केरळ हायकोर्टाने एका महत्त्वपूर्ण निकालात म्हटले आहे की, मंदिराच्या प्रचलित धार्मिक प्रथेमध्ये केवळ मुख्य पुजाऱ्यांच्या संमतीने बदल केले जाऊ शकतात. न्यायालयाने कूडलामणिक्यम देवस्वोम व्यवस्थापन समितीचा निर्णय रद्द केला ज्याने अम्मानूर कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर हिंदू कलाकारांना त्रिशूरमधील इरिंजलाकुडा येथील मंदिराच्या कूथंबलममध्ये कूथु आणि कूडियट्टम नृत्य करण्याची परवानगी दिली होती.
Read More
फ्रेंच सार्वत्रिक निवडणुकीत डाव्या आघाडीने विजय मिळवला आहे. डाव्या आघाडीच्या विजयानंतर फ्रान्समध्ये प्रचंड दंगल उसळली असून आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलक दंगल करत आहेत आणि पेट्रोल बॉम्ब टाकून जाळपोळ करत आहेत. दंगलखोरांना रोखण्यासाठी फ्रान्समध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
केरळच्या डाव्या सरकारने पुन्हा एकदा केंद्र सरकारला आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. काँग्रेस आणि डाव्या सरकारांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाचा फटका बसलेल्या केरळने केंद्राकडे २४,००० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मागितले आहे. केरळचे म्हणणे आहे की ते आपल्या आर्थिक संकटाशी लढण्यासाठी या पॅकेजचा वापर करेल.
केरळमध्ये डाव्या सरकारने राजकीय हिंसाचारात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांचे महिमामंडन करण्याचे काम हाती घेतले आहे. डाव्या पक्षाकडून केरळमधील कन्नूर येथे जून २०१५ मध्ये बॉम्ब बनवताना प्राण गमावलेल्या सीपीआय(एम) कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक बांधण्यात आले आहे. पक्षाचे राज्य सचिव एमव्ही गोविंदन यांच्या हस्ते दि. २२ मे रोजी स्मारकाचे उद्घाटन होणार आहे.
राहुल गांधी हे चतुर्थ श्रेणीचे नागरिक असून त्यांची डीएनए चाचणी करण्याची गरज आहे, असा टोला डाव्या आघाडीचे आमदार पी. व्ही. अन्वर यांनी लगावला आहे.
देशातील प्रमुख डाव्या राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) ने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात सीपीआय-एमने सत्तेत आल्यास सीएए कायदा रद्द करणार सोबतच कलम ३७० बहाल करणार आणि खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करणार असल्याची घोषणा केली आहे.
दूरदर्शनवर दि. ५ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८ वाजता ‘द केरळ स्टोरी’ प्रसारित करण्यात येणार आहे. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट दूरदर्शनवर प्रसारित होणार अशी घोषणा होताचं डावे आणि काँग्रेसजनांनी एका आवाजात विरोध सुरू केला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही चित्रपटच्या प्रसारणला विरोध केला आहे. त्यांनी दूरदर्शनच्या निर्णयाचा निषेध केला आहे. काँग्रेस नेते व्हीडी साठेसन यांनीही याप्रकरणी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
‘जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियन’ निवडणुकीमध्ये ’युनायटेड लेफ्ट’ पॅनल विजयी झाले. मग काय, रा. स्व. संघाच्या राष्ट्रनिष्ठ विचारसरणीमुळे सदैव पराजित आणि भयभीत असलेल्या कम्युनिस्ट आणि त्यांच्या समविचारी संघटनांच्या लोकांनी जेएनयुमध्ये ’जय भीम’, ’लाल सलाम’ घोषणा दिल्या. ’जय भीम’ आणि ’लाल सलाम’ यांचा संबंध काय? या निवडणुकीत जिंकलेल्यांचे सत्य काय? त्यांच्या समर्थकांचे मनसुबे कोणते? याचा मागोवा घेणारा हा लेख...
