पवारांच्या दौऱ्यात चोरी ; शिवसेना आमदाराची सोनसाखळी लंपास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2020
Total Views |

sharad pawar_1  


उस्मानाबाद :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. अवकाळी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करण्यासाठी पवार बांधावर पोहोचले. मात्र हा दौरा एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला. शिवसेना आमदार ज्ञानराज चौघुले यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरीला गेली. अज्ञात चोरट्याने ही साखळी लंपास केली. आमदारांचीच साखळी लंपास झाल्याने सर्वत्र एकच धांदल उडाली.



आज तुळजापूरमधून शरद पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात शरद पवार यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी व अधिकारी देखील होते. उमरगा तालुक्याचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौघुले देखील पवारांसोबत आहेत. चौगुले यांच्या गळ्यात ४ तोळे वजनाची साखळी होती. या चैनीची किंमत जवळपास २ लाख रुपये होती. मात्र गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने आमदार चौगुलेंच्या गळ्यातील साखळी लंपास केली.

गेल्या आठवड्यापासून कोसळत असेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील उस्मानाबाद, औरंगाबाद, लातूर, बीड, नांदेड, जालना या जिल्ह्यात शेतीचे नुकसान केले आहे. ठिकठिकाणी काढून ठेवलेले सोयाबीनही डोळ्यादेखत वाहून गेले. तर काही ठिकाणी सोयाबीनला बुरशी आली, मोड फुटले. कापूसही यातून सुटला नाही. हातातोंडाशी आलेल्या कापसाचेही मोठे नुकसान झाले. शेकडो एकरवरील उभा ऊस आडवा झाला. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. खरिपाच्या पिकांवर पाहिलेली स्वप्न मातीमोल झाली आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आज जालना दौऱ्यावर आहेत. अवकाळी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करण्यासाठी पवार बांधावर पोहोचले. मात्र, तिथे शेतकऱ्यांनी पवारांचे निषेध आंदोलन करत स्वागत केले. बाधित पिकांना प्रतिहेक्टर ५० हजारांची थेट मदत करा, पाहणी दौरे नंतर करा, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निषेध आंदोलन केले.
@@AUTHORINFO_V1@@