'ती' चप्पल कोल्हापुरीच! समाजमाध्यमांवरील टीकेनंतर 'प्राडा'ने सोडले मौन

    29-Jun-2025
Total Views |
   
prada
 
मुंबई : इटली येथे पार पडलेल्या प्राडा कंपनीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलांचा वापर करत, त्याला ' इटालियन लेदर फुटवेअर डिझाईन' म्हणून विकणे, आता प्राडाला चांगलंच महागत पडलं आहे. प्राडा या कंपनीने आपल्या नावाचा टॅग लावत कोल्हापुरी चपला तब्बल १ लाखापेक्षा जास्त किंमतीने विकण्याचा घाट घातला होता. प्राडाच्या या कारभरानंतर, त्यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली होती. सोशल मिडीयावर याबद्दल प्रतिक्रीयांचा पाऊस तर पडलाच, त्याचबरोबर कोल्हापुरी चपला तयार करणाऱ्या कारागीरांनी सुद्धा संताप व्यक्त केला होता. परंतु आता प्राडाने आपली चूक कबूल केली आहे.
 
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या हस्तक्षेपानंतर प्राडा ग्रुपच्या अध्याक्षांनी आपली भूमिका जाहीर केली. यावेळी ते म्हणाले की " भारतीय पारंपरीक हस्तकलेचे महत्व आम्हाला उमगले असून, आम्ही स्थानिक कारागीरांशी या संदर्भात चर्चा करायाला तयार आहोत" त्याच बरोबर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की या चपला अजून उत्पादन प्रक्रियेसाठी तयार नसून, त्या इतक्यात तरी बाजारात विक्रीसाठी आणल्या जाणार नाही. २३ जून रोजी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्राडाच्या या प्रदर्शनावर आक्षेप घेतला, ज्यामध्ये त्यांनी पत्रव्यवहार करत वस्तुस्थिती मांडली व कारवाईचा इशारा सुद्धा दिला.