...तर इम्तियाज जलील यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा: सुमित खांबेकर
- नामांतराविरोधात एमआयएमचं साखळी उपोषण
04-Mar-2023
Total Views | 87
1
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने राज्याच्या नामांतराला हिरवा कंदील दाखवत प्रस्ताव मंजूर केला, आणि औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर तर, उस्मानाबादचे नाव बदलून धाराशीव करण्यात आले. मात्र, एमआयएमचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली असून औरंगाबाद नावाचा बोर्डही लावण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच छत्रपती संभाजीनगर येथील वातावरण अधिकच चिघळले आहे. त्यात मनसेने इम्तियाज जलील यांच्या विरोधातच आक्रमक भूमिका घेत राजीनाम्याची मागणी केली आहे.
नामांतराविरोधात आंदोलन करताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, "औरंगाबादचे नामांतर फक्त एका राजकीय नेत्याच्या इच्छेसाठी करण्यात आले आहे. तसे असेल तर माझीही इच्छा आहे की, मुंबईचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज महानगर', पुण्याचे नाव 'फुले नगरी' तर नागपूरचे नाव 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरी' करा. औरंगाबादचे नामकरण का करायचे? मी काही औरंगजेबचा भक्त नाहीय. ते फक्त एक राजा होते." असं जलील यावेळी म्हणाले.
इम्तियाज जलील यांनी केलेल्या आंदोलनावरुन मनसे चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली. नामांतरण पटत नसेल तर मनसेकडुन इम्तियाज जलील यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येतेय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी इम्तियाज जलील यांना इशारा दिला आहे. शहराच्या नावाला जो कोणी विरोध करील त्याला आम्ही त्याच्याच पध्दतीने उत्तर देऊ असा इशारा दिला आहे.
सुमित खांबेकर यांनी मोर्चा काढणाऱ्यांनी सुद्धा त्यांना जर औरंगजेब इतकाच चांगला वाटत असेल तर त्यांनी स्वतःच्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवावे असा सल्ला दिला आहे. आता या शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर झालेलं आहे. जो कोणी विरोध करीत त्याला आमचा विरोध राहील अशी भूमिका मनसे घेतली आहे. इम्तियाज जलील आता छत्रपती संभाजी नगरचे खासदार आहेत त्यांना जर हे पटलेलं नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही सुमित खांबेकर यांनी केली आहे. याशिवाय एमआयएमच्या आंदोलकांना यावेळी तुमच्या मुलांचे नावे औरंगजेब ठेवा असा टोला लगावला आहे.