मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मुंबई आणि उस्मानाबाद येथे असणाऱ्या एकूण ८ मालमत्तांवर ईडीकडून बुधवारी (दि. १३ एप्रिल) कारवाई करण्यात आली. ईडीने केलेल्या कारवाईत कुर्ला मधील ३ फ्लॅट, वांद्रे मधील २ फ्लॅट, गोवावाला कंपाऊंड आणि उस्मानाबाद मधील १४८ एकर जमीन जप्त करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयाने न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली होती.