिवलीत दिसून आले. मास्कमुक्त गुढीपाडवा असल्याने सगळ्य़ांच्या चेह:यावर आनंद ओसांडून वाहत होता. ९४ वर्षीय आजोबांनी दाणपट्टा चालवून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. महिलांनी बर्ची नृत्य सादर करून डोंबिवलीकरांवर गारूड घातले.
महाराष्ट्र शासनाने कोरोनाचे सर्व निर्बध हटवले ; राजेश टोपेंनी घेतली पत्रकार परिषद
आपली आवडच आपले जीवनध्येय ठरवून १८ वर्षांची एक मुलगी चक्क कंपनी स्थापन करते. त्या कंपनीची ‘सीईओ’ म्हणून अत्यंत जबाबदारीपूर्वक व्यवसायातही नेटाने उतरते. खगोलशास्त्राचे अजूनही शिक्षण घेणारी आणि कित्येक खगोल जिज्ञासूंना घरबसल्या अंतराळाचे धडा देणार्या ‘अॅस्ट्रॉन इरा’ या संकेतस्थळाची सर्वेसर्वा श्वेता कुलकर्णी. त्यामुळे आवड, शिक्षण, समाजसेवा आणि उद्योग यांना इतक्या कमी वयात एका धाग्यात गुंफणार्या या ‘अॅस्ट्रोप्रिन्युअर’ची ही यशोगाथा...
‘गृहकर्तव्यदक्षता’ हा तर स्त्री व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य गुण. अशी सुसंस्कारित, शिक्षित आणि समंजस महिला जेव्हा एखाद्या सार्वजनिक संस्थेचा कारभार हाती घेते, तेव्हा घडणारे बदल हे निश्चितच नेत्रदीपक असेच असतात. याचीच अनुभूती येते, ती नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत. कारण, येथील कारभार आहे अशाच एका कर्तव्यदक्ष महिला सभापतीच्या हाती.सुवर्णा जगताप त्यांचे नाव. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख...
विविध समस्यांनी ग्रासलेल्या आणि आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित असणार्या वनवासी बांधवांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणारे ‘वसई पर्ल्स लायन्स क्लब’चे माजी खजिनदार उमेश मेस्त्री यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
“आयुष्य म्हणजेच एका आव्हान आहे. त्यात जय किंवा पराजय महत्त्वाचा नाही, तर तुम्ही ते आव्हान कसे पेलले आणि त्यावेळी तुम्हाला काय वाटले, हे अधिक महत्त्वाचे,” असे म्हणणारी आर्किटेक्ट पोर्णिमा बुद्धिवंत सध्या फॅशनच्या क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करते आहे. तिच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...
बदलते हवामान, कोरडा आणि ओला दुष्काळ, तसेच घसरता बाजारभाव यांसारख्या आव्हानांनी पाचवीला पूजलेला व्यवसाय म्हणजे शेती. राज्यातील बहुतांश शेती व्यवसाय तोट्यात असल्याने सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकर्यांना नवी दिशा दाखविण्याचा प्रयत्न काही प्रयोगशील शेतकरी करत आहेत. त्यासाठी सेंद्रिय उत्पादनांचा वापर स्वतःच्या शेतात करून इतर शेतकर्यांना प्रगतीचा मार्ग दाखवणारे प्रगतशील आणि उद्यमी शेतकरी म्हणजे सुभाष वसंत कराळे. कृषिक्षेत्राच्या विकासामध्ये मौल्यवान योगदान असलेल्या सुभाष कराळेंच्या कार्यप्रवासाचा घेतलेला हा
महाविद्यालयात नाटकांची आवड जोपासताना प्रत्येकाला वाटतं की, आपण कलाकार व्हावं, लेखक व्हावं, काही जणांना तर अगदी नेपथ्यकार अथवा रंगभूषाकार व्हावं असंही वाटतं. पण, कोणीच ठरवून नाट्यनिर्माता मात्र होत नाही. अशा या नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे राहुल भंडारे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...