फेब्रुवारी महिन्यात केरळमधील वायनाड येथील मेडिकल कॉलेजमधील जेएस सिद्धार्थन या विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत नवीन खुलासे समोर आले आहेत. वसतिगृहात रॅगिंगदरम्यान अत्याचार झाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या रॅगिंगमध्ये डाव्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना एसएफआयच्या गुंडांचाही समावेश होता. आता याप्रकरणी अँटी रॅगिंग समितीचा अहवाल आला आहे.
केरळ सरकार सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे तेथील सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार मिळण्यास विलंब होत आहे. यापूर्वी राज्य कर्मचाऱ्यांचे पगार दि. १ मार्चला होणार होते. विलंबामुळे ते आता ४ मार्चला होणे अपेक्षित आहे. पगार मिळण्यास उशीर होण्याचे कारण म्हणजे सरकारी तिजोरीतून बँकांपर्यंत पैसे वेळेवर न पोहोचणे, असे सांगितले जात आहे. केरळ सरकारच्या या गलथान कारभारामुळे पगार वेळेवर मिळण्याची अपेक्षा असलेल्या सुमारे साडेतीन लाख कर्मचाऱ्यांना फटका बसला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये डाव्या संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. स्कूल ऑफ लँग्वेजेसजवळ ही घटना घडली. निवडणूक समिती सदस्य निवडीवरून दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली. जखमी विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार उत्तराखंडमधील हल्दवानी येथे अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू झाले होते. यानंतर इस्लामिक कट्टरपंथीयांनी पोलिस दल आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात ३०० हून अधिक अधिकारी जखमी झाले आहेत. कट्टरपंथीयांनी केवळ पोलिसांवर दगडफेकच केली नाही तर त्यांच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकले आणि वाहनेही पेटवली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे.
इरफान हबीब आणि मंडळींनी इतिहासाचे अभ्यासक्रम, पुस्तके, अकादमिक विश्व यांमध्येही आपले विकृत विचार पेरले. परिणामी, हिंदूंच्या इतिहासाबद्दल न्यूनगंड आणि संताप मनात असलेल्या किमान दोन पिढ्या या मंडळींनी तयार केल्या. मात्र, आता ‘कालचक्र’ बदलले असून, हिंदू समाज इतिहासाच्या नावे चाललेल्या बदमाशीस उधळून टाकण्यास सज्ज झाला आहे!
केरळमध्ये सत्ताधारी सीपीआय(एम) या पक्षाने पूजापुरा येथील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची हिंदू मंदिरे, सरस्वती मंडपम आणि नवरात्री मंडपम यांचा उपयोग राजकीय कामात करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी हिंदू मंदिरांचे रुपांतर राजकीय प्रचार मंचात केले आहे. डाव्या पक्षाच्या या कृत्याला भक्तांनी आणि स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता. पण कोणाच्याच विरोधाला न जुमानता सरस्वती मंडपमचे रुपांतर राजकीय कार्यालयात करण्यात आले.
केरळमधील पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट सरकार लवकरच राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘इस्लाम इन केरळ’ या विषयावर एक मायक्रोसाइट तयार करणार आहे. या मायक्रोसाइटचा उद्देश हा केरळमध्ये मुस्लीम धर्माचा उदय कसा झाला हे शोधण्याचा असेल, असा दावा केरळच्या कम्युनिस्ट सरकारने केला आहे.
खोटे वृत्त छापणाऱ्या ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाविरोधात भाजपचे माहिती व तंत्रज्ञानप्रमुख आणि पश्चिम बंगाल सहप्रभारी अमित मालवीय हे फसवणूक आणि अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.
काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराच्या खऱ्या कहाण्या जगासमोर आणण्याचे धाडस दाखवणारे 'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना फिल्मफेअर फेस्टिवलला आमंत्रणच नाकारण्याचा खोडसाळपणा, आयोजकांनी केला आहे
१०० वर्षांपासून कम्युनिस्ट विचारधारेने या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न कसा केला? याचा लेखाजोखा पुराव्यासकट माधव भांडारी लिखित ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या पुस्तकात आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर जी अस्वस्थता वाटते, ती अजूनही आहे. या अस्वस्थतेला एक समाधानाची किनारही आहे की, बरे झाले २०१४ साली सत्तापालट झाली. नाहीतर आपल्या पुढे आपल्या देशापुढे जे काही वाढून ठेवले होते ते भयंकर होते. या पुस्तकातले विचार अगदी सारांश रूपाने मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला आहे. रविवार दि. २६ जून पासून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे ' नॉट रिचेबल' होते. मात्र आता, ते सुरतेहून गुवाहाटीला जात आहेत. उदय सामंत हे शिंदे गटात सामील होणारे आठवे मंत्री आहेत. तर, विधानसभेत निवडून आलेले आदित्य ठाकरे हे एकेमेव मंत्री शिवसेनेत उरल्याचे बोलले जात आहे.
पंजाबमधील गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मूसवाला यांची दि. २९ मे रोजी लॉरेन्स बिश्नोई टोळीने गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेनंतर डावे-उदारमतवादी आणि काँग्रेस आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारला सुरक्षेतील त्रुटींबद्दल लक्ष्य करत आहेत. मूसवाला यांच्या हत्येच्या एक दिवस आधी त्यांची सुरक्षा कशी कमी करण्यात आली, याचा उल्लेख अनेक नेत्यांनी केला आहे.
“सेक्युलॅरिझम’, लोकशाही आणि बहुलता हे भारतीय संस्कृतीचे मूळ आहे. त्यामुळे भारतीयांना अन्य देशांकडून ही तत्त्वे आणि सर्वसमावेशकता शिकण्याची गरज नाही,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी गुवाहाटी येथे बुधवार, दि. २१ जुलै रोजी केले.
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन हे रवांडामध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी रवांडातील नरसंहारात मारल्या गेलेल्या, बलात्कार झालेल्या सगळ्यांची क्षमा मागितली. कारण, आता सत्य समोर आले. फ्रान्समध्ये राहणारा पण मूळचा हुतू असलेला फिलिसीया काबुगा या उद्योगपतीने त्या नरसंहारामध्ये रवांडातील हुतूना आर्थिक आणि इतर मदत केली.
केरळमध्ये माकपची आघाडी आणि काँग्रेसची आघाडी यांच्यात थेट सामना होणार आहे. काँग्रेस २०१६ सालच्या पराभवाचे उट्टे काढण्यास आतुर आहे. १९८० सालापासून केरळीय मतदार दर पाच वर्षांनी सत्तापालट घडवून आणतो. त्यानुसार आता संयुक्त आघाडी सत्तेत येऊ शकते.
प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या काही भागात जे घडले त्याचे वर्णन समाजकंटकांनी घडवून आणलेला हिंसाचार असेच करावे लागेल. पण तेही थोडे अतिशयोक्तच ठरेल. कारण, हा हिंसाचार मर्यादित क्षेत्रात ठेवण्यात दिल्ली पोलीस यशस्वी झाले होते. मात्र, त्यात अराजकतेची बीजे साठवलेली होती.
खुद्द ताहिर हुसैन याने हिंदूंना धडा शिकवण्यासाठी दिल्लीतील दंगल घडवल्याची कबुली दिली. डाव्या उदारमतवादी-बुद्धिजीवी कळपाला मात्र त्यावरच पांघरुण घालायचे असून इस्लामी धर्मांधांनी केलेल्या दंगलीचे वास्तव समोर येऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांनी Delhi Riots 2020 : The Untold Story पुस्तकाला विरोध केला.
डाव्या मंडळींचा एक सुनियोजित ‘अजेंडा’ आहे. देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण करायची. ती निर्माण करण्यासाठी बंदुकीतील गोळी म्हणून, अनुसूचित जाती-जमाती आणि मुसलमान यांचा उपयोग करायचा.
‘जुशे’वरुन मोदींमध्ये कोरियाच्या माजी हुकूमशहाची झलक दिसलेल्या मोइत्राबाईंना कदाचित स्वत:च्याच पक्षाध्यक्षांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या ‘मा, माटी, मानुष’च्या हाकेचा विसर पडलेला दिसतो, अन्यथा मोदींच्या आत्मनिर्भरतेची अशी थट्टा त्यांनी मांडली नसती.
