संभाजीनगर : केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीनंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आता औरंगाबाद महापालिकेच्याही नावातही ‘छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका’ असा बदल करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने एक पत्र जाहीर केले असून या पत्राद्वारे सर्व विभाग प्रमुखांना याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.