गुढीपाडव्यापासून प्लवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४३ चा प्रारंभ होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा हा हिंदू मराठी कालगणनेप्रमाणे नवीन वर्षातील पहिला दिवस, गुढीपाडवा घरोघरी गुढी उभारून तिचे पूजन करून साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त असतो. या नूतन वर्षात काय घडणार आहे, याची माहिती पंचांगकर्ते,खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.
गेली कित्येक वर्षं मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये संजीवनी जाधव-खानविलकर यांनी अनेक संस्मरणीय कलाविष्कार प्रेक्षकांसमोर सादर केले. त्यांनी कधी प्रेक्षकांना खळखळून हसवले, तर कधी हसतहसत त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले. त्यांच्या याच प्रदीर्घ अनुभवावरून संजीवनी जाधव यांनी नवीन पिढी घडवण्याचेदेखील काम केले. त्यांच्या ३० हून अधिक वर्षांच्या कलासंपन्न अनुभवाने अनेक तरुणांना कलाक्षेत्रात योग्य मार्ग दाखवला. अशा या नवोदितांच्या मार्गदर्शक ‘माईं’चा जीवनप्रवास उलगडणारा हा लेख...
‘देवभूमी’ अशी ओळख असलेल्या कोकणाचा साज तीनही ऋतूंमध्ये न्याराच दिसतो. आपल्या कॅमेर्यात कोकणचे हे निसर्गसौंदर्य कैद करणारा अवलिया छायाचित्रकार म्हणजे प्रल्हाद भाटकर... कोकणच्या विविध तालुका आणि खेडोपाड्यातील जवळपास दीड लाख छायाचित्रांचा संग्रह त्यांच्यापाशी आहे. तेव्हा, कोकणच्या सौंदर्यसृष्टीचे बारकावे टिपून जगासमोर मांडणार्या या सुप्रसिद्ध छायाचित्रकार प्रल्हाद भाटकर यांच्याविषयी...
एक संगीतप्रेमी, काव्यप्रेमी, समाजसेवक व एक यशस्वी डॉक्टर, ज्याने आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशकिरणांनी हजारोंच्या जीवनातील अंधकार दूर करत समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. अशा या काव्यप्रेमी साहित्यिक डॉ. शाहू रसाळ यांच्या कार्यकर्तृत्वावर एक नजर...
व्यवसायात उतरण्याआधी संबंधित क्षेत्रात कमीत कमी सहा महिन्यांचा तरी प्रत्यक्ष नोकरीचा अनुभव घेतलाच पाहिजे, असा मोलाचा सल्ला ‘वरदायिनी ऑटो’चे प्रमुख विक्रम कदम देतात. असे का...? तर ते समजून घेण्याआधी जाणून घेऊया विक्रम कदम यांचा नोकरी ते यशस्वी व्यावसायिकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास...
आजपासून २७ वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावसारख्या ग्रामीण भागात एकटीच्या बळावर रक्तपेढी सुरू करणे तसे धाडसाचेच काम. पण, आपल्या समोर रक्ताअभावी होणारी रुग्णांची फरफट पाहून त्यांनी ती हिंमत केली आणि आजही रक्ताचा दर्जा, गुणवत्ता जपून त्या कार्यरत आहेत. त्या कोण? तर जाणून घेऊया, संजीवनी रक्तपेढीच्या संस्थापक-प्रमुख नीता पाटील यांच्याबद्दल...