विचारधारेच्या नावाखाली धर्माला नख लावण्याचा प्रयत्न
कोरोनाचे संकट आरोग्याचे आहे, डाव्यांचे संकट अस्तित्व रक्षणाचे आहे. एक लढा आरोग्यविषयक खबरदारी घेऊन लढायचा आहे आणि दुसरा लढा राष्ट्रीय बांधिलकी आणि सामाजिक बांधिलकी घेऊन लढायचा आहे. आणि दोन्ही ठिकाणी विजयीच व्हायचे आहे.
ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर फेसबूक कमेंट करणाऱ्या अनंत करमुसे यांना झालेली मारहाण हा गंभीर प्रकार आहे. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे.
जेएनयुतील गोंधळ घालणार्या टाळक्या आणि टोळक्यांव्यतिरिक्त दिल्लीत डाव्यांची विचारपूस करणारे कोणीही नसल्याचे स्पष्ट होते. पण असे का व्हावे? बरं, हे फक्त दिल्लीतच नाही, तर गेल्या काही वर्षांचा भारतीय राजकारणातील निवडणुकांचा अभ्यास केल्यास डावे पक्ष नेस्तनाबूत होत असल्याचेच आढळते.
आज खरी आवश्यकता आहे ती, रस्त्यावर उतरण्याची. ‘नागरिकत्व कायद्या’च्या समर्थनार्थ सगळा महाराष्ट्र ढवळून काढण्याची. मोठमोठ्या शहरात लाखा-दीड लाखांचे मोर्चे काढण्याची. राष्ट्रभक्त नागरिकांच्या अफाट शक्तीचे प्रदर्शन करण्याची. काट्याने काटा काढायचा असतो, अशी म्हण आहे. आंदोलनाला प्रतिआंदोलनाने उत्तर द्यायचे असते.
नागरिकता कायद्याबाबत निर्माण करण्यात आलेल्या गैरसमजातून मुस्लीम समुदाय बाहेर पडत असतानाच आता डाव्यांनी या आंदोलनात विद्यार्थी व कामगार यांना उतरविण्याचा प्रयत्न चालविला आहे, हे दिल्लीच्या वादग्रस्त जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचार व ८ जानेवारी रोजी डाव्या कामगार संघटनांच्या पुढाकाराने आणि आक्रमक सहभागाने आयोजित करण्यात आलेल्या कथित ‘भारत बंद’ यामुळे पुरेसे स्पष्ट झाले आहे.
कोणे एकेकाळी मुंबईत डाव्या पक्ष-संघटनांचा मोठाच दबदबा होता. त्याच काळात शिवसेनेची स्थापना झाली व तिने डाव्यांशी दोन हात केले. नंतर मुंबईतल्या कम्युनिस्टांना संपवण्याच्या बढायाही शिवसेनेने अनेकवेळा मारल्या. परंतु, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेने आतापर्यंत केलेल्या कामगिरीवर पाणी फिरवले नि ‘टुकडे टुकडे गँग’वाल्या डाव्यांचीच तळी उचलण्याचा उद्योग केला.
नव्या सत्रासाठी नावनोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला, सर्व्हर, वायफाय यंत्रणेची तोडफोड
विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेत सहभागी होणे शक्य व्हावे यासाठी विद्यापीठाने ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याने आणि त्यास विद्यार्थी प्रचंड प्रतिसाद देत असल्याचे पाहून डाव्या संघटनांचे नेते बिथरले आणि त्यातून त्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ले करण्याचे षड्यंत्र रचले.
डाव्यांनी आतापर्यंत जसे भिन्न विचाराला व तशा विचाराच्या माणसांना मारून टाकले, त्यांच्या रक्ताचा सडा शिंपला तेच काम जेएनयुतही करण्याचे नियोजन त्यांनी केले. विचारांचा विरोध विचारांनी न करण्याची डाव्यांची ही तशी वर्षानुवर्षांपासूनचीच परंपरा व रविवारचा विद्यार्थ्यांवर केलेला हल्ला त्याचाच नमुना! परंतु, पायाखालची वाळू सरकलेल्या व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी झालेल्या डाव्यांनी अशा हिंसाचारातून आपलेच थडगे बांधण्याचे काम केले आहे.
