भारतातील अनेक स्टार्टअप अल्पावधीतच प्रचंड यशस्वी ठरले, तर काही स्टार्टअप्सना आपला गाशा गुंडाळावा लागला, याकडे डोळेझाक करता येणार नाही. त्यानिमित्ताने स्टार्टअप्सचा शुभारंभ करण्यापूर्वी आणि स्टार्टअप सुरु केल्यानंतर नेमकी नवउद्योजकांनी काय खबरदारी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
Read More
स्टार्टअपच्या यशस्वीतेत सर्वांत महत्त्वाचे असते, ते अशा स्टार्टअपचे आर्थिक आरोग्य. परंतु, स्टार्टअपने आर्थिक आरोग्य सांभाळायचे म्हणजे नेमके काय करायचे? पैसा मिळवायचा, पण तो टिकवायचा कसा? मी आधी की माझा व्यवसाय? या सर्वच प्रश्नांच्या गलबल्यात अडकून बरेचसे स्टार्टअप अल्पावधीत बंद पडतात. हे नेमके कशामुळे होते आणि ही कोंडी फोडायची तरी कशी? याविषयी ‘फायनान्शियल फिटनेस’चे सुधीर खोत यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
भारताच्या उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी व राष्ट्रीय उत्पादन केंद्र बनविण्याच्या ध्येयाला पाठिंबा देण्यासाठी उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागा(डीपीआयआयटी)ने मोठा निर्णय घेतला. डीपीआयआयटीने सॉफ्टवेअर सोल्यूशन्समधील जागतिक कंपनी एचसीएल सॉफ्टवेअर कंपनीसोबत मॅन्युफॅक्चरिंग इनक्युबेशन उपक्रमाकरिता धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने इन-स्पेस(IN-SPACE) अंतर्गत अंतराळ क्षेत्रासाठी समर्पित १ हजार कोटी व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन करण्यास मंजूरी दिली. दरम्यान, मोदी सरकारने अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा एक भाग म्हणून उपक्रमांमध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी IN-SPACE ची स्थापना केली होती. अंतराळ अर्थव्यवस्था सध्या ८.४ अब्ज डॉलर इतकी असून २०३३ पर्यंत ४४ अब्ज डॉलरचा टप्पा गाठण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे.
केंद्र सरकारने अंतराळ स्टार्ट अप्सच्या साहस निधीसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आगामी गगनयानाच्या पार्श्वभूमीवर अंतराळ क्षेत्रात २००हून अधिक स्टार्टअप्स निर्माण झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ विभाग राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नव्या चार स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे. तंत्र वस्त्रोद्योगातील महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवोदितांसाठी संशोधन आणि उद्योजकतेसाठी अनुदान (ग्रेट) योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रूपये अनुदानासह मान्यता देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने देशांतर्गत रोजगारनिर्मितीस चालना देण्यासाठी स्टार्टअप्स योजनेला प्रोत्साहन दिले आहे. या स्टार्टअपसच्या माध्यमातून देशात रोजगार निर्माण होण्यास मदत होणार असून सरकारकडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सद्वारे १५.५३ लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल याकरिता प्रयत्न केला जाणार आहे.
संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगारनिर्मिती, नवीन स्टार्टअप्सवर भर देण्यात आला. केंद्र सरकारकडून रोजगारनिर्मितीसाठी अनेक नव्या तरतूदी करण्यात आल्या असून नवीन रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.
रालोआ सरकारच्या तिसर्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प दि. 23 जुलै रोजी संसदेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पातून सरकारने मागच्या एका दशकातील आपले धोरणसातत्य कायम ठेवले. त्याबरोबरच सरकारने देशातील ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’ला मारक ठरणारा ‘एंजल टॅक्स’ रद्द केला. त्यासोबतच शेजारील देशांना भारताच्या विकासयात्रेत सहभागी करून घेत त्यांनाही भरघोस आर्थिक मदत दिली. तेव्हा ‘एंजल टॅक्स’ रद्द करुन देशातील स्टार्टअपसाठी आणि शेजारी देशांना मदत जाहीर करुन त्यांच्यासाठीही ‘देवदूत’ ठरलेल्या भारतीय अर्थसंकल्पाचे आकलन...