मुंबईचा समुद्रकिनारा हा प्रत्येक मुंबईकरासाठी आणि देशविदेशातून भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय. पण, प्लास्टिक कचरा व जलप्रदूषणामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांची रयाच गेली आहे. अशा या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांना स्वच्छ करणाऱ्या काही हातांपैकी एक म्हणजे अॅड. अफरोज शाह. सनदशीर मार्गाने याविरोधात लढण्याऐवजी महात्मा गांधींच्या मार्गावर चालत त्यांनी ‘वर्सोवा बिच क्लिन अप’ ही समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम उभी केली आणि बघता बघता या मोहिमेला व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. या मोहिमेची दखल आंतरराष्ट्रीय स्
आपल्या कृषिप्रधान देशात शेतात राबणारे करोडो हात असले तरी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मदतीला धावून येणारे फारच कमी. पण, डहाणूच्या आशितकुमार सुमेरमल बोथरांसारखी काही व्यक्तिमत्त्वं याला अपवादही ठरतात. स्वत:ची शेती, नर्सरी, हॉर्टिकल्चर आणि लँडस्केपिंग व्यवसायाच्या व्यापातही ते डहाणूच्या शेतकऱ्यांच्या सर्वोपरी मदतीसाठी सदैव सज्ज असतात. म्हणूनच ते ठरतात डहाणूचे ‘ग्रीन मॅन’
फारसा प्रतिष्ठित नसणारा आणि कमी महत्त्व दिला जाणारा, परंतु, अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे ‘प्लम्बिंग. मात्र, आपल्या कार्याने सामाजिक बांधिलकीने तसेच विविध परिषदांच्या आयोजनातून या व्यवसायाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करणारे ‘प्लम्बिंग कन्सलटंट मिलिंद शेटे यांची ही यशोगाथा.
गणपती... 64 कलांचा अधिपती. ज्ञानाची ही देवता... पालघरमधील ‘परफेक्ट ग्रॅफाईट अॅण्ड इलेक्ट्रिकल्स’ कंपनीचे उद्योजक ‘एस. गणपती’ हे त्यांच्या नावाला अगदी पुरून उरणारे. प्रचंड हुशारी, चिकित्सक व्यवहारी स्वभाव, तरीही संस्कृतीशी नाळ जोडलेला आणि वयाची साठी ओलांडलेला हा ऊर्जावान उद्योजक. सोने वितळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रॅफाईटचे साचे-सामग्रीच्या निर्मितीचा त्यांचा व्यवसाय. तेव्हा, अशा या सर्जनशील आणि उद्यमशील ग्रॅफाईटच्या गणपतींचा हा जीवनप्रवास...
कला कोणतीही असो, त्याची साधना केल्यानंतरच सिद्धता प्राप्त होते. मोठमोठ्या कलाकारांनाही कलेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी अथक साधना करावी लागते. पण, जर एखादा लहान मुलगा ऐन खेळण्या-बागडण्याच्या वयात एखाद्या कलेत प्राविण्य संपादित करत असेल तर त्याला लाभलेली ही निसर्गाची देणगी आहे, असेच म्हणावे लागेल. तबल्यावर अगदी तन्मयतेने चालणाऱ्या तृप्तराज पंड्याची बोटे पाहिली कीयाची जाणीव होते.
आपल्या अंगभूत कलेला नाट्य, एकपात्री प्रयोग, काव्य आणि लेखनाद्वारे विविध रंगात भिनवणारे असेच एक नाट्यपंढरीतले हरहुन्नरी अभिनेते म्हणजे श्रीप्रकाश सप्रे.
आयुर्वेद हा संस्कृत शब्द. ‘आयु’ म्हणजे ‘जीवन’ आणि ‘वेद’ म्हणजे ‘विद्या’ असा केला जातो. वैद्यकीय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना परिस्थितीशी दोन हात करत कर्तृत्वाच्या जोरावर नवी मुंबईतील आयुर्वेद पंचकर्म उपचार पद्धतीमध्ये प्रसिद्ध असलेले डॉ. प्रशांत वाघमारे यांची ही यशोगाथा...
डोंबिवलीतील भारती मोरे समाजातील एकल महिलांसाठी काम करतात. मुंबईतील गिरणगावात त्यांचे बालपण गेले. चाळ संस्कृतीत लहानाच्या मोठे झालेल्या भारती मोरेंनी चाळीतील अडीअडचणीला धावून जायची पद्धत आपल्या वैयक्तिक आयुष्यातही अवलंबली.
‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या व्रताला सर्वस्व मानून समाजसेवेमध्ये सक्रिय असलेले वसईच्या आशीर्वाद नर्सिंग होमचे डॉ. जयश्री आणि रवींद्र देशपांडे हे डॉक्टर दाम्पत्य.
