उस्मानाबादमध्ये करोनाचा पहिला रुग्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2020
Total Views |

osmanabad_1  H
उस्मानाबाद : राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरी भागानंतर आता ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र आता उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण पत्नीसह पानिपत येथे धार्मिक कार्यासाठी गेला होता. तेथून तो २५ मार्चला घरी परतला.


दरम्यान, दिल्लीतील मरकझ प्रकरण उघडकीस आल्यानंतर बुधवारी ग्रामस्थांनी त्याला तपासणीचा आग्रह केला. सुरुवातीला त्याने तपासणीला नकार दिला.मात्र ग्रामस्थांच्या विनवणीनंतर त्याने स्वतःची आणि पत्नीची उमरगा उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केली. त्यांच्या घशातील द्रव पदार्थांचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाला. तपासणीत केवळ तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. पत्नीचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. हा अहवाल येताच आरोग्य विभागाने तत्काळ तो तरुण गावात आल्यानंतर कोणकोणाच्या संपर्कात आला, त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू केले. त्याच्या कुटुंबात १० सदस्य असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@