कर्नाटकातून इतिहासकार रामचंद्र गुहांना अटक
प्रसून जोशी यांनी ‘मणिकर्णिका’साठी लिहिलेल्या गीताचे शब्द आहेत - ‘मैं रहूँ या ना रहूँ, भारत ये रहना चाहिए।’ हे इतके सुंदर गीत आहे की, प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना उचंबळून आल्याशिवाय राहणार नाही. यात कोणालाही आक्षेप घेण्यासारखे काय आहे? परंतु, वामपंथीयांना आक्षेप आहे. कदाचित त्यांच्या भावना, ‘भारत तेरे टुकड़े होंगे’, ‘इंशा अल्लाह इंशा अल्लाह’ किंवा ‘भारत की बर्बादी तक जंग चलेगी, जंग चलेगी’ सारख्या नाऱ्यांमध्ये व्यवस्थित अभिव्यक्त होत असाव्यात. म्हणून यांना ‘मणिकर्णिका’च्या ‘मैं रहूँ या ना रहूँ,
एस-४०० एअर डिफेन्स प्रणाली हे जगातिल सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम आहे. याव्यतिरिक्त ती एक मोबाईल सिस्टम आहे.
‘प्रत्येक डाव्या विचारांचा माणूस नक्षलवादी नसतो,’ असे म्हणून सहानुभूती मिळविण्यापर्यंत डावी चळवळ मागे रेटली गेली आहे. आजची कारवाई अनेकांचे बुरखे फाडणारी आहे.
पंतप्रधानांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या हत्येच्या कटाशी संबंधित कागदपत्रांमध्ये या मंडळींची नावे येतात. नेहमीच असे का घडते, यावर चर्चा होण्यापेक्षा यांनी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डाव्यांच्या हिंसेला पुरोगामी परवाना आहे, असाच याचा अर्थ लावावा लागेल.
गेल्या ६० वर्षांपासून देशाला आतमधून पोकरत असलेल्या नक्षलवाद गेल्या चार वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली आहे.
भाजपविरोधी सगळ्यांबरोबर ममत्व वाढविण्याचे ममतांचे उद्योग एका भाबड्या समजुतीतून आहेत. लोकसभेनंतर लगेचच बंगालची विधानसभा निवडणूक असेल, पण विरोधकांचा हा अमिबा निवडणूक रंजक करेल, यात शंका नाही.
नृशंस कृत्य करणारे नक्षली गोरगरिबांचे राज्य निर्माण करणार? एवढे अत्याचार सहन केलेली ही माणसे कोण होती? यांच्यावरच्या अत्याचारांमधून कूठली आली आहे क्रांती?
समाजसेवेच्या नावाखाली जर कुणी धर्मांतरण घडवून आणत असेल आणि त्याला केलेल्या विरोधामुळे संविधान धोक्यात येत असेल, तर हे ढोंग जनतेच्याही लक्षात येईल आणि जनता कारस्थानाला बळी पडणार नाही, हे निश्चित!
गेल्या सहा वर्षांत पदवीधर, बेरोजगार, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत प्रयत्न केले
पालघरमधील प्रचारावेळी शिवसेनेने आपल्या उमेदवाराला चर्चमध्ये घेऊन जात पाद्र्यांच्या-मिशनर्यांच्या झग्यांशी इमान राखण्याच्या शपथा दिल्या.
भाजप अध्यक्ष अमित शाह यांना बदनाम करण्यासाठी म्हणून कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांकडून जाणूनबुजून हा डाव रचला गेला होता
शिवसेनेकडे कोकणच्या विकासाचा काही ठोस आराखडा असेल तर त्यांनी तो जरूर जाहीर करावा. पिढ्यानपिढ्या शिवसेनेला मतदान करणार्या कोकणी जनतेला यातून दिलासच मिळेल