तुळजापूर : स्वतःच्या वडिलांच्या आणि स्वतःच्या नास्तिकतेबद्दल ओरडून ओरडून सांगणाऱ्या सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मात्र तुळजापूरच्या तुळजाभवानीचे पाय धरले आहेत. भवानीमातेला रीतसर नवस केला आहे. "पुढच्या वेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे अख्खा पक्ष घेऊन तुझ्या दर्शनाला येईन" असा नवस सुप्रिया ताईंनी केला आहे.
आता पर्यंत कधीच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही, तशी संधी राष्ट्रवादीला मिळालेली नाही, निदान पुढच्यावेळी तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादीचा माणूस बसू दे असे साकडे सुप्रियाताईंनी घातले. "महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोणाचा होणार हे महाराष्ट्रातील जनताच ठरवत असते त्यामुळे महाराष्ट्राला जर महिला मुख्यमंत्री हवा असेल तर महाराष्ट्राची जनताच एका महिलेला मुख्यमंत्रीपदी बसवेल" अशी मागणीही सुप्रिया ताईंनी यावेळी केली.