जगभरातले सगळे मुस्लीम एक असतात. जी काही विषमता असते, ती केवळ भारतात आणि त्यातही हिंदू धर्मात, असे सातत्याने आपल्याला दाखवून देण्याचा सारखा खटाटोप केला जातो. पण, हे खरे आहे का? तर अजिबात नाही. नुकतीच पाकिस्तानातून बातमी आली की, तेथील अहमदिया मुस्लिमांनी ईद साजरी केली, तर त्यांना पाच लाख रुपये दंड भरावा लागेल. कारण, शिया, सुन्नी आणि इस्लाममधील इतर 71 पिरक्यांनुसार अहमदिया हे मुळी मुसलमानच नाहीत. काय म्हणावे? इस्लामचा विस्तार व्हावा, म्हणून जगभरात अनेक शतके रक्तरंजित हिंसा झाली आणि आजही ती सुरुच आहे. पण, अहमदिया मुसलमान सातत्याने म्हणतात की, ते मुसलमान आहेत, तरीसुद्धा त्यांना जगभरातले इतर मुसलमान लाथाडतात. हेच ते इस्लामचे ‘बद्ररहुड’ का?
इस्लामसाठी अस्तित्वात आलेला ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ उद्या, दि. 7 जून रोजी ईद. त्याआधीच पाकिस्तानी सरकारने अहमदिया मुस्लिमांची धरपकड सुरू केली. पण, मग अहमदिया मुसलमानांना पाकिस्तानचा विरोध का? कारण, इस्लाममध्ये हजरत मुहम्मद हेच अंतिम पैगंबर आहेत, असे मानले जाते. त्यांच्यानंतर कुणीही पैगंबर असणार नाही, होणार नाही, असे मुस्लिमांचे ठाम आणि कट्टर मत. असे असताना 1889 साली पंजाबच्या लुधियानामध्ये कादियान गावात मिर्जा गुलाम अहमद यांनी मुस्लिमांचे संघटन केले. त्यांनी स्वतःला ‘खलिफा’ म्हणून घोषित केले. हजरत मुहम्मदनंतर कुणीच पैगंबर होणार नाही, असे इस्लामने सांगितले असताना स्वतःला पैगंबर घोषित करणे म्हणजे नबींचा आणि इस्लामचा अपमान आहे, असे जगभरातल्या मुसलमानांना वाटते. दुसरीकडे अहमदिया मुसलमान हे मिर्जा अहमद यांना ‘मसिहा’ मानतात. अहमदियांच्या अधिकृत संकेतस्थळाने जाहीर केले आहे की, धार्मिक युद्ध आणि कट्टर धर्मांधता समाप्त करून शांती प्राप्त करण्यासाठी मिर्जा गुलाम अहमद हे अल्लाच्या मर्जीने पृथ्वीवर आले आहेत.
हे अहमदिया मुसलमान जगभरात आहेत. मात्र, जगभरातले 57 देश त्यांच्या विरोधातच आहेत. तसेच, यांना हज यात्रेलाही बंदी आहे. या परिक्षेपात भारतामध्ये अहमदियांना मुस्लीम म्हणूनच वर्गीकृत केले गेले. भारतातील काही मुस्लीम संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. पण, भारत सरकारने त्यांना भीक घातली नाही. आपल्या देशात 2027 साली जातीय जनगणना होणार आहे. त्यानुसार मुस्लिमांचीही त्यांच्या फिरक्यानुसार जनगणना व्हायला हवी. देशात इस्लाममधील किती फिरक्यांचे किती मुस्लीम राहतात, हे भारतीय जनतेलाही कळेल. कारण, आपल्याला मुसलमान म्हणजे सुन्नी किंवा शिया हेच माहिती आहेत. पण, सुन्नींमध्येही हनफी, शाफई, मलिकी, हम्बली, सुफी, वहाबी, देवबंदी, बरेलवी, सलफी, अहले हदीस वगैरे पंथसदृश्य भाग आहेत, तर शियांमध्ये इशना अशरी, जाफरी, जैदी, इस्माईली, बोहरा, दाऊदी, खोजा, द्रुज वगैरे आहेत. सुन्नी आणि शियांमध्ये वर्गीकृत नसलेले मात्र मुसलमान म्हणून स्वतःची ओळख असलेले अहमदिया, कादियानी, खारजी, कुर्द आणि बहाई हे इस्लामिक गट आहेत.
इस्लामिक राज्य असलेल्या पाकिस्तानमध्ये या इस्लामी गटतटात भरपूर संघर्ष चालत राहतो. पण, वाचकहो, तुम्ही कधी आयुष्यात एकदा तरी कुण्या मुस्लीम व्यक्तीला आपण या फिरक्याचे मुसलमान आहोत, असे म्हणताना ऐकले आहे का? नव्हे, भारतासारख्या हिंदूबहुल देशात मुस्लीम म्हणून ते एकत्र आहोत, असे दाखवतात. यांच्यातले अनेकजण हिंदूंमध्ये कशा जाती आहेत, हेही सांगत असतात. ते शहाणपण (की आणखी काही) त्यांच्याकडे आहे. असो, आपल्या देशात अनेक मुस्लीम संघटना पॅलेस्टाईनसाठी रडत असतात. अनेकदा हिंसाही करतात. म्यानमारच्या रोहिंग्या मुसलमांनासाठी केलेली हिंसा आठवते ना? या सगळ्यांना इस्लामला मानणार्या अहमदिया मुसलमांनाची दया, करुणा वगैरे येत नाही का? जगभराच्या तुलनेत सर्वाधिक अहमदिया मुसलमान पाकिस्तानमध्ये राहतात. मात्र, पाकिस्तानमध्ये यांच्यावर अत्याचार होतात. यावर वाटते की, किती दिवस पाकिस्तानचा अत्याचार सहन करणार? अहमदिया मुसलमानांनीही पाकिस्तानमधून फुटून वेगळा अहमदियास्तान मागावा. आमेन बरं का!