मुंबई: जुनिओ या भारतातील पहिल्या मुलांवर लक्ष्याधारित डिजिटल प्रदान आणि पॉकेट मनी अॅपने आज घोषणा केली आहे की, त्यांनी यूएईवर आधारित संस्था एनबी व्हेंचर्सच्या नेतृत्वाखाली राजीव ददलानी समूहाच्या मोठ्या सहभागातून आयोजित प्री सीरिज ए फंडिंग फेरीत ६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची उभारणी केली आहे. फिनटेक स्टार्टअपचे उद्दिष्ट नव्याने तयार केलेले भांडवल आपल्या टीमला प्रोत्साहन देणे, नवीन उत्पादन वैशिष्टे आणणे आणि ग्राहक मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी वापरण्याचे आहे.
शंकर नाथ आणि अंकित गेरा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जुनिओचे उद्दिष्ट मुलांसाठी पॉकेट मनीचे डिजिटलायझेशन करणे आणि एक प्राधान्याचा डिजिटल पेमेंट पर्याय ठरण्याचे आहे. हा प्लॅटफॉर्म एक स्मार्टकार्ड देतो, जो मुलांना ऑफलाइन आणि ऑनलाइन खरेदी करणे शक्य करतो. या नवी दिल्लीस्थित स्टार्टअपचे ध्येय पैशाचे व्यवस्थापन मजेशीर आणि प्रत्यक्ष स्वरूपात कसे करावे याबाबत मुलांमध्ये शिस्तबद्धता आणि जागरूकता निर्माण करण्याचे आहे. पालकांना त्यांच्या मुलांच्या खर्चाच्या पद्धती पाहता येतील आणि पैशाच्या व्यवस्थापनाबाबत ते प्रारंभीचे काही धडे देऊ शकतात.
जुनिओचे सहसंस्थापक अंकित गेरा आणि शंकर नाथ म्हणाले की, “आम्ही हे अॅप मागील वर्षी आणल्यापासून त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसत आहे. पालक-मुलांच्या समुदायात त्याचा अंगीकार मोठ्या प्रमाणावर होत आहे. आम्ही एक वापरकर्तास्नेही उत्पादन विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत असताना नवीन आणि आकर्षक वैशिष्टे आणण्याच्या प्रक्रियेत आहोत. आम्हाला नवीन गुंतवणूकदार आमच्यासोबत येताना पाहून खूप आनंद होत आहे आणि आम्ही त्यांच्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानतो.”