शिवसेना खासदारावर जीवघेणा हल्ला

    16-Oct-2019
Total Views | 84


 


उस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर एका अज्ञात तरुणाने चाकुहल्ला केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. कळंब तालुक्यात नायगाव पाटोळी या गावात हा प्रकार घडला. शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत ओमराजे प्रचारासाठी आले होते. त्यावेळी भर सभेत त्यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला.

 

"सुदैवाने या हल्ल्यात मी जखमी झालो नाही. मी सुखरुप आहे, गेल्या काहीकाळापासून माझ्या सभांमध्ये काही तरुणांचा गट अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहे. हल्ल्यावेळी माझा एक हात पकडून दुसऱ्या हातावर वार करण्याचा प्रयत्न झाला.", अशी माहिती ओमराजे यांनी दिली.

 

दरम्यान, हा हल्ला नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस लावत असून सध्या कोणताही अंदाज बांधणे शक्य नसल्याचेही ते म्हणाले. त्यांच्यावरील हल्ला हा तेरणा कारखान्यातील शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली. सर्व शेतकऱ्यांची थकबाकी देऊन झाली आहे. ज्याने हल्लाकेला तो तरुण पळून गेल्याचेही त्यांनी सांगितले.



 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121