ध्यास आयुर्वेदाचा
रुईया महाविद्यालयातील विद्यार्थिनी. लहानपणापासून चित्रकलेची आवड. व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील बालपण. फॅशन डिझायनिंगचे शिक्षण आणि काहीतरी जगावेगळं करून दाखविण्याची मनात असलेली जिद्द या जोरावर महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक वर्तुळातील एक चेहरा असलेल्या आरती कांबळे यांनी आई, पत्नी, सून, मुलगी या भूमिकाही यशस्वीपणे निभावल्या आहेत. शून्यापासून सुरू केलेल्या या उद्योगिनीचा सहाशे कोटींपर्यंतचा हा प्रवास...
कौटुंबिक व्यावसायाची स्थिती नाजूक असतानाही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करत 'श्री साई इंडस्ट्रीज' या भागीदारीतील कंपनीचा विस्तार सातासमुद्रापार पोहोचवत तितकाच हातभार समाजकार्यातही लावणारे धनंजय लोहार यांचा अवघ्या साडेतीन रुपयांपासून व्यवसाय सुरू करणारी संघर्षमय कथा खरचं प्रेरणादायक आहे.
आजच्या जगात काहीच मोफत मिळत नाही. दहावी, बारावीच्या क्लाससाठीही लाखोंची फी उकळली जाते. त्यातच जर अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाचे क्लासेस असतील, तर फी ऐकूनच धक्का बसतो. पण, असा एक अवलिया आहे, जो वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांना मोफत ज्ञानाचे भांडार खुले व्हावे, यासाठी धडपडत आहे. विद्यार्थीसेवेचे व्रत घेतलेले डॉ. विवेक नळगीरकर...
मुलांचे संगोपन उत्तमरित्या व्हावे, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. मात्र, आजघडीला घर सांभाळण्याबरोबरच त्या घराला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची जबाबदारीही महिलांनी स्वीकारली आहे. मुलं थोडी वयाने मोठी झाली की, नोकरदार महिलांना त्यांना पाळणाघरात ठेवून कामावर जावेच लागते. पाळणाघरापेक्षा दुसरे घरच म्हणता येईल, असे बदलापूरमधील टिळक काकूंचे सुरक्षित आणि संस्कारांची
सुट्टीचा सदुपयोग व्हावा म्हणून सहज व्यक्तिमत्त्व विकास आणि नाटक कार्यशाळेत योगेश सोमण यांनी सहभाग नोंदवला. यानंतर हा प्रथितयश रंगकर्मी आयुष्याच्या आणि करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी नाटककार म्हणून उदयास येत गेला. आज त्यांच्या रोखठोक भूमिका आणि करारीपणामुळे ते नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. अशा या प्रतिभावंत रंगकर्मी आणि एका मोठ्या मनाच्या दिलदार माणसाच्या कर्तृत्वाचा हा प्रवास...
मुंबईच्या शहरी आणि विक्रमगडच्या दुर्गम वनवासी भागामध्ये तळमळीने सकारात्मक बदल करणारे प्रा. हरेश शहा यांच्या कर्तृत्वाचा आवाका मोठाच म्हणावा लागेल. शिक्षणक्षेत्रामध्ये कार्यरत असताना हजारो युवा विद्यार्थ्यांना सक्रिय समाजशील बनवून त्यांना समाजकार्यात सहभागी करणारे प्रा. हरेश शहा...