देशातील तरुणांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करण्याचा निर्माण करण्याचा मार्ग आता निवडला आहे. स्टार्टअपद्वारे आता मोठे यश मिळवत असून ती आता भारताची संस्कृती झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्ली येथे आयोजित स्टार्टअप महाकुंभास संबोधित करताना ते बोलत होते.
गल प्ले स्टोअरमधील काही ॲपचे लिस्टिंग (सदस्यत्व) हटवल्यानंतर या कंपनीच्या नाराजीचा सामना गुगल कंपनीला करावा लागला होता. परंतु केंद्र सरकारने अंतरिम आदेशानंतर ही गायब झालेली अँप पुन्हा प्ले स्टोअरवर दिसू लागली होती. परंतु बिलिंग या आर्थिक बाबतीसह समस्येसह गुगलने बदलेली धोरण लक्षात घेता कंपनीने विशेषतः भारतीय स्टार्टअप ॲप स्टोअरवरून हटवली होती. याची तक्रार सरकारकडे करत या कंपनींनी सरकारकडे यात दखल देण्याची मागणी केली होती.दुसरीकडे या कंपन्यांनी युएसप्रणित गुगलचा हा भारतीय छोट्या कंपन्यांनासोबत असलेला पक्ष
मागच्या एका दशकात ‘स्किल इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ यांसारख्या सरकारी योजनांमुळे देशात एक ‘स्टार्टअप क्रांती’ झाली. त्यात नुकताच दि. १६ जानेवारी रोजी ‘स्टार्टअप दिन’ साजरा करण्यात आला. या दिनाचे निमित्त साधून ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड इंटरनल ट्रेड’ (डीपीआयआयटी)ने स्टार्टअप्सवर एक अहवाल प्रकाशित केला. त्याचेच या लेखात केलेले आकलन...
भारतीय शेतीने याआधी पारंपरिक बैलगाडी आधारित होण्यापासून, ट्रॅक्टर आधारित होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. आता शेतीच्या कामांमध्ये होणारा ड्रोनचा वापर हरित क्रांतीची तिसरी लाट ठरणार आहे. कृषी-ड्रोन तंत्रज्ञान आपल्या शेतीच्या पद्धतींना आधुनिक बनवण्यात आणि त्यामध्ये बदल घडवण्यात खर्या अर्थाने यशस्वी होत असल्याचे सिद्ध होत आहे.
शासनाकडून राज्यातील स्टार्टअप्सना आवश्यक असलेले सर्व सहकार्य केले जाईल. आपल्या राज्यास स्टार्ट-अपमध्ये देशात प्रथम क्रमांकावर कायम ठेवण्यास सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
वस्त्रोद्योग क्षेत्रात दर्जात्मक उत्पादन व उत्पादकतेच्या जोडीलाच नावीन्य-कल्पकता, संशोधन स्थायी स्वरुपातील विकास व त्याशिवाय उद्योजकतेवर भर दिला जातो. याच धोरणांना अनुसरून केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने विशेष बाब म्हणून, वस्त्रोद्योगाशी संबंधित स्टार्टअप धोरण जाहीर केले आहे. या नव्या उपक्रमाविषयी...
