अंतराळ क्षेत्रासाठी १ हजार कोटींचा व्हेंचर कॅपिटल फंड; केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
24-Oct-2024
Total Views |
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने इन-स्पेस(IN-SPACE) अंतर्गत अंतराळ क्षेत्रासाठी समर्पित १ हजार कोटी व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन करण्यास मंजूरी दिली. दरम्यान, मोदी सरकारने अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा एक भाग म्हणून उपक्रमांमध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी IN-SPACE ची स्थापना केली होती. अंतराळ अर्थव्यवस्था सध्या ८.४ अब्ज डॉलर इतकी असून २०३३ पर्यंत ४४ अब्ज डॉलरचा टप्पा गाठण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे.
दरम्यान, IN-SPACE ने भारताच्या अंतराळ अर्थव्यवस्थेच्या विकासाला पाठबळ देण्यासाठी १ हजार कोटींच्या व्हेंचर कॅपिटल फंडचा प्रस्ताव ठेवला आहे. आता केंद्राने क्षेत्रासाठी १ हजार कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल फंड स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे, सेबीच्या नियमांनुसार पर्यायी गुंतवणूक निधी म्हणून कार्य करेल. स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यातील भाग भांडवल प्रदान करून पुढील टप्प्यात खासगी भाग भांडवल मिळवण्यासाठी सक्षम होणार आहे.
स्तावित निधी अपस्ट्रीम, मिडस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीममधील संपूर्ण अंतराळ पुरवठा साखळीतील स्टार्टअप्सना पाठबळ देऊन भारतीय अंतराळ क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना देईल अशी अपेक्षा आहे. यामुळे व्यवसायांचा विस्तार , संशोधन आणि विकासात गुंतवणूक आणि मनुष्यबळाचा विस्तार करायला साहाय्य मिळणार आहे.