उरण : महाराष्ट्राचे राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महसूल विभागा मार्फत 1ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्र राज्यात सप्तसूत्री कार्यक्रम राबविला जात आहे. त्या मधला आज दिनांक 4/08/2025 रोजी तहसील कार्यालय उरण यांच्या मार्फत मौजे विंधणे ता. उरण येथील हनुमान मंदिरा माध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्तव समाधान शिबिराचे बिराचे अभियान आयोजन करण्यात करण्यात आले होते.
या शिबिरात विविध प्रकारचे दाखले वितरण, शेतकरी यांच्या साठी विविध योजना चा लाभ घेण्या साठी एकाच जागी सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपलब्ध होते. शासनाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमा चा लाभ विंधणे ग्रामस्थ व परिसरातील इतर गावातील ग्रामस्थ यांनी घेतला. प्रशासनाच्या या जनतेच्या दारी प्रत्यक्षात दारी जासून सेवा देण्याच्या उपक्रमाचे जनते मध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी तहसील उरण कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र सानप, मंडळ अधिकारी जासई मनिष जोशी, मंडळातील तलाठी अमोल घरत (जासई)सत्यवान पाटील (वेश्वी), निहाल सिंग जास्वाल (विंधणे ), राजाराम जोशी, रामकृष्ण नवाळे, मधुकर नवाळे, आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.