‘रोबोटिक्स’ हे अतिशय वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान. केवळ पाश्चिमात्त्य देशांतच नाही, तर भारतातही ‘रोबोटिक्स’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित तंत्रज्ञानाला गतिमानता प्राप्त झालेली दिसते. मोठमोठ्या कंपन्यांसह अनेक स्टार्टअप्सही ‘रोबोटिक्स’च्या या विश्वात आपले नजीब आजमावत आहेत. नुकतेच केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी रोबोटिक्स क्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय धोरण नागरिकांच्या अभिप्रायासाठी खुले केले आहे. भारत सरकारच्या या ‘मिशन रोबोटिक्स’निमित्ताने या तंत्रज्ञानाचा, त्या
गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यातील ३५० तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्ताने राज्यातील कौशल्य प्रशिक्षण उपक्रम, नवनवीन संकल्पनांना जन्म देणारे ‘स्टार्टअप्स’ना, ‘आयटीआय’चे आधुनिकीकरण यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच या लेखात घेतलेल
पाश्चिमात्य देशांनी भारताकडे आजपर्यंत कायम एक बाजारपेठ म्हणून व्यावसायिक दृष्टीनेच पाहिले. पण, मागच्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’, ‘मेड इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्टअप्स इंडिया’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करत, भारताला जगातील एक मुख्य उत्पादक देश बनवले. त्याचाच परिणाम आज आपल्याला भारताच्या निर्यातीवाढीतून दिसून येतो. त्याचेच हे आकलन...
भारत सरकारने २०२५ पर्यंत देशाच्या ऐकूण जीडीपीत २०-२५ टक्के वाटा हा तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्राचा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारताचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी भारतीय अमेरिकन उद्योजकांशी संवाद साधतांना ही माहिती दिली.
मुंबई : "कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज" यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'बिल्डिंग वोर्कफोर्स फॉर इंडस्ट्री ४.० : दि डिमांड अँड सप्लाय कॉननड्रम' या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. ही परिषद ताज प्रेसिडेंट हॉटेल, कफ परेड येथे झाली. यावेळी बोलताना ग्रामीण भागातील लोकसंख्या कुशल असणे हे अत्यावश्यक असल्याचे लोढांनी यावेळी सांगितले.
२०१८ मध्ये वॉलमार्टने भारतीय स्टार्टअप असलेल्या फ्लिपकार्टला १६ बिलियन डॉलरमध्ये खरेदी केलं होत. तेव्हापासुन फ्लिपकार्टमध्ये मोठे बदल झाले आहेत. आता वॉलमार्टचे मुख्य वित्तीय अधिकारी जॉन डेव्हिड रेनी यांच्या मते फ्लिपकार्टमध्ये १०० अब्ज डॉलरची एंटरप्राइजेस बनण्याची क्षमता आहे.
वर्षभरापूर्वी दै.‘मुंबई तरुण भारत’तर्फे महाराष्ट्रातील नवउद्यमींची गाथा सांगणारी ‘स्टार्टअप फर्स्ट’ ही व्हिडिओ मालिका आणि लेखमालिका आम्ही प्रसिद्ध केली होती. त्यानिमित्ताने काही मोजक्या स्टार्टअप्सचा प्रवास मांडला होता. अशी ही ‘स्टार्टअप’ची संकल्पना २०१२-१३ पासून देशभरात रुजू झाली. मात्र, आजघडीला भारतात एकूण ९० हजारांवर ‘स्टार्टअप्स’ची नोंद असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. याचाच केलेला हा उहापोह...
यंदाचा महाराष्ट्र दिन आपल्या सर्वांसाठी खास असेल. कारण, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रथमच ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत सर्वदूर ऐकले जाईल. आजच्या या मंगल दिनी आपण सर्वांनी एकजूट व्हावे, अशीच अपेक्षा व्यक्त करतो.
भारतीयांच्या स्टार्टअप क्षेत्रातील आजवरच्या यशस्वी कामगिरीचा परिणाम ‘जी २०’अंतर्गत स्टार्टअप समूहावर होणे अपरिहार्य ठरते. यातील पहिल्या टप्प्यातच सुमारे ३० देश आणि त्यांचे प्रशासक-प्रतिनिधी यांनीच नव्हे, तर ‘इंटरपोल’सारख्या प्रतिष्ठित जागतिक संस्थेने भारतीय स्टार्टअप कंपन्यांकडून सहकार्य-समन्वयाच्या भावनेतून विशेषत: नैसर्गिक आपत्ती, अवघड व भीषणप्रसंगी अद्ययावत संवाद-संपर्कासह करावयाच्या उपाययोजना व तोडगा शोधणे यासारखे प्रशिक्षण घेण्याची तर पूर्वतयारी सुरू केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील वादग्रस्त ‘कलम ३७०’ हटवल्यानंतर खोर्यामध्ये अक्षरशः आग लागेल, अशा वल्गना करणारे फुटीरतावादी नेते आज मंदिरात जाऊन प्रसादाच्या रांगेत थांबताना दिसतात, तर जम्मू-काश्मीरमधील युवक हा रोजगाराच्या नवनव्या संधी मिळवताना दिसून येतो. भारताचे हे नंदनवन विकासाच्या मार्गात आपले पुरेपूर योगदान देताना दिसते.
