औरंगाबाद आणि उस्मानाबाद या महसुली विभागांचे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळले. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्या. एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आणि उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले.
Read More
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावरुन जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात असताना बेकायदेशिररित्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनरचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. तो पूर्णपणे बेकायदेशिररित्या घेतला गेला होता. त्यामुळे आम्हाला हा महत्वपूर्ण निर्णय घ्यावा लागला."
कर्नाटकात १० मे रोजी मतदान होणार आहे.त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमावर्तीय भागातील कर्नाटकातील नागरिकांनी मतदानासाठी जाता यावे यासाठी या भागात भरपगारी सुट्टी जाहिर केली आहे. हा आदेश कोल्हापुर,सांगली , सोलापूर , सिंधुदूर्ग , उस्मानाबाद, लातूर , नांदेड या जिल्ह्यातील कामागारांना लागू होणार आहे. तसेच हा आदेश शासनाच्या कामगार विभागाच्या अख्यारित येणाऱ्या सर्व सरकारी घटकांना बंधनकारक आहे. त्यामुळे कर्नाटकात जास्तीत जास्त मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने राज्याच्या नामांतराला हिरवा कंदील दाखवत प्रस्ताव मंजूर केला, आणि औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर तर, उस्मानाबादचे नाव बदलून धाराशीव करण्यात आले. मात्र, एमआयएमचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली असून औरंगाबाद नावाचा बोर्डही लावण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच छत्रपती संभाजीनगर येथील वातावरण अधिकच चिघळले आहे. त्यात मनसेने इम्तियाज जलील यांच्या विरोधातच आक्रमक भूमिका घेत राजीनाम्याची मागणी केली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीनंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आता औरंगाबाद महापालिकेच्याही नावातही ‘छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका’ असा बदल करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने एक पत्र जाहीर केले असून या पत्राद्वारे सर्व विभाग प्रमुखांना याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्राच्या मंजुरीनंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे नामांतर झाले होते. आता या शहरांसह दोन्ही जिल्ह्यांचेही नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे करण्यात आले आहे. त्याचे परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे. त्यामुळे गोंधळ होणार नाही.
औरंगाबाद, उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तात्काळ सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये १६जून रोजी तब्ब्ल दीड तास राज्याच्या अनुषंगाने महत्वाच्या असलेल्या निर्णयावर बैठक पार पडली.
महाराष्ट्राला नामांतर, त्यावरुन उठणारा वादंग वगैरे अजिबात नवीन नाही. ७०-८०च्या दशकांत तर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावरुन अक्षरश: रान पेटले होते. पण, त्यावेळी या नामांतर आणि नामविस्तारासाठी अत्यंत आग्रही असलेले पवारसाहेब मात्र सध्या औरंंगाबादच्या ‘संभाजीनगर’ या ठाकरे सरकारने जाता जाता केलेल्या नामांतरावरुन म्हणे नाराज आहेत. नुकतेच याविषयी पवारांनी भाष्य केले आणि हे नामांतर आम्हाला विश्वासात न घेताच ठाकरेंनी केल्याचेही ते म्हणाले.
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून शरद पवारांनी ठाकरे सरकारचे कान टोचल्यावर, पवारांनी फक्त समन्वय नव्हता असे म्हटले, त्यांचा विरोध नाही अशी सारवासारव संजय राऊतांनी केली आहे
महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद चे संभाजीनगर तर उस्मानाबाद चे धाराशिव असे नामकरण करण्यात आले.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी दि. २९ रोजी नामांतराचे विविध निर्णय घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. तसेच उस्मानाबाद शहराचं देखील धाराशीव म्हणून नामांतरास मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबाद शहराचा नामांतराचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला होता. अखेर महाविकास आघाडी सरकारकडून याबाबतचा आज निर्णय घेण्यात आला आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, असे वक्तव्य औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. प्रक्रिया पूर्ण झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केव्हाही ‘गुडन्यूज’ देतील, असेही ते म्हणाले.
"ऊस हे आळश्याचं पीक आहे. रान तयार केलं, पाण्याची व्यवस्था केली की मग काहीच चिंता करायची गरज नाही. त्यानंतर कोणी ढुंकुनही त्याठिकाणी बघत नाही.", असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. सोमवारी (दि. १८ एप्रिल) उस्मानाबाद येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मुंबई आणि उस्मानाबाद येथे असणाऱ्या एकूण ८ मालमत्तांवर ईडीकडून बुधवारी (दि. १३ एप्रिल) कारवाई करण्यात आली. ईडीने केलेल्या कारवाईत कुर्ला मधील ३ फ्लॅट, वांद्रे मधील २ फ्लॅट, गोवावाला कंपाऊंड आणि उस्मानाबाद मधील १४८ एकर जमीन जप्त करण्यात आली आहे.
आपल्या जीवनात संघर्ष अटळ आहे. मात्र, संघर्ष आणि वेदनेचा बाऊ न करता धाडस व हिमतीने जगले पाहिजे. ‘करून जावे असेही काही दुनियेतूनी या जाताना, गहिवर यावा जगास सार्या निरोप शेवट देताना’ या ओळींना कायम ध्यानीमनी ठेवून पुढे जावे. समाजातील प्रत्येक वेदनेवर शक्य तितकी फुंकर घालण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. जिंकायचे असेल, तर कधीही लढणे सोडू नये. - मीरा कदम
पवारांच्या उस्मानाबाद दौऱ्यात शिवसेना आमदार ज्ञानराज चौघुले यांची गळ्यातील सोन्याची साखळी चोरीला गेली.
