कौशल्य विकास ग्रामीण भागात केंद्रित व्हायला हवा : मंगल प्रभात लोढा
20-Jun-2023
Total Views |
मुंबई : "कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज" यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'बिल्डिंग वोर्कफोर्स फॉर इंडस्ट्री ४.० : दि डिमांड अँड सप्लाय कॉननड्रम' या परिषदेच्या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. ही परिषद ताज प्रेसिडेंट हॉटेल, कफ परेड येथे झाली. यावेळी बोलताना ग्रामीण भागातील लोकसंख्या कुशल असणे हे अत्यावश्यक असल्याचे लोढांनी यावेळी सांगितले.
तसेच, ग्रामीण भागात कौशल्य विकास साधल्यास, योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर अतिशय कमी होईल, असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. तसेच, हा विकास साधण्यासाठी व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आणि कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विविध माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'स्टार्टअप्स' आणि नवीन उद्योजकांसाठी पोषक वातावरण देशात तयार होत असून महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक उद्योजकाला त्याच्या संकल्पनेला, नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन प्रशासनातर्फे प्रोत्साहन मिळत राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.