कॉम्प्युटर वापरकर्त्यांसाठी आज ‘अॅन्टी व्हायरस’ हा परवलीचा शब्द. परंतु, ज्या काळात कॉम्प्युटरच काचेच्या खोलीत ठेवले जायचे, त्या काळात एका मराठमोळ्या माणसाने अॅन्टी व्हायरसचा शोध लावणे, आपल्या टूल्सचा प्रसार करणे आणि जिद्दीच्या, हिमतीच्या बळावर स्वतःची कंपनी स्थापन करणे, हा चमत्कारच म्हटला पाहिजे. पण, हे सत्यात उतरवून दाखवले कधीकाळी पुण्याच्या एका चाळीत राहणाऱ्या, रेडिओ रिपेरिंग करणाऱ्या अन् मंगळवार पेठेत कॉम्प्युटर रिपेरिंगचे दुकान असणाऱ्या कैलास काटकर यांनी. ‘क्विक हिल’ या भारतातील सर्वाधिक मोठ्या कॉम्प्यु
‘स्मार्ट’ आणि ‘डॅशिंग’ व्यक्तिमत्त्व असलेला मराठी चित्रपटसृष्टीचा नायक म्हणून ललित प्रभाकरकडे बघितले जाते. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून ललित घराघरात पोहोचला. ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटात गोपाळरावांची गंभीर भूमिकाही ललितने लीलया साकारली. अशा या हरहुन्नरी आणि एका सामान्य घरातून आलेल्या ललितने योग्य निर्णय आणि कठोर परिश्रमांनी यशोशिखर गाठले आहे. ललितच्या या लालित्यपूर्ण प्रवासाचा घेतलेला हा आढावा....
आपली कला सर्वस्वाने जगणारा तो कलासाधक. ‘सुगो’ जाहिरात एजन्सीचे सुभाष गोंधळे यांचेही आयुष्य असेच कलासंपन्न. ते उत्तम चित्रकार, सुलेखनकार तर आहेतच, पण जाहिरात या ६५व्या कलेतही त्यांनी स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले. अशा या वसईच्या कलासाधकाच्या विविधांगी भावनांच्या रंगांनी बहरलेल्या जीवनाचा हा जिवंत कॅनव्हास...
“तुमचे तुमच्या मुलाकडे लक्ष आहे का?,” असे सांगत ‘रेगे’ साकारणारा, पहाडाएवढे कर्तृत्व असलेल्या बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक भूमिगत कामे मार्गी लावणारा आणि ठाकरेंवरील चित्रपटाचे शिवधनुष्य पेलणारा असा हा ईश्वर न मानणार्या वडिलांचा प्रचंड सश्रद्ध बंडखोर मुलगा, झी टीव्हीवरील हल्ला, राज ठाकरेंना ‘रिप्लेस’ करणारा भारतीय विद्यार्थी सेनेचा प्रमुख ते आता ‘राज’ कारण करत असलेला मनसे नेता. सिद्धहस्त लेखक, दिग्दर्शक अभिजीत पानसे...
सामान्य कुटुंबात जन्माला येऊन आपल्या कर्तृत्वाने कुटुंबाची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या, जीवनातील संकटे ही संधी समजून त्या संकटांवर मात करत आपले कर्तृत्व सिद्ध करणारा, नौकेत बसून पाण्याला जसे झपाझप कापावे, तसे जीवनध्येय गाठताना वाटेतील अडचणी कापणारा आणि मनातील भीतीवर मात करण्यासाठी खास करून नौकानयन क्रीडा प्रकार निवडणारा भारताचा नौकानयन प्रकारातील एकमेव ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ याचा हा जीवनप्रवाह...
न्यायदेवतेची सेवा करणाऱ्या कुटुंबामध्ये जन्माला येऊन तोच वसा पुढे नेणारे, देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या अनेक संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारी पक्षाची बाजू मांडत अनेकांना खडी फोडण्यास पाठविणारे नाशिकमधील असामान्य कर्तृत्व म्हणजे सरकारी वकील अजय मिसर. त्यांच्या कर्तृत्वामुळे गुन्हेशाबितीकरण दरात आजमितीस नाशिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्याच कार्यकर्तृत्वाचा परामर्श घेणारा हा लेखप्रपंच.
रेशनच्या दुकानात सांडलेल्या धान्यावर ज्याच्या जेवणाची थाळी सजायची, जन्मापूर्वीच ज्याने पितृछत्र हरपलेले पाहिले, अकरावीत दोनदा नापास झाल्यानंतर सावरलेला हा अवलिया तरुण पुढे मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे अढळ स्थान प्राप्त करतो. आयुष्यात ‘टर्निंग पॉईंट’ असतात, मात्र ते समजण्याची कुवत असावी लागते. एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी विजू माने यांची ही कर्तृत्वगाथा...