भारताचा मुकूटमणी असलेल्या जम्मू-काश्मीरचे कृषिक्षेत्र समृद्ध करणार्यांचे परिश्रम फळाला येतीलच. पण, सोबतच दहशतवादाच्या भळभळत्या जखमाही भरून निघतील आणि पुन्हा नव्याने हा मुकूट रत्नजडित होईल.
‘कोविड’ काळातूनही भारतीय अर्थव्यवस्था तावून-सुलाखून निघाली. या संकटकाळातही भारत मात्र संधीच्या वाटा शोधत राहिला. कोरोनाच्या दोन वर्षांत अडकून न पडता, पुढील २५ वर्षांचे ‘व्हिजन’ मोदींनी समोर ठेवले. विकासाच्या या नव्या वाटांवर चालताना भारताकडे तंत्रसुसज्जता असेलच, सोबत जगाने दाखविलेला विश्वासही कायम असेल.
प्रचंड श्रमशक्ती असूनही तुटपुंज्या पायाभूत सुविधांचा गरीब देश अशी पूर्वी भारताची जगात प्रतिमा होती. पण, आज हिंदुस्थान सशक्त अर्थशक्ती म्हणून उदयास येत आहे. स्थिर राजकीय सरकार, सूक्ष्म आर्थिक सुधारणा, डिजिटलायझेशन तसेच दळववळण, पाणी, वीज यातील प्रगतीसह मुक्त आर्थिक धोरण यामुळे देश विकासाचा नवोन्मेष धारण करत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत जोरदार चर्चा सुरू आहे. अदानी कंपनीच्या शेअर्सच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत असताना, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी केलेल्या राजकीय हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारत आज समस्या सोडवण्याचे माध्यम बनत आहे. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितले होते की, एकेकाळी आपल्या बहुतेक समस्या सोडवण्यासाठी इतरांवर अवलंबून असलेला भारत आता जगाच्
फडणवीस-शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून काही आमूलाग्र बदल सातत्याने होत आहेत. पीक विमा क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नवीन स्टार्टअप्सनी या क्षेत्रात आपले योगदान द्यावे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 'क्रेड' कंपनीचे संस्थापक कुणाल शाह यांनी वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये मुलाखत घेतली.
प्रवास करणे म्हणा सगळ्यांच्याच आवडीचे. पण, प्रवास म्हणजे फक्त मजामस्ती, फिरायला जाणे, धांगडधिंगा घालणे एवढ्यापुरतेच मर्यादित असते का? स्वतःला ओळखून, स्वतःच्या अंतर्आत्म्याला प्रतिसाद देऊन, स्वतःला विकसित करण्याचा प्रवास हाही तितकाच महत्त्वाचा असतो,
‘स्टार्टअप्स’, उद्योग, जोखीम भांडवल निधी, आणि उद्योगांसाठी मुक्त तसेच सुलभ वातावरण अशा प्रकारच्या विविध सरकारी उपक्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. मला खात्री आहे की, येत्या काही वर्षांमध्ये आताच्या ‘स्टार्टअप्स’चे रूपांतर दर्जेदार उद्योगांमध्ये मोठ्या संख्येने होईल. त्यामुळे वैद्यकीय, आरोग्य सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये चांगले बदल घडून येतील आणि जगभरातील नागरिकांना अधिकाधिक परवडणार्या दरात आणि जास्त सुलभतेने आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.
