राज्यातील हिंसाचाराला राज्यसरकार जबाबदार

    03-Jul-2018
Total Views | 8

 
 
उस्मानाबाद : 'राज्यातील हिंसाचाराल राज्य सरकार जबाबदार आहे" असा गंभीर आरोप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आज उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. धुळे येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
जाणीवपूर्वक मुले पळवणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. यावरून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम पद्धतशीरपणे चालू आहे. त्यातून हिंसाचार वाढला आहे, असे वातावरण निर्माण करण्यास शासनच जबाबदार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
 
"धुळे येथे नाथ डवरी समाजातील पाच जणांची हत्या झाली ही दुर्दैवी घटना आहे. देशात अफवा पसरवल्या जात आहेत, मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीच्या नावावर अशा घटना घडत आहेत. आसाम, उत्तरप्रदेशानंतर आता महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत. अशा पद्धतीने मारहाण करणे ही समाजातील विकृती आहे, असे मी समजतो." असेही ते यावेळी म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याण पूर्वेतील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने त्याविरोधात भाजपाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसत मोर्चा काढला. भाजपाने महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रभाग कार्यालयासमोरील कल्याण पूना लिंक रोडवर ठिय्या मांडून तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर महापालिकेने पाणी टंचाई सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने रास्ता रोको आंदोलन ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121