महाकवी कालिदास दिनानिमित्त 'पाऊस माझा तुझा' हा विशेष कार्यक्रम संपन्न!
कार्यक्रमात शब्दसंवाद "अंकुर" पर्यावरण अंकाचे प्रकाशन
29-Jun-2025
Total Views |
मुंबई : अखिल भारतीय साहित्य परिषद, नवी मुंबई साहित्य परिषद आणि योग विद्या निकेतन आयोजित महाकवी कालिदास दिनानिमित्त पाऊस माझा तुझा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. २८ जून रोजी हा कार्यक्रम नवी मुंबई येथे संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद साहित्यिक पत्रकार दुर्गेश सोनार यांनी भूषवले. नंदकिशोर जोशी ,अरुंधती जोशी यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
सदर कार्यक्रमात श्रीहरी पवळे यांनी पाऊस माझा तुझा या संकल्पनेची ओळख करुन दिली. या कार्यक्रमात १५ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. रेश्मा कारखानीस ह्यांनी बालकविता ,पाऊस निसर्ग लावणी अतिशय सुंदर रित्या सादर केली, कविता लेखन कसे करावे , मनापासून कविता लिहिली गेली पाहिजे. आतून उत्स्फूर्त अशी ती प्रसवली पाहिजे साध्या सोप्या भाषेत यांनी साहित्य श्रोत्यांशी संवाद साधला. दुर्गेश सोनार यांनी कवितेचे विविध प्रकार आपल्या सुंदर शैलीतून प्रेक्षकांसमोर मांडले. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की तानसेन होण्यापेक्षा कानसेन होणे महत्त्वाचे आहे, कवितेच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती त्यांनी दिली. फक्त मुक्तछंद लिहीत असतानाही त्यातीलही छंद जोपासला गेला पाहिजे हे विशेष करून त्यांनी नोंदवले.