मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Indonesia handed over two terrorists to India) एनआयएने अब्दुल्ला फयाज आणि तल्हा खान या दोन दहशतवाद्याना मुंबई विमानतळावरून अटक केल्याचे वृत्त आपण पाहिले. मात्र त्यांना मुंबईत पकडले नसून इस्लामिक राष्ट्र इंडोनेशियाने कायदेशीर प्रक्रियेनंतर दोघांना भारताच्या ताब्यात दिल्याचे स्पष्ट होते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही आधी महाराष्ट्रात आयसिससाठी गुप्तपणे काम करत होते आणि नंतर ते देश सोडून इंडोनेशियाला पळून गेले.
हे वाचलंत का? : बलुचिस्तानने उडवली पाकड्यांची झोप! चिनी डोंगफेंग आर्मर्ड व्हेईकल केले उध्वस्थ
इंडोनेशिया हा जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. असे असतानाही इंडोनेशियाने भारताला मदत केली आणि त्या दोघांनाही भारताच्या स्वाधीन केले. हे सहकार्य अशा वेळी झाले जेव्हा अलीकडेच पहलगाम येथे इस्लामिक दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला. मात्र इंडोनेशियाने या हल्ल्याचा निषेध केला आणि भारताला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
भारत आणि इंडोनेशियाचे संबंध बऱ्याच काळापासून चांगले आहेत. इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार प्रबोवो सुबियांतो यांनी भारताच्या आक्षेपामुळे त्यांनी पाकिस्तानचा दौराही रद्द केला होता आणि नियोजित वेळेपेक्षा जास्त दिवस भारतात राहिले होते. या दहशतवाद्यांना भारतात आणण्यात भारत सरकारची राजनैतिकता आणि इंडोनेशियाशी असलेले मजबूत संबंध यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
इंडोनेशिया शांतीचा संदेश देतो, इस्लाम दहशतवादाचा नाही
प्रबोवो सुबियांतो यांनी स्पष्टपणे सांगितले की इंडोनेशिया इस्लाम दहशतवादाचा नाही तर शांतीचा संदेश देतो. त्यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि भारताला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. हे स्पष्ट आहे की भारत आणि इंडोनेशिया दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकत्र आहेत.