शिवकालीन खांदेरी जलदुर्गावर पारंपरिक खेळांचा शोध!

बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले यांनी राबविलेल्या शोध मोहीमेला यश

    15-Jun-2025
Total Views | 23

Untitled design (15)
 
मुंबई : महाराष्ट्रातील किल्ल्यांवर काही ठिकाणी खेळांचे पट कोरले गेलेले आढळतात. अशातच आता खांदेरी या जलदुर्गावर बैठया खेळांचे अवशेष सापडले आहेत. इतिहास अभ्यासक पंकज भोसले यांच्या शोध मोहिमेअंतर्गत या खेळांचे अवशेष सापडले आहेत. आर्ट ऑफ प्लेईंग आणि आपला कट्टा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या या शोधमोहिमेत बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले , ममता भोसले , केतकी पाटील , सिद्धेश गुरव आणि अनिकेत पाटील यांनी सहभाग घेतला होता.

शिवरायांच्या सामुद्रिक सामर्थ्याचे प्रतिक असलेल्या खांदेरी किल्ल्यावर सुरु असलेल्या शोधमोहिमेत बैठ्या खेळांसंदर्भातील अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. सदर शोधमोहिमेत खांदेरी किल्ल्याच्या तटबंदीवर एकूण १२ अवशेष सापडले आहेत. या पटांमध्ये "मंकला" हा खेळ प्रामुख्याने पाहायला मिळतो. यामध्ये आपल्याला जमिनीवर समांतर रेषेमध्ये समोरासमोर सात किंवा आठ किंवा त्याहूनही अधिक खड्डे पाहायला मिळतात. या खेळाला 'मंकला' असे म्हणतात. गणिताचे कौशल्य वाढवणारा हा खेळ जगभर विविध नावाने प्रसिद्ध आहे. शोधमोहिमेच्या अंतर्गत खांदेरी किल्ल्यावर या खेळाचे एकूण १० पट सापडले आहेत. हा खेळ नेमका केव्हापासून अस्तित्व आहे, याचा अद्याप शोध लागलेला नाही, परंतु भारतातील अनेक लेण्यांमध्ये आपल्याला हा खेळ बघायाला मिळतो. महाराष्ट्रातील कार्ले, भाजे, बेडसे, आगाशीव, गडद लेणी ह्या सर्व ठिकाणी हा खेळ कोरलेला आहे.

वारशाचे जतन ही काळाची गरज : पंकज भोसले, इतिहास संशोधक
मागचे १५ वर्ष पुरातन बैठ्या खेळांच्या संशोधनाचे काम आम्ही करत आहोत. आपल्याकडे या खेळांच्या बाबतीत फारशी जागृती नसते. त्याचा परिचय पुढच्या पिढीला व्हावा यासाठी या बैठ्या खेळांचे संवर्धन होणे ही काळजी गरज आहे. शासनाच्या माध्यमातून माहितीपत्रक किंवा माहिती फलक यांच्या माध्यमातून या खेळांची माहिती दिली जाऊ शकते. सुशोभीकरणाचे काम करताना, कधीकधी प्लास्टरिंग मुळे हे पट झाकले जातात. तसे न झाल्यास, या खेळांची माहिती लोकांना मिळू शकेल.

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121