उस्मानाबाद : मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांचे रस्ते अपघातात निधन झाले, त्यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या मेटे यांच्या आईबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अत्यंत घाणेरड्या भाषेत टिपण्णी केली गेल्याची धकाकदायक घटना समोर आली आहे. गजानन खमितकर असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट सचिवपद त्याच्याकडे आहे. एका मराठी वृत्तवाहिनीच्या सोशलमिडीया वरील पोस्टवर ही टिपणी केली गेली होती, त्यावरून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तातडीने सारवासारवीची भूमिका घेतली गेली असून त्या संबंधित पदाधिकाऱ्याच्या पदाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून याबद्दल एक जाहीर पत्रकच प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये पक्ष खमितकराच्या भूमिकेशी सहमत नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीकडून घेण्यात अली आहे. एकेकाळी हेच विनायक मेटे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जात होते. याच मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलच्या राष्ट्रवादीच्या खऱ्या भावना समोर आल्या आहेत असेच या प्रकरणातून दिसते.