चालू महिन्याच्या ५ तारखेला भारतातील ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’ची संख्या १०० झाली व त्यांचे एकूण मूल्य २५ लाख कोटींपार गेल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताने स्टार्टअप क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘मन की बात’च्या ८९व्या भागातून देशाला संबोधित केले.
भारतात नवी ‘स्टार्ट-अप’ संस्कृती उदयाला आली असून यामुळे परकीय भांडवलाचा, गुंतवणुकीचा प्रवाह सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयएमएफ’ला भारतीय अर्थव्यवस्थेविषयी वर्तवलेल्या जुन्या अंदाजावरुन माघार घ्यावी लागली व भारत २०२६-२७ मध्येच पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल, हे मान्य करावे लागले
कोणी कसली नशा करावी, हे आपण सांगू शकत नाहीच. पण, देशातील तरुण मोदीविरोधी टोळक्याच्या नादी लागण्याऐवजी नावीन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे, हे आश्वासक आणि यातूनच येत्या काळात १५०, २०० आणि आणखी कितीतरी ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’ उदयाला येतील व भारत जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल, याची खात्री वाटते.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे शारीरिक समस्यांबरोबरच मानसिक समस्याही तितक्याच तीव्रतेने भेडसावतात. पण, मानसिक समस्यांकडे दुर्देवाने म्हणावे तितक्या गांभीर्याने आजही पाहिले जात नाही. हीच गोष्ट ओळखून पुण्याच्या रसिका आगलावे यांनी मन:स्वास्थ्यासाठी ‘ब्लूमिंग माईंड स्टुडिओ’च्या माध्यमातून एक आगळावेगळा प्रयोग केला आहे. तेव्हा, एकूणच मानसिक आरोग्याबाबतची जागरुकता आणि रसिका यांच्या नव्या प्रयोगाविषयी माहिती देणारा हा लेख...
विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील विशाल मेठी यांचा जन्म. सर्वसाधारण मुलांसारखे स्वतः चांगले शिक्षण घेऊन करिअर घडवावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. तसेच विशाल यांनी ‘आयटी इंजिनिअरिंग’चे शिक्षण घेतले आणि नोकरीला सुरुवात केली.
‘आयआयटी कानपूर’मधून ‘बी.टेक’ची पदवी संपादित केल्यानंतर रुळलेली नोकरीची वाट सोडून या उद्योजकाने आपल्या स्वप्नांना, कल्पनांना स्वतः आकार देण्यासाठी उद्योजकतेची स्वतंत्र वाट चोखाळली. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणार्या ‘कुलॉम्ब लायटेक प्रा. लि.’च्या अमेय साठे यांच्या उद्योजकीय प्रवासाची ही कहाणी....
देशातील स्टार्टअप्स कडून आता पर्यंत तब्ब्ल ७ लाख नोकऱ्यांची निर्मिती झाली असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नुकतेच राज्यसभेत सांगितले
स्वतःच्या संकल्पनांना आकार द्यायचा असेल, तर स्वतंत्र काम करण्याशिवाय पर्याय नाही. या वृत्तीने काम करुन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून कृषिक्रांती घडविणार्या ‘ऑटोनेक्स्ट प्रा. लिमिटेड’च्या कौस्तुभ धोंडे यांच्या उद्यमभरारीचा आणि त्यांनी उद्योजकांना केलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा आढावा घेणारा हा लेख...
जुनिओ या भारतातील पहिल्या मुलांवर लक्ष्याधारित डिजिटल प्रदान आणि पॉकेट मनी अॅपने आज घोषणा केली आहे की, त्यांनी यूएईवर आधारित संस्था एनबी व्हेंचर्सच्या नेतृत्वाखाली राजीव ददलानी समूहाच्या मोठ्या सहभागातून आयोजित प्री सीरिज ए फंडिंग फेरीत ६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची उभारणी केली आहे
स्टार्टअप्सचे दिवसागणिक भरारी घेणारे उद्योगविश्व आणि स्टार्टअप्सच्या यशोगाथा समोर आणणारे आजपासून दर शुक्रवारी नवे सदर ‘स्टार्टअप फर्स्ट.’ आजचा पहिला लेख देशभरातील स्टार्टअप्सना ‘किकस्टार्ट’ करणार्या अनुभवसंपन्न हर्षवर्धन गुणे यांनी नवउद्योजकांना केलेल्या मार्गदर्शनाविषयी...
