आता निर्बंधमुक्त 'गुढी' उभारा, महाराष्ट्र मास्कमुक्त : राजेश टोपे

राज्य सरकारची महत्वाची घोषणा

    31-Mar-2022
Total Views |

Maharashtra
मुंबई : अखेर महाराष्ट्र सरकारने कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबधी माहिती दिली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच मास्क परिधान करणेदेखील ऐच्छिक असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.
 
 
राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले की, "२ एप्रिलपासून राज्यात संसर्गजन्य आजाराच्या कायद्याअंतर्गत लावण्यात आलेले निर्बंध हाटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, याचा अर्थ आता एकदम बिनधास्तपणे वावरावे असा होत नाही. त्यामुळे लोकांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी मास्क घालावा. मास्क वापरणे ऐच्छिक असेल."