बांधकामाचे रोबोट

Total Views |
 
Construction robots capable performing
 
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, तंत्रज्ञानाच्या एकात्मिकतेमुळे लक्षणीय बदल झाला आहे. बांधकाम प्रक्रियेत रोबोटिक्सचा समावेश ही अशीच एक क्रांतिकारी प्रगती म्हणावी लागेल. रोबोटिक बांधकाम हे संरचना, नियोजन आणि अंमलबजावणी करण्यामध्ये एक आदर्श बदल आहे. बांधकामात रोबोटचा वापर नवीन नाही, परंतु रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ऑटोमेशनमधील अलीकडील प्रगतीमुळे त्यांच्या क्षमता वाढल्या आहेत. रोबोटिक बांधकामात विटांचे बांधकाम आणि काँक्रीट ओतण्यापासून ते जटिल असेंब्लीपर्यंतच्या प्रयोगांचा समावेश होतो. पारंपरिक बांधकाम पद्धतीत विटकाम, वेल्डिंग, रंगकाम आणि जड यंत्रसामग्री चालवणे अशी कामे, मोठ्या प्रमाणात शारीरिक श्रमांवर अवलंबून होती. त्यामुळे प्रकल्पाच्या वेळ वाढत असून, अनेक चुकांमुळे प्रकल्पाच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असे. मात्र, बांधकाम उद्योगात रोबोटिक्स आणि ऑटोमेशनच्या आगमनाने, दीर्घकालीन आव्हानांना तोंड देणे शक्य झालेे. बांधकाम रोबोटिक्समध्ये पारंपरिकपणे मॅन्युअल, पुनरावृत्ती करणारे, धोकादायक किंवा शारीरिकदृष्ट्या कठीण कामे करण्यास सक्षम रोबोट्सही उपलब्ध आहेत.
 
बांधकाम क्षेत्रातील रोबोटिक्स सिस्टम कशी कार्यान्वित होते, तेही पाहूया. प्राथमिक रोबोटिक सिस्टममध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. जसे की, ’ऑफ-साईट प्रीफॅब्रिकेशन सिस्टम’ यामध्ये नियंत्रित, ऑफ-साईट क्षेत्रात बांधकाम घटकांचे किंवा संपूर्ण इमारतींची निर्मिती करणे शक्य होते. ’ऑन-साईट ऑटोमेटेड रोबोटिक सिस्टम’ बांधकाम साईटवर थेट कार्यरत असतात. हे रोबोट मटेरियल हाताळणी, विटकाम, वेल्डिंग आणि काँक्रीट ओतणे यांसारखी कामे करतात. ’ड्रोन आणि स्वायत्त वाहने’ ही साईटवरील देखरेख, सर्वेक्षण आणि प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी वापरतात. तसेच कॅमेरे आणि सेन्सर्सनी सुसज्ज ड्रोन, साईटमधील मटेरियल आणि उपकरणांच्या वाहतुकीसाठी, लॉजिस्टिक्स आणि ऑपरेशन्समध्ये वापरात. ’एक्सोस्केलेटन वेअरेबल डिव्हाइसेस’चा वापर जड किंवा सतत सुरू असलेल्या हालचाली, कामगारांना मदत करणे आणि मानव - यांत्रिक कार्यक्षमतेमधील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने होतो. रोबोटिक्सच्या वाढत्या मागणीमुळे, जागतिक रोबोट्सचे मागणी वाढत आहे.
 
नवीन जागतिक रोबोटिक्स आकडेवारी ही जगभरातील ऑटोमेशन उत्पादन करणार्‍या औद्योगिक रोबोट्सच्या संख्येतील उच्चांक दर्शवते, असे ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्स’च्या अध्यक्षा मरीना बिल म्हणतात. 2023 मध्ये 5 लाख, 41 हजार, 302 युनिट्सचा वार्षिक स्थापनेचा आकडा इतिहासातील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वोच्च आहे. 2022 मध्ये 5 लाख, 52 हजार, 946 युनिट्स स्थापित करण्याच्या विक्रमापेक्षा तो फक्त दोन टक्के कमी आहे. नवीन जागतिक रोबोटिक्स अहवालातही जगभरातील कारखान्यांमध्ये 42 लाख, 81 हजार, 585 युनिट्सची नोंद झाली. प्रदेशानुसार, 2023 मध्ये नवीन तैनात केलेल्या सर्व रोबोट्सपैकी 70 टक्के आशियामध्ये, 17 टक्के युरोपमध्ये आणि दहा टक्के अमेरिकेत स्थापित केले गेले.
 
बांधकाम रोबोट बाजार अहवाल अंदाज 2023 ते 2033 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे, जागतिक बांधकाम रोबोट बाजारपेठेने 2022 मध्ये 173 अब्ज अमेरिकन डॉलर्सची विक्री केली. याच काळात स्वायत्त बांधकाम उपकरणांची विक्रीही 16.6 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे 2033च्या अखेरीस बाजारपेठेचा आकार 936 अब्ज अमेरिकन डॉलर्स होईल. बांधकाम साईट्सवर उत्पादकता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी बांधकाम रोबोट्स महत्त्वपूर्ण उत्क्रांती घडवतील, असा अंदाज आहे. बांधकाम बाजारपेठेतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे रोबोट्स एक पर्याय म्हणून समोर येतील. जगभरातील विविध देशांमधील बांधकाम स्थळे आणि कामाची ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी, बांधकाम उद्योग आणि उपकरणे विक्रेत्यांकडून कठोर नियम आणि निकष पाळले जातील अशी अपेक्षा आहे. शिवाय, बांधकाम उद्योगात अपघात होण्याची शक्यता, अनेक सुरक्षा मर्यादा असल्याने सरकारकडूनही कठोर नियम लागू केले जातीत. कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीत कामगारांचे संरक्षण करण्यासाठी अनेक सरकारे प्रयत्न करतात. अशावेळी बांधकाम क्षेत्रात रोबोटचा अवलंब केल्याने, कामगारांच्या सुरक्षिततेशी संबंधित खर्च कमी होईल आणि त्यामुळे या रोबोटिक्समधील संधी वाढण्याचाही अंदाज आहे.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121