कोल्हापूर : प्राडा’ने त्यांच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल हे लेदर सँडल या नावाने प्रसिद्ध केले होते. भारतीय सांस्कृतिकतेवर हा अन्याय असल्याची भावना लोकांमध्ये होती. प्राडाविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी समाजाने केली होती. यासंदर्भात कोल्हापूर जिल्हा फुटवेअर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि अॅग्रिकल्चरच्या कडे आपली तक्रार मांडील होती. त्यानुसार कोल्हापूर चेंबरने त्वरित ‘प्राडा’ला याबाबत पत्रव्यवहार करून चूक दुरुस्त करण्याची सूचना केली होती. यावर ‘प्राडा’ने कोल्हापूर चेंबरला पत्रव्यवहार करून चूक दुरुस्त केल्याचे कळवले. या समूहाचे संयुक्त सामाजिक जबाबदारीचे प्रमुख लोरेंझो बर्टेली यांनी कोल्हापूर चेंबरला पाठविलेल्या पत्रात म्हटले की” आम्ही याबाबतीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि अॅग्रिकल्चरच्या संपर्कात आहोत. आम्हाला तुमच्यासमवेत एकत्रित चर्चांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्यास आनंद होईल. प्राडा टीमसह पुढील चर्चा आयोजित करू”
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.