मंदिरात जाण्याचा वा धर्मांतरविरोधी कायद्याचा वा उत्तर प्रदेशात तिरंगा रॅली आयोजित करण्याचा केवळ दिखावा अरविंद केजरीवाल करत आहेत. स्वतःच्याच अंगावर शाई फेकून घेणे वा चप्पल भिरकावण्यासारखेच हेदेखील त्यांचे निवडणूक स्टंटच आहेत. अर्थात, जनतेलाही या दिल्लीवाल्या नौटंकीबाजांचे ढोंग चांगलेच ठाऊक आहे. केजरीवालांचे खायचे आणि दाखवायचे दात आतापर्यंत सर्वांनी पाहिले आहेत. म्हणूनच मतदार निवडणुका पाहून नव्हे, तर विचार म्हणून हिंदुत्वनिष्ठ आहे, त्यालाच निवडतील!
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्टार्टअप्स दिल्या जाणाऱ्या करसवलतीस मुदतवाढ देऊन खुशखबर दिली आहे .
कोरोना संकटाचा यशस्वीपणे मुकाबला करणारा भारतच २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षात चीनपेक्षाही सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहाणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेसह संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला आहे. यावरुन नरेंद्र मोदींसारख्या अर्थनीतिधुरंधराच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक शक्ती म्हणून आपले स्थान अधिकाधिक बळकट करत असल्याचे स्पष्ट होते.
‘स्टार प्लस’ वाहिनीवरुन प्रसारित होणार्या ‘मास्टर शेफ’ या कार्यक्रमाच्या परीक्षक मंडळातील ते एक परीक्षक. आपणसुद्धा या बदलणार्या काळासोबत बदलायला हवे, असा विचार करत त्यांनी ‘ऑनलाईन ट्रेनिंग’ द्यायला सुरुवात केली. निव्वळ दीड-दोन वर्षांत त्यांनी शेकडो ‘फूड उद्योजक’ घडवले. ही यशोगाथा आहे ‘शेफ चेतक अकॅडमी’चे संचालक चेतक घेगडमल यांची...
एका बाजूला ‘स्टार्टअप्स’ व ‘इनोव्हेशन’च्या माध्यमातून कृषिक्षेत्रात नावीन्याचा प्रवेश होत असतानाच त्यातून तयार होणार्या मालाच्या देशांतर्गतनंतर बाह्य बाजारासाठीचे मोदी सरकारचे प्रयत्न प्रशंसनीय म्हटले पाहिजेत. यातून नजीकच्या काळात नक्कीच भारतीय शेती व शेतकरी समृद्ध होईल, याची खात्री वाटते.
स्मार्टफोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता कृषी तंत्रज्ञान हे घरापासून शेती-शिवारांपर्यंत पोहोचले आहे. विविध अभ्यासपूर्ण उपक्रम-प्रयोगांद्वारे कृषी क्षेत्रातील उत्पादन व्यावसायिक स्वरूपात संकलित-वितरित करण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जाऊ शकतात, याची यशस्वी उदाहरणे विविध ठिकाणी अनुभवता येतात.
आपल्या देशाला आगीच्या अपघातापासून मुक्त करण्याची चळवळ उभारण्याचं कार्य सध्या अरविंद करत आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांना त्याची कंपनी आगीपासून संरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण देते. आगविरहीत भारत घडविण्याचं त्याचं स्वप्न खरंच वाखाणण्यासारखं आहे.
उद्योगव्यवस्थेसाठी क्षेत्रानुरूप व्यवस्थापन पद्धतीदेखील प्रस्थापित करणे आजच्या काळात गरजेचे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि स्टार्टअपसाठी 'बिझनेस स्कोर कार्ड' या व्यवस्थापन कार्यपद्धतीचा आवर्जून विचार केला जाऊ शकतो.