डोंबिवली : र्निबधमुक्त गुढीपाडव्याचे स्वागत करताना पूर्वीचा जोष, उत्साह, जल्लोष, चैतन्य, आनंद आणि एकूणच सकारत्मक वातावरण कल्याण डोंबिवलीत दिसून आले. मास्कमुक्त गुढीपाडवा असल्याने सगळ्य़ांच्या चेह:यावर आनंद ओसांडून वाहत होता. ९४ वर्षीय आजोबांनी दाणपट्टा चालवून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. महिलांनी बर्ची नृत्य सादर करून डोंबिवलीकरांवर गारूड घातले.
गुढीपाडव्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात नववर्ष स्वागतयात्रेची मुहुर्तमेढ डोंबिवलीतून रोवली गेली होती. त्यानंतर सर्व जगभरात ही स्वागतयात्रा पोहोचली आहे. श्री गणोश मंदिर संस्थानकडून नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन केले जाते. यंदाचे २४ वे वर्ष स्वागतयात्रेचे होते. कोरोनामुळे गेली दोन वर्ष स्वागतयात्रेला ब्रेक लागला होता. तरूण-तरूणी गुढीपाडव्यानिमित्त श्री गणेश मंदिरात जाऊन बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आपल्या नववर्षाची सुरूवात करीत असतात. तरूणाई ही परंपरा यंदा ही जपली. त्यानंतर आपल्या मित्र मैत्रिणीला फडके रोडवर जाऊन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. गणोश मंदिर संस्थानतर्फे विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी पूर्व कार्यक्रमात श्री गणपती अथर्वशीर्ष पठण, श्रीसुक्त पठण, संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त देखावा सादर केला.
यंदाच्या वर्षी स्वागतयात्रेला पंडित दीनदयाल रोडवरील नाख्ये हाऊस येथून सुरूवात झाली. सकाळी मंदिरात गणेशपूजा, पंचागवाचन, रामनाम यज्ञ प्रारंभ करून गुढी उभारण्यात आली आहे. कोविड योध्दाचा प्रतिनिधीक सत्कार भाजपा आमदार रविंद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये डॉक्टर, महापालिकेचे कर्मचारी, पोलिस, स्मशानभूमीतील कर्मचारी यांचा समावेश होता. कोविड र्निबध असल्याने चित्ररथांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याने चित्ररथांचा स्वागतयात्रेत समावेश नव्हता. अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला. स्वागतयात्रा मारूती मंदिराकडून द्वारका चौक, रेल्वेपूल, आई बंगला, शिवमंदिर रोड, मानपाडा रोड , शिवाजी पुतळा, बाजीप्रभू चौक, फडके रोड येथून फिरून आप्पा दातार चौकात स्वागतयात्रेचा समारोप झाला.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव म्हणजेच ७५ वे वर्ष असल्याने त्यांचे औचित्य साधून संस्कारभारतीतर्फे ७५ कलाकारांनी वेगवेगळ्य़ा ठिकाणी अत्यंत सुबक अशा रांगोळ्य़ा काढल्या होत्या. गणेश मंदिर संस्थानात ७५ गोल असलेली रांगोळी काढण्यात आली होती. मंदिराच्या आवारात आणि फडके रोडवर रांगोळ्य़ा काढल्या होत्या. अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची विशेष उपस्थिती प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरली होती. आदिनाथ आणि अमृता या दोघांनी ढोलताशांचा गजर करून स्वागतयात्रेचा आनंद लुटला. लेङिाम पथक आणि ढोलताशाच्या गजराचा आवाज संपूर्ण डोंबिवलीत दुमदुमला होता.
नववर्ष स्वागतयात्रेत तरूणाईंनी गर्दी केली होती. लहान मुलांपासून वृध्दार्पयत सर्वजण या स्वागतयात्रेत सहभागी झाले होते. पांरपारिक वेशभूषेत महिलांनी स्वागतयात्रेत ढोलताशाचा गजर केला. अनेक महिलांनी फुगडीवर फेर धरला होता. या स्वागतयात्रेत श्वानांना देखील हजेरी लावली होती. पोलिस मित्रांना देखील कुत्र्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. स्वागतयात्रेत विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. एका सामाजिक संस्थांनी युध्द नको, शांतता हवी असा संदेश दिला आहे. डोंबिवली सायकल क्लब, मोटारसायकल क्लब, माती वाचवा , अंगणवाडी सेविकांनी बालकांनी सदृढ होण्यासाठी संदेश या स्वागतयात्रेतून दिला.
पर्यावरण दक्षता मंडळाने प्लास्टिक वापरू नका, पर्यावरणाची हानी करून नका असे संदेश शोभायात्रेतून दिले. भाजपतर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली होती. मनसे आमदार राजू पाटील यांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले. या शोभायात्रेत चार वर्षांची चिमुकली देखील सहभागी झाली होती. गुढीपाडवा- प्रवेश वाढवा असा संदेश देत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने विद्याथ्र्याना घेऊन शोभायात्रेत सहभागी झाले होते. ढोलताशा पथकाला चौकाचौकात थांबून वाजविण्याची परवानगी देण्यात आली होती. पालिकेच्या शाळेबाहेर शैक्षणिक गुढी उभारली होती.
भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी फडके रोड आज पुन्हा गजबजला आहे. फडके रोडवर गुढीपाडव्यानिमित्त पुन्हा सर्वजण एकत्र आले आहे. हे पाहून आनंद वाटत असल्याचे सांगितले. तर भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे म्हणाले, हिंदू नववर्षाचे महत्त्व जगभरात समजावे यासाठी नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येते. डोंबिवलीची स्वागतयात्रा जगभरात पोहोचली आहे. कोरोनाचे संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना ही त्यांनी नववर्षाच्या निमित्ताने केली आहे.
गणेश मंदिर संस्थानची स्वागतयात्रा शहरी भागातून निघते. पण ग्रामीण भागातील नागरिकांना स्वागतयात्रेत सहभागी होण्यासाठी शहराकडे येता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातून देखील उपयात्रा काढण्यात येत असतात. मानपाडेश्वर शिवमंदिर भक्त मंडळ व मानपाडा ग्रामस्थ मंडळ आणि शांताराम शिवा वङो मराठी व इंग्रजी माध्यम यांच्यातर्फे मानपाडेश्वर मंदिरातून स्वागतयात्रा काढण्यात आली होती. ही स्वागतयात्रा वैभव हॉटेल , विद्यानिकेतन सर्कल, अनुसया भोईर चाळ, नक्षत्र बंगला, जि.प. शाळेच्या मागून फिरून मानपाडेश्वर शिव मंदिरात त्यांची सांगता करण्यात आली.
गुलाब वझे यांनी सांगितले, ग्रामीण परिसरातील लोकांनी एकत्र येऊन स्वागतयात्रा काढली होती. कोविड योध्दाचा सत्कार केला. मोठय़ा उत्साहात नववर्षाचे स्वागत केले आहे. पिंपळेश्वर महादेव मंदिरातर्फे देखील गेली २२ वर्षापासून स्वागतयात्रा काढण्यात येत आहे. मंदिराचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली स्वागतयात्रेसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रामस्थांची भोजनाची देखील व्यवस्था केली होती.