१९ऑक्टोबरला बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील.
भारतीय सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाकीस्तान सीमेवरुन एका मुलाला ताब्यात घेतले आहे. मुळचा उस्मानाबादचा असलेला हा झिशान सिध्दिकी सीमेवर आपल्या पाकिस्तानी प्रेयसीला भेटायला गेला होता. पाकिस्तानी सीमेवर ९.३० वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे तो आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकी घेऊन निघाला. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा ? याचा तपास पोलीस घेत आहेत
उपचारानंतर कोरोनाबाधित तिन्ही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढलल्याने खळबळ
याच फादर दिब्रिटोंना उस्मानाबादच्या साहित्य संमेलनात देशात कसलेसे भयाचे वातावरण असल्याचा साक्षात्कार झाला होता. आज देशात खरोखरच कोरोनाच्या भयाचे वातावरण असताना फादरना आपल्या माणुसकीपेक्षा आपल्या धर्माची अधिक चिंता वाटते.
उस्मानाबादमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का; प्रामाणिक कार्य करूनही पक्षात न्याय मिळत नसल्याचा केला आरोप
"कुठलाही माणूस राजकीय भूमिकेशिवाय असू शकत नाही. तशा त्या भूमिका लेखकालाही असतात. म्हणूनच साहित्यकृतीच्या सर्व घटकांमध्ये राजकीय भूमिका झिरपत गेलेली असते," असे मत ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात यांनी व्यक्त केले.
"सध्या वाड्मयाच्या क्षेत्रात उघड उघड जातीयवादाला खतपाणी घातले जात आहे, त्याचा पुरस्कार केला जात आहे. वाड्मयीन क्षेत्राच्या दृष्टीने ही भयानक अवस्था असून जातीयवादाने सबंध साहित्यच पोखरण्याची अवस्था निर्माण होऊ शकते. जातीयवाद वाड्मयीन क्षेत्राचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. आपण जागतिक दहशवादाबद्दल बोलतो. परंतु, वाड्मयातील या जातीय दहशतवादाबद्दल कधी, कोण बोलणार," असा खडा सवाल ज्येष्ठ कथा-कादंबरीकार रा. रं. बोराडे यांनी केला.
कवी सं. कि. झट्टू यांचे कवितेद्वारे महाविकासआघाडी सरकार टीका केली
उस्मानाबाद येथे सुरु असलेल्या साहित्य संमेलनात मावळत्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी घेतली स्टॉलवरील पुस्तकांची माहिती
प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांचे रोखठोक मत
ज्येष्ठ समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांच्या हस्ते प्रकाशन
उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात दैनिक'मुंबई तरुण भारत'चे वार्ताहर सोमेश कोलगे यांच्या अटकेचा प्रयत्न झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस निरिक्षक माने यांनी 'मुंबई तरुण भारत'च्या स्टॉलवर येत सोमेश कोलगे यांना तेथून दूर नेण्याचा प्रयत्न केला.
साहित्य संमेलनात पत्रकार सोमेश कोलगे यांच्या अटकेचे प्रयत्न
तिघाडी सरकारला इतका घाम का फुटलाय ?
महाआघाडीच्या राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बिघाडी झाली असून पुरोगामीत्वाच्या आणि खुल्या विचारांची कास धरणाऱ्या ढोंगी साहित्यिक व खुल्या विचारकांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी! होत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.
सोमेश कोलगे यांच्या अटकेचे प्रयत्न आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे सुमार भाषण याव्यतिरिक्त या साहित्य संमेलनात काय घडले, हा मोठा प्रश्नच आहे.
संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटोंचे अध्यक्षीय भाषण
प्रकृती अस्वास्थ्याचे कारण
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काँग्रेस सेवा दलाच्या पुस्तिकेत घृणास्पद मजकूर प्रसिद्ध करण्यात आला. ही पुस्तके काँग्रेसकडून वितरित केली गेली.
"धर्म आणि राजकारण यांची गल्लत होऊ नये, असे म्हणणारे फादर फ्रान्सिस दिब्रिटो ख्रिस्ती धर्मगुरूंनी राजकारणात केलेल्या हस्तक्षेपासंबंधी टिप्पणी का करीत नाहीत?," असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक आणि राजहंस प्रकाशन संस्थेतील ज्येष्ठ संपादक आनंद हर्डीकर यांनी रविवारी केला.
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका अज्ञात तरुणाने चाकुहल्ला केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. कळंब तालुक्यात नायगाव पाटोळी या गावात हा प्रकार घडला. शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत ओमराजे प्रचारासाठी आले होते. त्यावेळी भर सभेत त्यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला.
उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. रविवार, दि. २२ सप्टेंबर रोजी साहित्य मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. उस्मानाबाद येथे होणाऱ्या पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली जाईल. १० ते १२ जानेवारी २०२० दरम्यान ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असल्याचेही याच वेळी जाहीर करण्यात येणार आहे.
सोलापूर आणि उस्मानाबाद या शहरांना तुळजापूरमार्गे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोलापूर दौऱ्यात याबाबत घोषणा केली
मुळचे उस्मानाबाद जिल्हयातील वाशी येथील प्रा. कवडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या हिंदी विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले आहे.
राज्यातील हिंसाचाराल राज्य सरकार जबाबदार आहे" असा गंभीर आरोप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आज उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. धुळे येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण होते. लातूरमधील औसा तालुक्यात तर उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातल्या सास्तूर माकणी परिसरात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.